रविवार, ११ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                   श्री                                                  ३३
                               राजेश्वरी जीव मुठीत धरून समोरचा दरबार बघत होती.ती ज्या आसनाच्या मागे लपली होती तिथे एक स्त्री येऊन बसल्याचे तिला एव्हाना कळले होते.सुजयराजांच्या किल्ल्यात त्यांच्याशिवाय आणखीही कुणी राहतंय हे त्यांना तरी माहित आहे की नाही कोण जाणे. स्वतःशीच विचार करत बसलेली राजेश्वरी एका त्रासदायक चिरक्या अन चिडक्या आवाजाने पुन्हा भानावर आली.कुणी तरी जोरात ओरडून विचारत होते अजून दरबाराचे काम सुरु का झाले नाही?दबक्या विनवणीच्या सुरात कुणीतरी उत्तर दिले आज आरोपींना आणायला उशीर झाला म्हणून महाराणीनी रागवू नये.त्याचे वाक्य संपता संपता दोघा तिघांना फरपटत आणले गेले.आणलेली माणसे खाली मान घालून उभी होती.ती स्त्री जिला महाराणी म्हटले होते ती एकदम उत्तेजित झाल्यासारखी ओरडली सुदर्शन अन सुलक्षणा दोघांना आमच्या समोर पंचवीस फटके मारा अन दिवसभर उपाशी ठेवा,राजेश्वरी दचकून समोर बघू लागली,पण हे काही महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणा नाहीत.अन दर फटक्यानिशी ते कळवळून ओरडत होते,विनवणी करत होते,ती स्त्री मात्र फारच आनंदित होत होती.हा सगळा विलक्षण प्रकार काय आहे ह्या विचारात असलेल्या राजेश्वरीच्या कानावर पुढचे वाक्य पडले त्या सुजयराजाला आमच्या समोर हजर करा अन त्याला चांगले पन्नास फटके मारा,अन हो त्याच्या मुलीला सोडू नका बरका ती पण विषवल्लीच आहे.तिला पण झोडपून काढा.एव्हढे ऐकल्यावर राजेश्वरी भान हरपून एकदम उभीच राहणार होती पण मोठ्या कष्टाने तिने स्वतःला आवरले.फटक्यांची शिक्षा झालेली माणसं तिथेच खाली बसली होती.राजेश्वरीला त्यांची खूप दया आली,अन त्या स्त्रीचा भयंकर संताप राग आला.हे काय गौडबंगाल आहे हे काही केल्या कळत नव्हते.तिने कानोसा घेतला ती महाराणी म्हणवणारी स्त्री उठून गेली होती पण समोर अजूनही ती फटके खाल्लेली माणसं बसली होती ,जरा वेळाने तिला पुन्हा गडबड ऐकू आली,राजेश्वरीने बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला,इथून केव्हा बाहेर पडता येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता,तिला आता बापूच्या काळजीने घेरले,तो पण आत आला तर छे आपण इथून तडक बाहेर पडले पाहिजे पण कसे ?एका ओळखीच्या आवाजाने राजेश्वरी विचारचक्रातून बाहेर पडली,होय हा नक्कीच सुजयराजांचा आवाज आहे.

                                               सौ.उषा.

किल्ल्याचे रहस्य                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३२ राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीर...

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

                                                     श्री                                               ३२
राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीरा पर्यंत उद्या काढायच्या चित्राची चर्चा करत होते.उपलब्ध रंग पुरेसे होते पण चित्राबद्दल एकमत काहीकेल्या  होत नव्हते.शेवटी वेळेवर ठरवू म्हणून दोघही झोपायच्या तयारीत असताना त्यांना तीच स्त्री पुन्हा दिसली.राजेश्वरीने रघुनाथकडे बघितले अन दुसऱ्याच क्षणी ती हातात काठी घेऊन त्या स्त्रीचा पाठलाग करू लागली.यावेळी राजेश्वरी पुरती सावध होती त्यामुळे ती इकडे तिकडे बघत तिचा अचूक पाठलाग करत होती.तिच्या अपेक्षेप्रमाणे ती स्त्री सौधाच्या दिशेने जाऊ लागली.पायऱ्या चढता चढता अचानक दिसेनाशी झाली पण आज राजेश्वरीला नवल वाटले नाही,तिच्या नाहीसे होण्याची जागा अन युक्ती दोन्ही आता माहित झाले होते.राजेश्वरीने पण पायरीवर पाय ठेवला,पुढे जाणार तोच कुणीतरी हात धरला,राजेश्वरीने वळून बघितले,तिला आश्चर्य वाटले रघुनाथ तिच्या पाठोपाठ आला होता.राजेश्वरीने प्रश्नार्थक दृष्टीने त्याच्याकडे पाह्यले.रघुनाथ म्हणाला एकटी जाऊ नको मी पण येतो त्यावर राजेश्वरीने त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला आणी त्याला बाहेर थांबायला सांगितले जर उशीर झाला तरच रघुनाथने आत यायचे असे ठरले,रघुनाथने बरोबर एक जाड दोरी आणली होती,ती कमरेला बांधून राजेश्वरी पहिली पायरी चढली त्या कमळाला हात पोचतो का ते बघितले मग पुढच्या तीन पायऱ्या चढून ती कमळाची पाचवी पाकळी फिरवू लागली पायरी सरकली पण या वेळी राजेश्वरी सावध असल्यामुळे ती तोल जाऊन पडली नाही,पुढच्या अंधारात तिने हातातली काठी फिरवली,काहीतरी हलल्यासारखे दिसले,आता तिने पुन्हा काठी फिरवून ती हलणारी वस्तू हातात पकडण्याचा प्रयत्न चालवला,शेवटी एकदाची ती हलणारी वस्तू पकडण्यात तिला पूर्ण यश प्राप्त झाले.तो एक जाडसर दोरखंड होता जो तिथे मुद्दामच लटकत ठेवला होता हे उघड होते.दोरखंडाला धरून राजेश्वरी सुखरूप आत उतरली,पण इकडे बाहेर थोडा गोंधळ झाला होता.राजांच्या मित्रांपैकी कुणीतरी त्या स्त्रीला सौधाकडे येताना बघितले होते त्याने बाकीच्या मित्रांना उठवून इकडेच आणले होते.रघुनाथ पटकन एका दाट झाडाच्या मागे लपला.थोड्यावेळ शोधाशोध करून शेवटी सगळे झोपायला निघून गेले.राजेश्वरीची वाट बघत तिथेच थांबावे की पुन्हा खोलीत जाऊन झोपावे या संभ्रमात रघुनाथ बसल्याजागीच डुलकी घेऊ लागला.राजेश्वरी हातातली काठी सांभाळत हळूहळू पुढे जाऊ लागली.त्य दिवशी सारखीच प्रकाशाची तिरीप दिसू लागल्यावर आणखी सावधगिरीने पुढे पुढे जात असता आपण एका महालात येऊन पोचल्याचे कळल्याने ती थोडी घाबरल्या सारखी झाली.अचानक तिला काही माणस या दिशेनी येताना दिली दिसली.इकडे तिकडे बघून तिने एका सिव्हासनाच्या मागे लपणे पसंत केले.थोड्याच वेळात तो महाल पूर्ण भरून गेला.राजेश्वरी लपली होती त्या जागेवर कुणीतरी येऊन बसले अन दरबाराचे काम सुरु झाले.
                                               सौ.उषा.

