शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                श्र...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्र...: श्री १९ राजेश्वरीला ...
                                               श्री                                            १९
                            राजेश्वरीला आता जबर शिक्षेला तोंड ध्यावे लागेल ह्याबद्दल कुणालाही शंका वाटत नव्हती.सगळीकडे शांतता पसरली होती.सुजय राजांनी बोलायला सुरुवात केली.
                             राजेश्वरीच्या कलागुणां बरोबर एक माणूस,एक स्त्री म्हणून तिचा जो काही परिचय सुजय राजांना झाला होता त्याने ते अचंभित होते.सर्व सामान्य स्त्रियांपेक्षा ती निश्चितच वेगळी होती,आणी म्हणूनच त्यांनी तिच्या पुढे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला होता तो म्हणजे जुन्या राजमहालातील एक महाल जो सुजय राजे स्वतःच तिला दाखविणार होते त्याची सजावट एक महिन्याच्या आत तिने व रघुनाथने करायची होती.त्याच महालात सुजय राजे त्यांच्या काही निवडक देशी अन परदेशी मित्रांना मेजवानी देणार होते.किल्ल्यातल्या या राजमहालाचे अन सभोवतालचे सगळे उजाड उदास वातावरण त्यांना पूर्ण बदलून हवे होते.ह्या कामात पण रघुनाथ अन राजेश्वरीच्या सौंदर्यदृष्टीचा त्यांना उपयोग करून घ्यायचा होता.सुजय राजे त्यांच्या जागेवर बसल्यावर सुदर्शन महाराज म्हणाले की ह्या कामात त्यांच्या मदतीला काही माणस देण्यात येतील ज्यात बागकाम करणारे,सुतार,मजूर जे पडेल ते कुठलेही काम करतील अश्या लोकांचा समावेश असेल. 
                             राजेश्वरी अन रघुनाथ आश्चर्यचकित झाले होते.आजवर त्यांचे पुष्कळ कौतुक झाले होते पण त्यांच्यावर एव्हढा विश्वास ठेऊन काम सोपविण्याची ही पहिलीच वेळ होती.त्यांनी सहर्ष या प्रस्तावाचा स्वीकार केला.त्या दोघांच्या मनात जंगलातली निरनिराळी फुलझाडं आपल्या अनोख्या रंगांसकट हजर झाली.कुठला महाल त्यात कोणच चित्र अश्या सगळ्या विचारांनी एकच गर्दी केली.राजेश्वरीला तर कधी एकदा त्या महालात जाते असे झाले.खोलीतला तो आरसा असेल का तिथे ?अन आपण लावलेली झाडं,पुरते दोन दिवस झाले या वाड्यावर येऊन.रघुनाथला आनंद झाला पण त्याला एकच काळजी होती की आपल्या तब्बेतीने साथ दिली नाही तर एकट्या राजेश्वरीवर सगळा भार पडेल.महाराणी सुलक्षणा वेगळ्याच काळजीत होत्या  ती म्हणजे सुंदरपुरातून त्यांच्या मदतीला जायला कोण तयार होणार? 
                                       सौ.उषा.

गुरुवार, १७ नोव्हेंबर, २०११

                                               श्री                                             १८
          सुजयराजे इतक्या झपाट्यानी आपल्या महालाकडे आले की सुदर्शन महाराज त्यांना काही सांगूच शकले नाही.युवराजांची आनंदी मुद्रा पाहून महाराजांचा जीव भांड्यात पडला.आता महालात चांगलीच गर्दी झाली होती.सगळे राजेश्वरीच्या चित्राची खूपच तारीफ करत होते.रघुनाथला पण हे ऐकून आनंद झाला.
                           राजेश्वरीची अवस्था मोठी विचित्र झाली होती.ती इतक्या दिवस रघुनाथ सारख्या कलाकाराची मदतनीस होती,तिच्या कानांना आपल्या वडलांचे कौतुक ऐकायची लहानपणापासून सवय होती,पण आज इतका सगळा समुदाय फक्त तिचे कौतुक करत होता.
                          शिडीवरून खाली उतरून तिने महाराज आणी युवराज दोघांना नमस्कार केला.युवराजानी तिला आपल्या कंठातला मोत्याचा हार बक्षीस देऊ केला,इथे पुन्हा सगळ्यांना राजेश्वरीचे वेगळेपण उठून दिसले कारण राजेश्वरीने नम्र शब्दात हार स्वीकारायला नकार दिला.ती म्हणाली की आमचे असे भटके जीवन आहे की त्यात या वस्तूंचा आम्हाला उपयोग होण्यापेक्षा उपद्रव होण्याचीच शक्यता जास्त आहे.मी कधीही महागडे कपडे आणी दागिने घातले नसल्याने त्यांची देखभाल करण्याची सुद्धा मला सवय नाही तरी मला या बाबतीत कुणीही आग्रह करू नये.सुजय राजांनी तिला ताबडतोब काम थांबवण्याचा हुकुम सोडला.
                               दुपारी स्नान जेवण आटोपल्यावर राजेश्वरीला सुदर्शन महाराजांच्या महालात येण्याची आज्ञा मिळाली.रघुनाथ पण राजेश्वरी बरोबर महाराजांच्या महालात आला होता.त्याने महाराजांची परवानगी घेऊन एका खांबा जवळ बैठक मारली.महाराज सुदर्शन महाराणी सुलक्षणा आणी सुजयराजे समोर बसले होते.

