बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                             २९
                    संध्याकाळी दिवेलागणीला राजेश्वरी उठून बसली पण आपल्याच मनाशी विचार करत होती,खोलीतून बाहेर यावेसे वाटत नव्हते.सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा न बोलून बरच काही बोलत होत्या त्यापेक्षा इथेच बरे,पण आपण काही गुन्हा केला आहे का?त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नाला खरे उत्तर ध्यावे का?नाही नकोच उगीच फालतू चर्चा! राजेश्वरीने सगळ्यांना आवडेल असे उत्तर द्यायचे ठरवले.
                  रात्री जेवायच्या ठिकाणी ती स्वतःच गेली अन तिने रघुनाथला उद्देशून पण सगळ्यांना ऐकायला जाईल अश्याप्रकारे सांगायला सुरुवात केली"तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता असेल की मी रात्रभर कुठे होते,मी संध्याकाळी काम आटोपून सौधावर उभी होते.अगदी अंधारून आले म्हणून मी खाली उतरून तिथल्याच एका खोलीत कसला तरी आवाज आला म्हणून डोकावले अन तिथेच चक्कर येऊन पडले.खोलीत अंधार असल्यामुळे कदाचित मी कोणाला दिसले नसेन,सकाळी शुद्धीत आल्यावर मी लगेच आपल्या खोलीवर आले बस एवढेच.सगळ्यांना खात्री होती की हे त्या स्त्रीचेच काम असावे कारण राजेश्वरी सारख्या तरुण मुलीला उगीचच चक्कर कशी येईल  आणी सगळ्यांनी एकमेकाला बजावले की संध्याकाळ व्हायच्या आत सगळे एकत्र दिसले पाहिजे.राजेश्वरीने जोरात मान हलवून रुकार दिला,तिने हळूच रघुनाथकडे बघितले त्याचा चेहेरा निर्विकार होता.
                    पुढचे आठ दिवस सगळ्यांनाच फार धांदलीचे गेले.राजांनी सगळा किल्ला,राजमहाल स्वतःच्या देखरेखीखाली स्वच्छ करून घेतला. किल्ल्यातला राजमहाल आता खरोखर नटला होता.चारीकडे फुलबाग, वेगवेगळ्या  आकाराची कारंजी,इकडून तिकडे उडणारी फुलपाखरं ,अन वस्तीला येऊ बघणारे पक्षी,मुख्य म्हणजे माणसांची वर्दळ यामुळे राजमहाल फारच शोभिवंत दिसू लागला होता.सुजयराजांचे मित्र दोन दिवसांनी इथेच राह्यला येणार होते.मेजवानीचा मोठाच बेत राजांनी आखला होता त्याची जय्यत तयारी सुरु होती.रंगीबेरंगी गालिचे,पडदे हंड्या झुंबर अन आणखी कितीतरी वस्तूंनी राजमहालाच्या सगळ्या खोल्या आकर्षक दिसू लागल्या होत्या.माखन सांगेल त्याप्रमाणे खोल्यांची सजावट केली जात होती.स्वतः सुजयराजे दिवसातून दोन वेळा येऊन कामाची खातरजमा करून घेत होते.त्या महालात राजेश्वरीचे चित्र पूर्ण झाल्यावर सुजयराजांना निरोप दिल्यावर ते लगेच आले.लहान मुलाच्या उत्सुकतेनी त्यांनी चित्र बघून त्याची खूप तारीफ केली,पण राजेश्वरीला का कोण जाणे असं वाटलं की बहुदा त्यांना विशेष आवडले नसावे.एकच भिंत राह्यली होती त्या  भिंतीला फक्त रंग लावून ठेवायला सांगून सुजयराजे निघून गेले.
      

                                               सौ.उषा.

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री २८ अलगद पाय टाकत राजे...

मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                      २८
                         अलगद पाय टाकत राजेश्वरी पुढे निघाली.ती दोन्ही हातांनी चाचपडत चालत होती.डोळे अंधाराला सरावले होते.पुष्कळ वेळ चालल्यावर तिला माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला,थोड्या प्रकाशाची तिरीप पण दिसू लागली होती,आपल्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज फार जोरात येतो आहे असं वाटून ती आणखीच जपून चालत होता आता ती पुढे पाऊल टाकणार तोच एका मजबूत हाताने तिचे तोंड दाबून धरले.घाबरलेल्या राजेश्वरीने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला नाही,कसंबसं स्वतःला सावरून तिने डोळे घट्ट मिटून घेतले.आता जे काय होईल त्याला सामोरं जायला हवं अशी मनाची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती.तिला जवळ जवळ ओढत,फरफटत  त्या व्यक्तीने एका ठिकाणी आणले,कुठलेसे दार उघडून तिला आत ढकलून त्याने पुन्हा दार लावून घेतले.एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली राजेश्वरी तिथेच बेशुद्ध होऊन पडली.
                            सकाळी जाग आल्यावर ती पटकन उठून बसली.आपण आहो तरी कुठे हे बघण्या करता ती इकडे तिकडे बघू लागली.ही जागा आपल्या ओळखीची आहे नक्कीच राजेश्वरी आनंदाने बघू लागली त्या आरश्याकडे.होय ही तीच खोली आहे आरश्याची जादू असलेली.पण आपल्याला तर कित्येक कोस चालल्या सारखे वाटते आहे.पाय किती दुखताहेत.हातालाही खूप खरचटलं आहे.उजवा हात तर दुखतो पण आहे.बाहेर उजाडले होते,राजेश्वरी हळूहळू आपल्या खोलीत आली.
               राजेश्वरी रात्रभर न आल्याने सगळ्यांनाच खूप काळजी वाटत होती.सगळीच रात्रभर जागी होती.रघुनाथने सगळ्यांच्या देखत तिला जोरात थप्पड मारली.राजेश्वरी रडत रडत रघुनाथच्या गळ्यात पडली.बापू मी आता नाही जाणार मला माफ कर असे म्हणून पण रघुनाथचा राग ती शांत करू शकली नाही.
                दिवसभर राजेश्वरी खोलीत झोपून होती.तिला चांगलाच ताप भरला होता.रघुनाथने तिला कसलासा पाला उकळून काढा करून प्यायला लावला पण अजूनही त्याचा राग गेला नव्हता.कालपासून राजेश्वरी अन रघुनाथ उपाशीच होते.रघुनाथ खोलीचे दार लोटून राजमहालाच्या कामाला निघून गेला.राजेश्वरीचे विचारचक्र एकीकडे सुरूच होते.मी पुन्हा तिथे जाणार नाही असं म्हणत असतानाच तिचे आतले मन म्हणत होते मी पुन्हा नक्कीच तिथे जाईन,पुरत्या तयारीनिशी,तिला स्वतःचेच एकीकडे नवल वाटत होते,या रहस्याचा उलगडा करून तिचा कोणचाच फायदा नव्हता,हे काम संपल्यावर त्यांना इथून लवकरच जायचे होते.तिच्या उजव्या हाताला ठणका लागला होता त्याच्याकडे मधून मधून तिचे लक्ष जात होते.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता.


                                        सौ.उषा.    
                

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री २७ राजेश...

सोमवार, २८ नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                    श्री                                              २७
                            राजेश्वरी आता पुन्हा एकदा मनापासून काम करते आहे हे बघून रघुनाथ पण आनंदात होता.कुठले चित्र काढणार हा प्रश्न त्याने विचारण्याच्याआत राजेश्वरीच म्हणाली बापू आता दोन तीन दिवस इकडे कुणी फिरकायचं नाही अगदी तू सुद्धा तरच मी चित्र काढते.रघुनाथ मनातल्या मनात कपाळाला हात लावत बाहेर पडला.या आई वेगळ्या मनस्वी मुलीला वाढवताना त्याला फार कष्ट पडले होते.राजेश्वरीला खात्री होती कुणी येणार नाही पण सुजयराजांना कोण अडवणार ?या महालाचे मोठ्ठे दार लावणे म्हणजे काही गम्मत नाही,तिने सरळ रघुनाथलाच दारात बसून राहण्याचा हुकुम सोडला.रघुनाथ बिचारा दारात पहारा देत बसला.त्याला एकीकडे बरेही वाटत होते.राजेश्वरीच्याच परवानगीने राजेश्वरीवर नजर ठेवता येत होती.
                          राजेश्वरी अगदी तल्लीन होऊन चित्र काढत होती.सुजयराजे दोन तीन दिवस लागोपाठ येऊन गेले पण त्यांना चित्र बघण्याची परवानगी नव्हती.राजेश्वरीने आता रात्री पण तिथेच राहण्याचा निश्चय केला.चित्राच्या बाबतीत तिला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता,चित्र जवळ जवळ पूर्ण होत आले होते.शेवटचा हात उद्या फिरवू म्हणजे फक्त एक भिंत राह्यली ते काम बापूच्या  मदतीने करणार होती.
                       तिन्हीसांजा झाल्याने नीट दिसत नव्हते म्हंणून काम थांबवून राजेश्वरी तिच्या आवडत्या ठिकाणाकडे म्हणजेच सौधाच्या दिशेनी जाऊ लागली,रघुनाथने तिला अडवण्याचा प्रयत्न केला पण मग तिला लवकर अंधाराच्या आत खोलीत ये असे सांगून तो खोलीकडे निघून गेला.एक एक पायरी चढताना राजेश्वरीला त्या दिवसाची आठवण येऊ लागली ती स्त्री इथेच येऊन नाहीशी झाली होती.तिने प्रत्येक पायरी बघायला सुरुवात केली.प्रत्येक पायरीवर स्वस्तिक काढले होते फक्त एकाच पायरीवर कमळ होते.तिने कमळाच्या प्रत्येक पाकळीला हलवून पाह्यले.छे.काहीच नाही .पण ती स्त्री तर इथेच येऊन नाहीशी झाली होती.राजेश्वरीने आठवून बघितले ती खाली बसली होती,बरोबर! राजेश्वरीने पुन्हा पहिल्या पायरीपासून सुरवात केली.प्रत्येक पायरीवर बसून ती आजूबाजूला चाचपून बघत होती.एका ठिकाणी पायरीजवळ पण भिंतीत असलेल्या उठावदार कमळाकडे तिचे लक्ष गेले,तिने असे कमळ पूर्वी बघितले होते.तिने कमळाची पाकळी हलवायला सुरुवात केली.एक दोन तीन चार अन पाच,राजेश्वरीच्या पायाखालची पायरी सरकली अन काही कळायच्या आत ती  एका अंधाऱ्या जागेत पडली,जरी धीट असली तरी या अनपेक्षित प्रकाराने राजेश्वरी पुरतीच घाबरली.सगळीकडे अगदी काळोख अन काळोख होता.थोड्यावेळ पडल्या जागीच बसून राह्यल्यावर राजेश्वरी उठून उभी राह्यली कुठवर चालत जावे लागणार आहे माहित नाही अन पुढे कुठले संकट आहे तेही माहीत नाही.कधी नव्हे ते राजेश्वरीचे डोळे भरून वाहू लागले.मला माझ्या बापूकडे जायचे आहे पण कसे?
                                    सौ.उषा.

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: ... : ...

रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                     श्री                                                २६
               राजेश्वरी पाठलाग  करत निघाली खरी पण आपण नेहेमी बरोबर घेतो ती काठी घेतली नाही अन बापूला निदान सांगायला तरी हवे होते असे तिला वाटू लागले,तिला पाठलाग करताना पाहून इकडे त्या स्त्रीने आपली गती वाढवली,आज या प्रकरणाचा छडा लावायचाच असे ठरवून राजेश्वरी पण तिच्या मागे निघाली.ती सौधाकडे जाणाऱ्या जिन्याकडे जाऊ लागल्यावर राजेश्वरी पण धीटपणे निघाली.तिला पायऱ्या चढताना बघून राजेश्वरी ओरडली ए थांब कोण आहेस तू?आता ती स्त्री चक्क पायरीवर बसलेली दिसत होती अन राजेश्वरी तिला गाठणार तोच ती नाहीशी झाली.
                     राजेश्वरी पायरीजवळ आल्यावर तिच्या मनात एक विचार आला अन ती तो अमलात आणणार इतक्यात तिला रघुनाथचा आवाज आला अन त्याच्या बरोबर  कंदील काठ्या घेऊन येत असलेले  बरेच लोक दिसले.ती मागे फिरली,तिच्या चेहेऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.रघुनाथ तिला खूप रागावला.त्याला न उठवता एकट्यानेच जाऊन राजेश्वरीने चांगले केले नाही असे बाकीच्या लोकांचे पण मत पडले.तिला घेऊन सगळे परत निघाले. खाली मान घालून राजेश्वरी चुपचाप ऐकून घेत होती.खोलीवर आल्यावर रघुनाथने तिला चांगलेच फैलावर घेतले.राजेश्वरी हळू आवाजात फक्त एव्हढच म्हणाली की मला हे रहस्य उलगडून काढायचे आहे कारण इथल्या लोकांच्या मनातली भीती मला दूर करायची आहे.रघुनाथ पाठ करून झोपून गेला.
                                पुढचे आठ दहा दिवस राजेश्वरीने कामाला वाहून घेतले.रघुनाथने सिव्हासनाच्या मागच्या भिंतीवर रथारूढ सूर्यनारायणाचे अप्रतिम चित्र काढले होते,आकाशी रंगाच्या पार्श्वभूमीवर ते फारच सुंदर दिसत होते.सुजयराजे रघुनाथवर प्रसन्न होते. उजवीकडच्या भिंतीवर राजेश्वरीने चित्र काढावे अशी त्यांची इच्छा होती अन त्याप्रमाणेच राजेश्वरी कामाला लागली होती. 
                                                           सौ.उषा.