सोमवार, ५ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                     श्री                              ३१
                      रात्रभर जागरण झाल्याने रघुनाथ अन राजेश्वरी दोघांनाही त्रासल्या सारखे झाले होते.उद्याची कल्पना इच्छेविरुद्ध मनात थैमान घालत होती.सगळ्यांसमोर चित्र काढायचे एक वेळ  जमून जाईल पण ते कपडे,दागिने घालून इतक्या लोकांपुढे उभं राहायचं छे 
ही कल्पना काही केल्या दोघांच्या मनास रुचत नव्हती.
              दुपारचे जेवण आटपून राजेश्वरी खोलीत आली तेव्हा रघुनाथ 
झोपण्याच्या तयारीत होता.इतक्यात सुजयराजे येताना दिसले,आता काय नवीन 
संकट म्हणून दोघही बापलेक चिंताग्रस्त त्यांना सामोरे गेले.सुजयराजे खूप 
खूष दिसत होते,त्यांचे बरेच मित्र आले होते.काही आज येणार होते  म्हणून  त्यांची गडबड चालली होती.  सुजयराजांबरोबर  एक माणूस  होता,त्याच्या निर्विकार चर्येवरून काहीही अंदाज बांधता येत नव्हता.त्या दोघांचा 
गोंधळ उडालेला बघून राजे मोठ्या मृदू स्वरात म्हणाले की तुम्ही घाबरून जावं अस 
मी तुम्हाला काहीही सुचवणार नाही.मी जे तुम्हाला सगळ्यांसमोर  चित्र काढायला सांगितले आहे त्याच्या मागे माझे दोन हेतू आहे एक म्हणजे आपल्या देशातल्या स्त्रिया पण पुरुषांच्या बरोबरारीने काम करू शकतात तसेच हळुवार कला कौशल्याची कामे पण त्या तितक्याच उत्तम रीतीने करू शकतात, अन दुसरा हेतू तुम्हाला  प्रसिद्धीची गरज नाही हे मला माहित आहे पण माझ्या मित्रांना तुमच्या कलेचा आस्वाद घ्यायची इच्छा झाली तर तुमचा परिचय असावा असे मला वाटले.अर्थात तुमची इच्छा पण तितकीच महत्वाची आहे,पण ह्या वेळी कृपा करून माघार घेऊ नका.तुम्ही काढलेली चित्र सगळ्यांनाच खूप आवडली आहे,इतक्यात बरोबर असलेल्या माणसाकडे त्यांचे लक्ष गेले,त्याला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावून त्यांनी सांगितले राजेश्वरीला भुयारातून खोलीत आणून टाकणारा हाच बरका,अन ते राजेश्वरीकडे बघून मिस्कील हसले.राजेश्वरीला एकदम चोरी पकडल्या सारखे झाले,ती गोरीमोरी झाली,राजे पुन्हा हसून म्हणाले.काही लोकांना रहस्य शोधण्याचा फारच नाद असतो इतका की अगदी क्षुल्लक घटना सुद्धा त्यांना रहस्यमय वाटू लागते.तुम्हाला  आवडेल अश्या तऱ्हेचा....वाक्य अर्धवट सोडून सुजयराजे निघून गेले.
राजेश्वरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत होती.हा
समोर आला की आपल्याला संमोहित झाल्यासारखे का वाटते ?ह्याचा
राग का येत नाही?जाऊ दे ह्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नाही म्हणजे उद्याबद्दल विचार करता येईल,उद्याचा दिवस टाळता येणार नाही हे आता नक्की.


                                       सौ.उषा.