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

                                       श्री                                              17                                    रंगकाम करण्यात राजेश्वरी खूप निष्णात होती असे नाही पण रघुनाथच्या हाताखाली ती चांगली तयार झाली होती.तिचा आत्मविश्वास अव्वल दर्जाचा होता.यशस्वी होण्याकरता जरूरी मेहनत करण्यात ती कुणालाही हार जाणार नव्हती.मुख्य म्हणजे ती स्पष्टवक्ता असूनही विनम्र होती.
                           रघुनाथ,रंगाचं साहित्य यांना नमस्कार करून राजेश्वरीने कामाला मोठ्या उत्साहाने सुरुवात केली.तिच्या हातात फक्त दीड दिवस होता तिच कौशल्य सिद्ध करण्या करता.सगळ्या भिंतींना हलका पिवळा रंग रघुनाथने लावला होता.एक बाजू अर्धवट राह्यली होती ती राजेश्वरीने पूर्ण केली.कुठलं चित्र सुजय राजांना आवडेल? राजेश्वरीचा हात भरभर काम करत होता.भिंतीवर चित्राचा आराखडा तयार करून तिने अभिप्राय विचारण्याकरता रघुनाथकडे पाह्यले तो पुन्हा ग्लानीत होता,तिला थांबायला वेळ नव्हता.सारा दिवस न खाता पिता ती अहोरात्र काम करत होती.चित्र पूर्ण होणे निव्वळ अशक्य होते.पहाटे सुदर्शन महाराज स्वतःच सुजय राजांच्या खोलीत आले,समोरचे चित्र बघून ते थक्क झाले.वा !अर्धवट चित्र इतके सुंदर दिसते आहे तर पूर्ण झाल्यावर किती छान दिसेल !राजेश्वरी पोरी तू खरोखर एक उत्तम कलाकार आहेस.तुला ओळखण्यात आम्ही कमी पडलो हे कबूल करायला आम्हाला जराही संकोच वाटत नाही.चित्राकडे एकटक बघत महाराज एव्हढ बोलून थांबले अन आपल्याच विचारात दंग झाले.राजेश्वरी हात जोडून समोर उभी होती.इतक्यात महाराज एकाएकी आठवण झाल्यासारखे म्हणाले हे चित्र खूप छान आहे पण सुजय राजांच्या खोलीत छे बुवा मी आधीच सांगायला हवे होते.बावरलेल्या राजेश्वरीला गोंधळात ठेवून ते माघारी वळून निघून पण गेले.चित्राचं काय करायचं तेच तिला कळेना.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू देण्यापूर्वीच तिने स्वच्छ गार पाण्याचा हबकारा तोंडावर, डोळ्यावर मारला.थोड्यावेळ विचार करून तिने पुन्हा चित्र पूर्ण करण्याचा निश्चय केला.
                      राजेश्वरी कितीवेळ चित्रात गुंतली होती हे तिलाच कळल नाही.ती भानावर आली तीच मुळी वा !अप्रतिम !अति सुंदर !या शब्दांनी.महालाच्या दारातून आत येत एक अत्यंत देखणा तरुण तिच्या चित्राची मुक्त कंठाने तारीफ करत होता. 

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ... : श्री ...

शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

                                                 श्री                                         16
                         राजेश्वरी नमस्कार करून किती तरी वेळ उभी होती.महाराज म्हणाले ही झाडं कुणी लावली?अन हे कारंज हे कुणी सुरु केलं?त्यांना खर म्हणजे या प्रश्नाच उत्तर माहीत होतं,राजेश्वरी घाई घाईने स्पष्टीकरण देऊ लागली,इथे फारच गवत वाढलं होतं,कारंजात कचरा कुजून घाण वास येत होता,मनातल्या मनात राजेश्वरी चांगलीच घाबरली होती कारण ही जागा आपली नसताना त्यात आपण मूळ मालकाला न विचारता बदल केले हे आपलं चुकलच आहे ह्या विषयी तिला अजिबात शंका वाटत नव्हती,पण अश्या अडचणीच्या प्रसंगी बापू पण बरोबर नाही.सुदर्शन महाराज एकटेच कसे काय आले?तिच्या मनातले सगळे प्रश्न समजल्या सारखे महाराज बोलू लागले.
                                  महाराज म्हणाले की राजेश्वरीचे त्यांना फार कौतुक वाटले.आता अर्थातच महाराज वेगळ्याच कारणाने तिथे आले आहेत.मग महाराजांनी तिला रघुनाथच आजारपण,सुजय राजांच्या खोलीचे अर्धवट राहयलेले रंगकाम.रघुनाथने सुचविलेले राजेश्वरीचे नाव अन त्याला महाराजांनी केलेला विरोध असं सगळं तपशीलवार सांगितलं अन मग महाराज म्हणाले की रंगकाम करण्याचा राजेश्वरीला कितपत अनुभव आहे माहीत नाही पण तरी सुजय राजे येण्याची वेळ अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे ते तिला ही संधी देऊ इच्छितात.
                                राजेश्वरीचा थोड्यावेळ स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना,जरा वेळाने तिने ही जवाबदारी घ्यायला तयार असल्याचे महाराजांना सांगितले.महाराजांनी तिला लगेच राजवाड्यावर येण्याचा हुकुम सोडला,राजेश्वरीने नम्र शब्दात त्यांना जाणीव करून दिली की इथे रघुनाथने तयार केलेला रंग आहे आणी तोच बरोबर नेणे आवश्यक आहे.महाराजांनी तिला गाडीतून सर्व सामान घेऊन येण्यास सांगितले.राजेश्वरीकरता राजवाड्यातून गाडी जाणार हे राजवाड्यात सगळ्यांनाच समजले.प्रत्येकाला राजेश्वरीचा कौतुक मिश्रित हेवा वाटू लागला.