श्री ३१
रात्रभर जागरण झाल्याने रघुनाथ अन राजेश्वरी दोघांनाही त्रासल्या सारखे झाले होते.उद्याची कल्पना इच्छेविरुद्ध मनात थैमान घालत होती.सगळ्यांसमोर चित्र काढायचे एक वेळ जमून जाईल पण ते कपडे,दागिने घालून इतक्या लोकांपुढे उभं राहायचं छे
ही कल्पना काही केल्या दोघांच्या मनास रुचत नव्हती.
दुपारचे जेवण आटपून राजेश्वरी खोलीत आली तेव्हा रघुनाथ
झोपण्याच्या तयारीत होता.इतक्यात सुजयराजे येताना दिसले,आता काय नवीन
संकट म्हणून दोघही बापलेक चिंताग्रस्त त्यांना सामोरे गेले.सुजयराजे खूप
खूष दिसत होते,त्यांचे बरेच मित्र आले होते.काही आज येणार होते म्हणून त्यांची गडबड चालली होती. सुजयराजांबरोबर एक माणूस होता,त्याच्या निर्विकार चर्येवरून काहीही अंदाज बांधता येत नव्हता.त्या दोघांचा
गोंधळ उडालेला बघून राजे मोठ्या मृदू स्वरात म्हणाले की तुम्ही घाबरून जावं अस
मी तुम्हाला काहीही सुचवणार नाही.मी जे तुम्हाला सगळ्यांसमोर चित्र काढायला सांगितले आहे त्याच्या मागे माझे दोन हेतू आहे एक म्हणजे आपल्या देशातल्या स्त्रिया पण पुरुषांच्या बरोबरारीने काम करू शकतात तसेच हळुवार कला कौशल्याची कामे पण त्या तितक्याच उत्तम रीतीने करू शकतात, अन दुसरा हेतू तुम्हाला प्रसिद्धीची गरज नाही हे मला माहित आहे पण माझ्या मित्रांना तुमच्या कलेचा आस्वाद घ्यायची इच्छा झाली तर तुमचा परिचय असावा असे मला वाटले.अर्थात तुमची इच्छा पण तितकीच महत्वाची आहे,पण ह्या वेळी कृपा करून माघार घेऊ नका.तुम्ही काढलेली चित्र सगळ्यांनाच खूप आवडली आहे,इतक्यात बरोबर असलेल्या माणसाकडे त्यांचे लक्ष गेले,त्याला हाताच्या इशाऱ्याने जवळ बोलावून त्यांनी सांगितले राजेश्वरीला भुयारातून खोलीत आणून टाकणारा हाच बरका,अन ते राजेश्वरीकडे बघून मिस्कील हसले.राजेश्वरीला एकदम चोरी पकडल्या सारखे झाले,ती गोरीमोरी झाली,राजे पुन्हा हसून म्हणाले.काही लोकांना रहस्य शोधण्याचा फारच नाद असतो इतका की अगदी क्षुल्लक घटना सुद्धा त्यांना रहस्यमय वाटू लागते.तुम्हाला आवडेल अश्या तऱ्हेचा....वाक्य अर्धवट सोडून सुजयराजे निघून गेले.
राजेश्वरी त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे कितीतरी वेळ बघत होती.हा
समोर आला की आपल्याला संमोहित झाल्यासारखे का वाटते ?ह्याचा
राग का येत नाही?जाऊ दे ह्याचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नाही म्हणजे उद्याबद्दल विचार करता येईल,उद्याचा दिवस टाळता येणार नाही हे आता नक्की.
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा