गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: श्...
usha-ushagmailcom.blogspot.com: श्...: श्री १३ राजेश्वरीला एकटीला सोडून जाताना आज प...
श्री १३
राजेश्वरीला एकटीला सोडून जाताना आज पहिल्यांदाच रघुनाथ अस्वस्थ झाला होता.त्या दोघानाही अश्या पडक्या लोकांनी टाकून दिलेल्या वास्तूत राह्यची सवय होती.अश्या जागेत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे राजेश्वरीला लहानपणापासून उत्तम ज्ञान होते,तरीही रघुनाथ बेचैन होता.
राजेश्वरीला मात्र कधी एकदा पुन्हा राजमहाल नीट पाहते असे झाले होते.रघुनाथ गेल्यावर तिला आता संध्याकाळ पर्यंत वेळच वेळ होता.तिने आपल्या नव्या बागेकडे मोर्चा वळवला.कालच्या पेक्षा आज बाग जास्त छान दिसत होती.काही रोपटी मलूल झाली होती पण दोन तीन दिवसात ती पुन्हा टवटवीत होतील याची राजेश्वरीला पुरती खात्री होती.बाग तर लावली आता पाणी घालावं लागणार अन तेही किती लांबून पार राजमहालाच्या पिछाडीला एक तलाव होता त्यातून.इतक्यात जवळच असलेल्या कारंज्याकडे तिचे लक्ष गेले,ह्यात पाणी काय तलावातून आणून टाकतात छे.बुद्धीला पटत नाही.तिने लगेच काठी कोयता अशी आपली अवजारं आणून कारंज्यात साठलेला कचरा उपसायला सुरुवात केली.कारंज घासून काढलं.वाघ्याच बारीक आवाजातलं भुंकण ऐकून थोडं थांबून ती वाघ्याशी खेळू लागली.राजेश्वरीच्या पाठीमागे धावून ते इवलेसे पिल्लू पार दमून गेले,राजेश्वरीने हसून त्याला उचलून घेतले आपसूकच तिची पावलं त्या खोलीकडे वळली.ती हळूच आत डोकावली आरसा भिंतीवरच होता.वळून माघारी जाणार तोच तिला बैलगाडीचा आवाज आला,बापू आलेला दिसतोय त्याला बहुतेक चैन पडले नसावे.राजेश्वरी धावत निघाली.आल्यावर तिने बघितले की कारंजातून सगळीकडे पाण्याचे तुषार उडत होते,तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.मी आताच तर स्वच्छ केलं ,एव्हाना बैलांना सोडून रघुनाथ पण या आनंददायक दृह्शात सामील झाला होता.पाण्याच्या शिडकाव्याने मातीचा सुगंध सगळ्या आसमंतात पसरला होता.
काय केलस ?रघुनाथच्या या प्रश्नावर नाही फक्त स्वच्छ केलं कारंज राजेश्वरी म्हणाली . दोघ बापलेक कितीतरी वेळ तिथेच बसून गप्पा करत होते.कालची रात्रीची घटना ऐकून महाराजांनीच रघुनाथला लवकर घरी पाठवले होते.त्यांनी पुन्हा एकदा दोघांना राजवाड्यात राह्यला येण्याची सूचना केली होती.राजेश्वरीच मात्र या राजमहालाबद्दल कुतूहल वाढत चाललं होतं.मास्तरांनी एखाद अवघड गणित घालाव अन विध्यार्थ्यांने ते चुटकी सरशी सोडवून पुढल्या अवघड गणिताची वाट पहावी असं काहीसं तिचं झालं होतं.तो सगळा परिसर तिला आवडू लागला होता.
सौ.उषा.
बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११
usha: usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom....
usha: usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom....: usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ... : usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: ... : श...
श्री 12
संध्याकाळी अगदी अंधार पडे पर्यंत दोघांनी आधी उंच वाढलेले गवत कापून काढले.राजेश्वरी ठरवूनही आदल्या दिवशी हे काम करू शकली नव्हती.मारोती मंदिर साफ करण्यात कितीतरी वेळ गेला होता.गवत कापल्याने रस्ता छान दिसू लागला होता.निदान दोन तरी रोपं आज लावायचीच असे ठरवून रघुनाथने त्याला आवडलेल्या जांभळ्या अन पिवळ्या फुलांची रोपं जमिनीत रोवून आजच्या दिवसाचे काम संपविले.तुळशी करता वेगळी जागा त्याने बघून ठेवली होती.राजेश्वरीने केलेल्या कालवणाचा सुवास भुकेची जाणीव करून देत होता.
संध्याकाळी अगदी अंधार पडे पर्यंत दोघांनी आधी उंच वाढलेले गवत कापून काढले.राजेश्वरी ठरवूनही आदल्या दिवशी हे काम करू शकली नव्हती.मारोती मंदिर साफ करण्यात कितीतरी वेळ गेला होता.गवत कापल्याने रस्ता छान दिसू लागला होता.निदान दोन तरी रोपं आज लावायचीच असे ठरवून रघुनाथने त्याला आवडलेल्या जांभळ्या अन पिवळ्या फुलांची रोपं जमिनीत रोवून आजच्या दिवसाचे काम संपविले.तुळशी करता वेगळी जागा त्याने बघून ठेवली होती.राजेश्वरीने केलेल्या कालवणाचा सुवास भुकेची जाणीव करून देत होता.
रात्री जेवून सतरंजीवर पडल्या पडल्या रघुनाथला गाढ झोप लागली.राजेश्वरी कितीतरी वेळ जागीच होती.केव्हा तरी अर्धवट झोपेत तिला कुणीतरी गाणं म्हणत असल्याचा भास झाला.खर तर तिला अजिबात उठायची इच्छा नव्हती पण मनातली उत्सुकता तिला झोपू पण देणार नव्हती.ती हळूच उठली,खोलीबाहेर डोकावून बघण्याचा मोह आवरून तिने रघुनाथला हलवून जागे केले.त्रासलेल्या रघुनाथच्या तोंडावर हात ठेवून तिने बाहेर खूण केली.विस्फारलेल्या डोळ्यांनी दोघही बघू लागले.एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली स्त्री गाणं म्हणत होती.स्वतःच्या एकटेपणाची कुठलीच भीती बहुदा तिला नसावी.रघुनाथ उठून तर बसला पण तिचा पाठलाग करावा की नाही या संभ्रमात असतानाच ती स्त्री कुठे तरी नाहीशी झाली.उरलेली रात्र दोघांनी जागूनच काढली.
सकाळी रघुनाथ म्हणाला तू चल माझ्या बरोबर मी सांगतो महाराजांना.राजेश्वरीने स्पष्ट नकार दिला.बापू मला अजिबात भीती वाटत नाही.तुम्हीच मला लहानपणापासून शिकविले,आणी आता तुम्हीच,रघुनाथने मान हलविली.नाही पण पोरी मला यायला किती रात्र होते,अन अश्या ओसाड जागेत तू एकटी, छे.पटत नाही.बापू माझ्या सोबतीला आता बरीच मंडळी आहेत हं.ए तुझ नाव काय ठेवायचं वाघ्या म्हणू का ?कुत्र्याच्या पिल्लाने समजल्या सारखी मान हलवली,शिवाय आपण काल आणलेली रोपं ती मात्र तुम्ही जायच्या आधी सगळी लावून जा.रघुनाथला माहिती होतं आता राजेश्वरी ह्या रहस्याची उकल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.राजेश्वरीला आरसा खुणावत होता.कधी एकदा काम संपतं अन आज जाऊया का त्या खोलीत ?
सौ.उषा.
सकाळी रघुनाथ म्हणाला तू चल माझ्या बरोबर मी सांगतो महाराजांना.राजेश्वरीने स्पष्ट नकार दिला.बापू मला अजिबात भीती वाटत नाही.तुम्हीच मला लहानपणापासून शिकविले,आणी आता तुम्हीच,रघुनाथने मान हलविली.नाही पण पोरी मला यायला किती रात्र होते,अन अश्या ओसाड जागेत तू एकटी, छे.पटत नाही.बापू माझ्या सोबतीला आता बरीच मंडळी आहेत हं.ए तुझ नाव काय ठेवायचं वाघ्या म्हणू का ?कुत्र्याच्या पिल्लाने समजल्या सारखी मान हलवली,शिवाय आपण काल आणलेली रोपं ती मात्र तुम्ही जायच्या आधी सगळी लावून जा.रघुनाथला माहिती होतं आता राजेश्वरी ह्या रहस्याची उकल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.राजेश्वरीला आरसा खुणावत होता.कधी एकदा काम संपतं अन आज जाऊया का त्या खोलीत ?
सौ.उषा.
मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ११ स्वतःच्या श्वासाचा आवाज...
श्री ११
स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा मोठ्ठा वाटावा अशी शांतता सगळीकडे होती.थंडी वाजत नसताना सुद्धा तिने चादर अंगावर लपेटून घेतली,जेमतेम डोळे उघडे राहतील एव्हढीच ओढणी डोक्यावर घेतली.भूक लागली होती पण बापू !छे बुवा आपण उगीचच राह्यलो घरी,विचारात दंग झालेल्या राजेश्वरीला जाग आली ती रघुनाथच्या आवाजाने,तिने बापूला घट्ट मिठी मारली.किंचित तक्रारीच्या स्वरात म्हणाली उद्यापासून मी पण येणार तुमच्या बरोबर.रघुनाथने तिला सांगितले की मोठ्या मुश्किलीने तिच्या राहण्याची परवानगी मिळाली आहे आता उगीचच हट्ट करून तिने हाती आलेले काम घालवू नये.राजेश्वरीला वाटलं सांगावा का तो आरश्याचा किस्सा ?पण नकोच बापू उलट तिलाच घाबरली म्हणून चिडवायचा त्यापेक्षा आपणच उद्या पुन्हा त्या खोलीत जाऊन बघू.
जेवण झाल्यावर रघुनाथ उद्या न जाता परवा राजवाड्यावर जाणार आहे हे कळल्यावर राजेश्वरी सगळा राग विसरून शांत झोपी गेली.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून दोघं बापलेक नेहेमीचं सामान घेऊन जंगलाकडे निघाले.फुलं गोळा करणं मोठच आनंददायक काम.चांगली मोठं टोपलं भरून फुलं जमा झाल्यावर सरपण गोळा करण्यात दोघांचा बराच वेळ गेला.आता सूर्यनारायण आकाशात आले म्हटल्यावर पाखरांचा चिवचिवाट जास्तच वाढला होता. फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे मस्त उडत होते.अचानक राजेश्वरीच्या मनात आले ह्यातली काही झाडं आपण त्या ओसाड वाड्याच्या अंगणात लावली तर आपल्याला बोलायला जिवंत पानं फुलं,अन त्यांच्या मोहानी आलेल्या फुलपाखरांची भुंग्यांची तरी निदान सोबत होईल,लगेचच तिने बापूला आपली कल्पना बोलून दाखवली, रघुनाथने तत्काळ होकार दिला.हातातलं सामान खोलीवर ठेवून राजेश्वरी पुन्हा जंगलाकडे गेली,रघुनाथने पुष्कळ रोपं काढून ठेवली होती ती सगळी राजेश्वरीने टोपल्यात ठेवली अन दोघं बापलेक खोलीकडे निघाले,मारोती मंदिरा जवळ आल्यावर रघुनाथच लक्ष गेलं,मंदीर स्वच्छ केल्याबद्दल त्याने राजेश्वरीच कौतुक केलं.
रघुनाथ घरी नाही असे बघून राजेश्वरी राजमहालातल्या त्या खोलीत डोकावून आली होती.मोठ्ठा आरसा समोर
होता.आपल्याला काहीपण भास होतो काल रात्री कंदील बहुतेक भलत्याच भिंतीवर
धरला होता.स्वतःच्या मूर्खपणावर तिला स्वतःलाच हसू आलं.राजेश्वरीचा स्वैपाक अन इतर कामं होईपर्यंत रघुनाथ पुन्हा एकदा बैलांना घेऊन जंगलात जाऊन आला होता त्याने भरपूर हिरवी पानं अन जांभळ्या रंगाची फुलं आणली होती.एक मोठा दगड कोरून त्याने मारोती पुढे लावायला दिवा पण तयार केला.
सौ.उषा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)