शुक्रवार, ९ डिसेंबर, २०११

                                                     श्री                                               ३२
राजेश्वरी अन रघुनाथ रात्री उशीरा पर्यंत उद्या काढायच्या चित्राची चर्चा करत होते.उपलब्ध रंग पुरेसे होते पण चित्राबद्दल एकमत काहीकेल्या  होत नव्हते.शेवटी वेळेवर ठरवू म्हणून दोघही झोपायच्या तयारीत असताना त्यांना तीच स्त्री पुन्हा दिसली.राजेश्वरीने रघुनाथकडे बघितले अन दुसऱ्याच क्षणी ती हातात काठी घेऊन त्या स्त्रीचा पाठलाग करू लागली.यावेळी राजेश्वरी पुरती सावध होती त्यामुळे ती इकडे तिकडे बघत तिचा अचूक पाठलाग करत होती.तिच्या अपेक्षेप्रमाणे ती स्त्री सौधाच्या दिशेने जाऊ लागली.पायऱ्या चढता चढता अचानक दिसेनाशी झाली पण आज राजेश्वरीला नवल वाटले नाही,तिच्या नाहीसे होण्याची जागा अन युक्ती दोन्ही आता माहित झाले होते.राजेश्वरीने पण पायरीवर पाय ठेवला,पुढे जाणार तोच कुणीतरी हात धरला,राजेश्वरीने वळून बघितले,तिला आश्चर्य वाटले रघुनाथ तिच्या पाठोपाठ आला होता.राजेश्वरीने प्रश्नार्थक दृष्टीने त्याच्याकडे पाह्यले.रघुनाथ म्हणाला एकटी जाऊ नको मी पण येतो त्यावर राजेश्वरीने त्याला त्या दिवशी घडलेला प्रसंग थोडक्यात सांगितला आणी त्याला बाहेर थांबायला सांगितले जर उशीर झाला तरच रघुनाथने आत यायचे असे ठरले,रघुनाथने बरोबर एक जाड दोरी आणली होती,ती कमरेला बांधून राजेश्वरी पहिली पायरी चढली त्या कमळाला हात पोचतो का ते बघितले मग पुढच्या तीन पायऱ्या चढून ती कमळाची पाचवी पाकळी फिरवू लागली पायरी सरकली पण या वेळी राजेश्वरी सावध असल्यामुळे ती तोल जाऊन पडली नाही,पुढच्या अंधारात तिने हातातली काठी फिरवली,काहीतरी हलल्यासारखे दिसले,आता तिने पुन्हा काठी फिरवून ती हलणारी वस्तू हातात पकडण्याचा प्रयत्न चालवला,शेवटी एकदाची ती हलणारी वस्तू पकडण्यात तिला पूर्ण यश प्राप्त झाले.तो एक जाडसर दोरखंड होता जो तिथे मुद्दामच लटकत ठेवला होता हे उघड होते.दोरखंडाला धरून राजेश्वरी सुखरूप आत उतरली,पण इकडे बाहेर थोडा गोंधळ झाला होता.राजांच्या मित्रांपैकी कुणीतरी त्या स्त्रीला सौधाकडे येताना बघितले होते त्याने बाकीच्या मित्रांना उठवून इकडेच आणले होते.रघुनाथ पटकन एका दाट झाडाच्या मागे लपला.थोड्यावेळ शोधाशोध करून शेवटी सगळे झोपायला निघून गेले.राजेश्वरीची वाट बघत तिथेच थांबावे की पुन्हा खोलीत जाऊन झोपावे या संभ्रमात रघुनाथ बसल्याजागीच डुलकी घेऊ लागला.राजेश्वरी हातातली काठी सांभाळत हळूहळू पुढे जाऊ लागली.त्य दिवशी सारखीच प्रकाशाची तिरीप दिसू लागल्यावर आणखी सावधगिरीने पुढे पुढे जात असता आपण एका महालात येऊन पोचल्याचे कळल्याने ती थोडी घाबरल्या सारखी झाली.अचानक तिला काही माणस या दिशेनी येताना दिली दिसली.इकडे तिकडे बघून तिने एका सिव्हासनाच्या मागे लपणे पसंत केले.थोड्याच वेळात तो महाल पूर्ण भरून गेला.राजेश्वरी लपली होती त्या जागेवर कुणीतरी येऊन बसले अन दरबाराचे काम सुरु झाले.
                                               सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: