गुरुवार, १० नोव्हेंबर, २०११

श्री १३
राजेश्वरीला एकटीला सोडून जाताना आज पहिल्यांदाच रघुनाथ अस्वस्थ झाला होता.त्या दोघानाही अश्या पडक्या लोकांनी टाकून दिलेल्या वास्तूत राह्यची सवय होती.अश्या जागेत स्वतःचे संरक्षण कसे करावे याचे राजेश्वरीला लहानपणापासून उत्तम ज्ञान होते,तरीही रघुनाथ बेचैन होता.
राजेश्वरीला मात्र कधी एकदा पुन्हा राजमहाल नीट पाहते असे झाले होते.रघुनाथ गेल्यावर तिला आता संध्याकाळ पर्यंत वेळच वेळ होता.तिने आपल्या नव्या बागेकडे मोर्चा वळवला.कालच्या पेक्षा आज बाग जास्त छान दिसत होती.काही रोपटी मलूल झाली होती पण दोन तीन दिवसात ती पुन्हा टवटवीत होतील याची राजेश्वरीला पुरती खात्री होती.बाग तर लावली आता पाणी घालावं लागणार अन तेही किती लांबून पार राजमहालाच्या पिछाडीला एक तलाव होता त्यातून.इतक्यात जवळच असलेल्या कारंज्याकडे तिचे लक्ष गेले,ह्यात पाणी काय तलावातून आणून टाकतात छे.बुद्धीला पटत नाही.तिने लगेच काठी कोयता अशी आपली अवजारं आणून कारंज्यात साठलेला कचरा उपसायला सुरुवात केली.कारंज घासून काढलं.वाघ्याच बारीक आवाजातलं भुंकण ऐकून थोडं थांबून ती वाघ्याशी खेळू लागली.राजेश्वरीच्या पाठीमागे धावून ते इवलेसे पिल्लू पार दमून गेले,राजेश्वरीने हसून त्याला उचलून घेतले आपसूकच तिची पावलं त्या खोलीकडे वळली.ती हळूच आत डोकावली आरसा भिंतीवरच होता.वळून माघारी जाणार तोच तिला बैलगाडीचा आवाज आला,बापू आलेला दिसतोय त्याला बहुतेक चैन पडले नसावे.राजेश्वरी धावत निघाली.आल्यावर तिने बघितले की कारंजातून सगळीकडे पाण्याचे तुषार उडत होते,तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.मी आताच तर स्वच्छ केलं ,एव्हाना बैलांना सोडून रघुनाथ पण या आनंददायक दृह्शात सामील झाला होता.पाण्याच्या शिडकाव्याने मातीचा सुगंध सगळ्या आसमंतात पसरला होता.
काय केलस ?रघुनाथच्या या प्रश्नावर नाही फक्त स्वच्छ केलं कारंज राजेश्वरी म्हणाली . दोघ बापलेक कितीतरी वेळ तिथेच बसून गप्पा करत होते.कालची रात्रीची घटना ऐकून महाराजांनीच रघुनाथला लवकर घरी पाठवले होते.त्यांनी पुन्हा एकदा दोघांना राजवाड्यात राह्यला येण्याची सूचना केली होती.राजेश्वरीच मात्र या राजमहालाबद्दल कुतूहल वाढत चाललं होतं.मास्तरांनी एखाद अवघड गणित घालाव अन विध्यार्थ्यांने ते चुटकी सरशी सोडवून पुढल्या अवघड गणिताची वाट पहावी असं काहीसं तिचं झालं होतं.तो सगळा परिसर तिला आवडू लागला होता.
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: