शनिवार, ५ मे, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                                श्री                                         58
सुकन्या झोपली पण सुवर्णरेखा रुसुन बसली होती तिची राजेश्वरीने 
कशीबशी समजूत काढली.संध्याकाळी तिला बरोबर न्यायचे कबूल केले 
तेव्हा कुठे तिचा राग शांत झाला.
                 संध्याकाळी राजेश्वरीने सुकन्या अन सुवर्णरेखा दोघींना 
तयार केले आणी मग त्या तिघी फिरायला बाहेर पडल्या.त्यांच्यामागे
सुरक्षित अंतर ठेवून सुजयराजे अन माखन पण बाहेर पडले.राजमहालाभोवती  
असलेल्या बागेत फिरायचे त्यांनी ठरवले.
बागेत आल्यावर सगळेच खूप आनंदित झाले.तिथली हिरवळ,सुंदर रंगीबेरंगी 
फुल,फुलपाखर सगळेच आनंददायी.सुकन्याच्या डोळ्यात निरागस 
भाव होते.तिथले विकृत क्रूर भाव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते.
सुजयराजांना इतक्या लांबून हा बदल जरी दिसत नसला तरी त्यांचे  हावभाव एकदाही आवाज न चढता होत असलेले संभाषण त्यांना सुखावून जात 
होते.हळूहळू रात्रीच्या दिशेनी दिवसाची वाटचाल सुरु झाली होती.       रात्रीचा अंधार जरी आता सगळीकडे पसरू लागला असला तरी वर 
आकाशात नक्षत्रांचा खच पडला होता.पौर्णिमा जवळ असल्याने असेल 
पण चंद्रबिंब पण चांगलेच मोठे दिसत होते.त्या गूढ रम्य प्रकाशात सुकन्या 
राजेश्वरी अन सुवर्णरेखा चढाओढीने सुस्वरूप दिसत होत्या.त्या दिव्य
सौंदर्याकडे सगळेच भान हरपून बघत होते.सुकन्याच काय सुवर्णरेखा सुद्धा 
तिथून उठायला तयार होईना.रात्र सुद्धा इतकी सुंदर असते हे त्यांना आज कळले 
होते.दोघींच्याही डोळ्यात राजेश्वरीबद्दल होते फक्त प्रेम अन आदर.
                                           सौ.उषा 
 


रविवार, २९ एप्रिल, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य:                                                श्री                                     ५७ राजेश्वरी लगेच उत्साहाने म्हणाली आपण माझ्या...

किल्ल्याचे रहस्य

                                               श्री                                     ५७
राजेश्वरी लगेच उत्साहाने म्हणाली आपण माझ्यावर विश्वास ठेवा मी आपणास कधीच निराश करणार नाही.त्यांना कुठल्याही कामाची सवय नाही हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे पण काही गोष्टी ते उत्कृष्टपणे करू शकतात आपण त्यांच्याकडून तेच काम करून घेऊ.सुकन्याने मान हलवून होकार दिला.राजेश्वरीच्या बोलण्याला सुकन्या सहज तयार झालेली बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटले.
                        आता राजेश्वरी उत्साहाने कामाला लागली.रोजच्या दरबाराच्या वेळेस कसेही करून राजेश्वरीला गुंतवून ठेवणे काही दिवस तरी फार गरजेचे होते.तिने भल्या पहाटे सुकन्याला उठवून बळे बळे भुयारातून बाहेर आणले.सकाळच्या प्रसन्न वाऱ्याने त्या दोघींचे स्वागत केले.सुकन्या डोळे विस्फारून सगळा परिसर अगदी लहान मुलाच्या उत्साहाने बघू लागली.फुलांचे असंख्य प्रकार तिला खुणावत होते.
 सुर्योदया पूर्वी सगळा आसमंत एका वेगळ्याच दैवी सुगंध अन प्रकाशाने भरलेला होता.कुणाला काहीच न बोलता बरेच काही समजत होते.सुकन्याचा एरवी चिडका रागीट दिसणारा चेहेरा या क्षणी आनंदित दिसत होता.तिने राजेश्वरीचा हात घट्ट धरून ठेवला जणू काय या क्षणाचा आनंदच ती मुठीत धरून ठेवत होती.राजेश्वरी पण तिच्या या आनंदात सहभागी झाली होती.
 दूर क्षितिजावर सूर्यबिंब दिसू लागले आणी राजेश्वरीने सुकन्याला महालात चलण्याची विनंती केली.आज पुष्कळ दिवसांनी सुकन्या अश्या मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात आली होती.तिच्या तब्बेतीला ते कितपत मानवेल हे काही सांगता येत नव्हते.सुकन्याची पुन्हा तळघरात महालात जाण्याची अजिबात इच्चा नव्हती.उद्या पुन्हा आपण येऊ जास्त वेळ थांबू असे समजावून तिला कसेबसे परत आणले होते.आल्यावर आज कुठलाही त्रास न देता सुकन्याने वेणी अंघोळ अन खाणे असे सगळेच राजेश्वरीच्या सांगण्याप्रमाणे बिनबोभाट केले.आणी रोजच्या दरबाराची आठवण पण न काढता सुकन्या झोपून गेली.
                                           सौ.उषा.
       

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                  ५६
सुकन्याच्या तैनातीत राहणे तारे वर चालण्यासारखे कठीण आहे हे लवकरच राजेश्वरीच्या लक्षात आले.एकतर तिला या जीहुजूर करण्याची मुळीच सवय नव्हती पण कंटाळून चालणार नव्हते.तिला सुवर्णरेखेचेच कौतुक वाटत होते ती या सगळ्या नाटकात किती उत्साहाने सहभागी झाली होती.
                 दुसऱ्या दिवशी सुकन्याची लहर सांभाळत एकदाची तिला तयार केले अन राजेश्वरीने सुटकेचा श्वास सोडला.खरतर राजेश्वरीला वेशभूषा रंगभूषा केशभूषा यांचे केशर इतके काय अजिबातच ज्ञान नव्हते.केशरला घालवून आपण चूक केली असे क्षणभर तिच्या मनात आले पण आता मागे जाण्यात अर्थ नव्हता अन ते शक्य पण नव्हते.तिने सुकन्याला अदबीने विचारले की आपणास आता काय खायला आवडेल?तिने सांगितलेले पदार्थ ऐकून राजेश्वरी थक्क झाली.एकतर तिने मुळात ते पदार्थ कधी ऐकलेच नव्हते खाणं तर फार लांबची गोष्ट होती आता काय कराव तिला काही कळेना .इतक्यात छोटी सुवर्णरेखा धावत बाहेर गेली ती जरा वेळाने एका ताटात पुष्कळ पदार्थ घेऊन आली अन सुकन्याला म्हणाली यातले काय आवडेल ते खा त्या पदार्थांवर सुकन्या अगदी तुटून पडली.राजकन्येचे प्रसंगावधान बघून राजेश्वरीला तिचे खूप कौतुक वाटले.कसेही करून केशरला पुन्हा बोलावून घ्यायचे राजेश्वरीने मनाशी नक्की ठरवले.आता दरबाराची वेळ होत आली होती त्याच्या आधी तिला अन राजकन्येला तयार व्हायला हवे होते.
               चार दिवस झाले राजेश्वरीला सुकन्याची सेवा करता करता हे काम तिला मुळीच आवडत नव्हते आज तिने सुकन्याशी धीर करून बोलायचे ठरवले.दरबाराची वेळ होत आली की सुकन्या एकदम खुशीत असायची हीच वेळ साधून तिने सुकन्याला विचारले की महाराणी सुकन्याचे कोमल मन दरबारातल्या रोजच्या त्याच त्या कैद्यांना बघून अन त्यांना त्याच त्या शिक्षा देऊन अगदी कंटाळले असेल तरी मी थोडा बदल सुचवू का ?सुकन्याच्या कपाळाला आठी पडली पण तिला वाटले की न जाणो आपल्या पेक्षाही काही भयंकर शिक्षा ही सुचवणार असेल म्हणून तिने संमती दर्शक मान हलवली पण ती तिच्या चिरक्या आवाजात राजेश्वरीला ओरडून म्हणाली माझ्या कैदेतून मी त्यांना कधीच बाहेर काढणार नाही.राजेश्वरीला एकूणच सुकन्या हे व्यक्तिमत्व फारसं आवडल  नव्हतं पण आता काही उपाय नसल्याने तिने मान हलवली.
 राजेश्वरी एकदम काही सुचल्या प्रमाणे म्हणाली की महाराणी आपण त्या कैद्यांना रोज फटक्यांची शिक्षा देता अन नंतर ते सारा दिवस खाउन पिऊन मजेत घालवतात त्या पेक्षा त्यांच्याकडून दिवसभर आपल्या उपयोगाचे काही काम करून घेतले तर ते आपल्या जास्त फायद्याचे ठरेल अर्थात आपल्याला माझ्यापेक्षा जास्त कळते.सुकन्या थोडी चिडली होती पण रोज तीच शिक्षा अन तेच वातावरण याचा खरं म्हणजे तिला पण कंटाळा आला होता.तिने थोड्या कान्ताल्याने अन किंचित उत्सुकतेने विचारले की या तिघांना कुठल्याही कामाची सवय नाही.

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५५ दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा ...

किल्ल्याचे रहस्य

                                    श्री                               ५५
             दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा जोड देऊन गेली.हा साधा वेश आणी नेहेमीच्या पद्धतीचा,राजेश्वरीला मनापासून आनंद झाला,तिने झटकन त्यातला एक अंगावर चढवला सुद्धा.हल्ली राजेश्वरीला पण जरा आरश्यात डोकवून पाहावेसे वाटू लागले होते.  त्यामुळे अंगावरचा विटका अन फटका कपडा तिने लगेच टाकून दिला.  कपडा अगदी नवा नव्हता केशरनी तिच्या जवळचा एक जोड आणून दिला होता,पण राजेश्वरीच्या कपड्यांपेक्षा नक्कीच चांगला होता.
              कसातरी दिवस घालवून संध्याकाळी राजेश्वरी रघुनाथला घेऊन सौधाकडे गेली.अंधार पडेतो ते बापलेक सभोवतीचा परिसर न्याहाळत उभे होते.मागे कुणाची तरी चाहूल लागली म्हणून तिने सहज वळून पहिले सुजयराजे अन राजकन्या लगबगीने येत होते.त्यांनी हळू आवाजात विचारले आम्हाला उशीर झाला का?राजेश्वरीने नाही अशी मान हलवली,आता मात्र लवकर निघायला पाहिजे.
                 आज सुवर्णरेखा फारच खूष होती.तिला कुणीतरी कसल्यातरी कामात सामावून घेणार याचा तिला अतोनात आनंद झाला होता.इकडे राजेश्वरीला काळजी होती की जर सुकन्याने विचारले की तो दुर्मिळ फुलांचा हार कुठे आहे तर आपण काय उत्तर देणार तिने लगेच ही शंका सुजयराजांजवळ बोलून दाखवली त्यावर त्यांनी तिला काहीतरी कानात सांगितले ते तिला पटले.सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्या पायरी जवळच्याच मार्गाने खाली जायचे नक्की झाले होते.पायरी जवळ येऊन सुजयराजांनी तिथल्या फुलाच्या पाकळ्या फिरवायला सुरवात केली,पायरी बाजूला सरकल्या बरोबर आत लोंबणारा दोरखंड त्यानी धरला अन झटकन आत उतरले,इकडे रघुनाथने पायरी धरून ठेवली होती,हातातली काठी घट्ट धरून राजेश्वरी अन राजकन्या पाठोपाठ आत उतरल्या अन सगळ्यात शेवटी रघुनाथ.राजेश्वरीने रघुनाथचा हात धरला एक तर अंधार होता अन रघुनाथ आज पहिल्यांदाच इथे आला होता.त्या दोघा बापलेकीचे बघून राजकन्या पण कुठूनशी एक काठी घेऊन आली होती.ती अगदी राजेश्वरी प्रमाणे वागायचा प्रयत्न करत होती.अंधारात चालत शेवटी ते त्या दालना जवळ येऊन पोचले.रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती.त्या तिघांना तेथेच थांबवून सुजयराजे तिथून निघून गेले.थोड्याच वेळात केशर तिथे आली,तिच्याशी बोलून राजेश्वरीने झटकन निर्णय घेतला  आता राजेश्वरीने अन छोट्या राजकन्येने केशरचा हात घट्ट धरून तिला ओढत सुकन्याच्या दालनात आणले,तिच्या अपेक्षेप्रमाणे सुकन्या तिच्यावर जोरात ओरडली तू दोन तीन दिवस कुठे होतीस? काम करायला नको तुम्हाला ?चांगले फटके मारायला हवे,तिचे सगळे बोलणे झाल्यावर राजेश्वरी नम्र स्वरात म्हणाली महाराणी सुकन्या आपण रागावला ते अगदी बरोबर आहे फक्त माझ्या ऐवजी या केशरला रागवावे,आपणा करता केलेला हार हिने चक्क सुजय राजांना देऊन टाकला आणी ही आम्हाला इथे आपल्या समोर येऊ देत नव्हती,आत्ता आम्ही बळजबरीने आत आलो आहो,हे ऐकल्यावर सुकन्याचा अवतार पाहण्यासारखा होता.ती केशरला खूप रागावली अन ताबडतोब तिला हा महाल सोडून जायला सांगितले.तिने राजेश्वरीची आपल्या सेवे करता निवड केली.राजेश्वरीला अगदी हवे तसेच सगळे घडले होते.तिने सुकन्याला वाकून नमस्कार केला,तिचे बघून सुवर्णरेखेने पण तसाच नमस्कार केला.आता डाव पूर्णपणे राजेश्वरीच्या हातात होता,म्हणजे निदान तिला तरी असे वाटत होते.
                                                सौ.उषा.