उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ४९ दुसऱ्या दिवशी सकाळी दरबाराचे ...
शनिवार, १४ जानेवारी, २०१२
किल्ल्याचे रहस्य
श्री ४९
दुसऱ्या दिवशी सकाळी दरबाराचे काम सुरु झाले.एक बलदंड माणूस दोघा म्हाताऱ्या माणसांना साखळदंडाने जखडून फरपटत आणत होता.ती दोघही म्हातारी माणसं कशी बशी चालत होती,त्यांची ही अवस्था बघून सुकन्या खदखदून हसत होती.तिच्या समोर त्यांना आणल्या बरोबर ती तिच्या चिरक्या आवाजात ओरडली "महाराज सुदर्शन,अन महाराणी सुलक्षणा काय ही तुमची अवस्था!पण मला अजिबात दया येत नाही तुमची.मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही."इतक्या वेळ खाली मान घालून उभी असलेली राजकन्या आपल्या आजी आजोबांचे नाव ऐकताक्षणी वर बघू लागली. त्या दोघांचेही चेहेरे अजिबात ओळखू येत नव्हते इतकी त्यांनी खाली मान घातली होती.इतक्यात अधीरपणे सुकन्या म्हणाली आम्ही उगीच कुणाला शिक्षा करत नाही आधी ह्यांचा गुन्हा सांगा.दरबारातला एक माणूस उभा राह्यला अन म्हणाला "महाराणी सुकन्याचा जयजयकार असो.
आपल्या न्यायाची कीर्ती दिगंत पसरली आहे.समोर असलेले दोन गुन्हेगार हे राजद्रोही आहेत.महाराणी सुकन्याला महाराणी ह्या उच्च पदापासून त्यांनी जाणून बुजून दूर ठेवले.हा गुन्हा त्यांना मान्य आहे.आपण सांगाल ती शिक्षा ते आनंदानी भोगायला तयार आहे." सुकन्या किंचाळली त्या दोघांना चांगले पंचवीस फटके मारा,अन दिवसभर उपाशी ठेवा."तिचे ओरडणे अन फटक्यांची शिक्षा ऐकून राजकन्या पुन्हा रडू लागली.तिने राजेश्वरीच्या विरलेल्या मळक्या ओढणीत आपला चेहेरा लपवला.राजेश्वरीने पण तिला आपल्या जवळ ओढून घेतले.इतक्यात तिथे तिसरा आरोपी पण आणला गेला.तो पण खाली मान घालून उभा होता.सुकन्या जोरात ओरडली ह्या सुजयराजाला तर पन्नास फटके मारा अन आठवडाभर जेवायला घालू नका.हमसून रडत असलेल्या सुवर्णरेखेनी तोंडावरची झिरझिरीत ओढणी बाजूला करून
आपल्या वडलांकडे बघितले.एरवी ताठ मानेनी उभे असलेले तिचे वडील आज खाली मान घालून उभे असलेले बघून तिचे मन कासावीस झाले.काय करावे काहीच सुचत नव्हते.तिला त्या राणी बद्दल एकदम तिटकारा वाटू लागला.सुकन्याची पुढची आज्ञा ऐकून तर राजकन्या भीतीने थरथर कापू लागली.सुकन्या सांगत होती त्या सुजयराजाची मुलगी कुठे आहे?तिला सोडू नका बरका ती माझ्या वाटेतला मोठ्ठा अडथला आहे.असं करा तिला मारूनच टाका. आता मात्र राजकन्या पुरतीच घाबरली.ती राजेश्व्रीला म्हणाली आपण येथून ताबडतोब बाहेर जाऊ.तिच्या रडक्या आवाजाने सुकन्याचे लक्ष वेधले गेले ती ओरडून म्हणाली आमचे नवीन नोकर काय म्हणताहेत?त्यांना मौज वाटली की नाही?राजेश्वरीने सुवर्णरेखेला आपल्या जवळ ओढून घेतले आणी तिचा चेहेरा कुरवाळून म्हणाली "महाराणी सुकन्या आपला दरबार अन त्यातली ही मौज आम्हा दोघीना फार आवडली पण ही छोटी म्हणते आहे की ह्या मजे करता आपण महाराणींना जंगलातल्या त्या दुर्मिळ फुलांचा हार करून घातला पाहिजे,आपली परवानगी असेल तर आम्ही येथून बाहेर जातो आणी जंगलातल्या त्या फुलांचा हार आपल्या करता करून आणतो. आपल्या सेवेची संधी देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती." राजेश्वरीच्या नम्र आणी गोड बोलण्याचा अचूक परिणाम झाला. सुकन्याने त्या दोघीना ताबडतोब तिथून जाण्याची परवानगी दिली. केशरने त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला.बाहेर येऊन दोघींनी एकमेकीना घट्ट मिठी मारली.राजेश्वरीने राजकन्येला समजावले की तू जर कुणाला ह्याबद्दल सांगितले तर सारेच तुला रागावतील पण आता तू माझ्या बरोबर पुन्हा येऊ नकोस.राजकन्येनी रडत रडत होकार दिला.
सौ.उषा.

मंगळवार, १० जानेवारी, २०१२
श्री ४८
राजेश्वरी राजकन्येचा हात घट्ट धरून अंधारात दडून बसली होती.ती मनातल्यामनात देवाचा धावा करत होती "देवा केशर दिसू दे",माखन तर सुजयराजांबरोबर गेला असल्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता.केशर पण दिसत नव्हती त्यात ही राजकन्या,अन पुढे घडणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेनी राजेश्वरी शहारली.आता थोडी हिम्मत दाखवावी लागणार होती,तिनी पुन्हा एकदा राजकन्येला सांगितले काहीही बोलायचे नाही,मी बोलीन तेच फक्त ऐकायचं.सुवर्णरेखा आता चांगलीच उतीजीत झाली होती,तिने पटकन मान डोलावली.राजेश्वरी एकदम पुढे झाली अन समोरच्या स्त्रीला म्हणाली केशर कुठे आहे ?इथे दोन नवीन नोकर हवे आहे म्हणून तिने आम्हा दोघीना बोलावले होते.ती स्त्री पण राजेश्वरीच्या अकस्मात पुढे येण्याने दचकली होती पण तिने केशारचे नाव घेतल्याने लगेच सावरून म्हणाली "नवीन नोकर ?मला काहीच माहीत नाही,पण मी तुला बाईसाहेबांकडे घेऊन चलते.त्या दोघी तिच्या मागे चालू लागल्या.एका प्रशस्त दालनात आल्यावर तिने केशरला हाक मारून या दोघींकडे खूण केली.त्या दोघीना समोर बघून केशर चांगलीच घाबरली होती तिला याची कुठलीही पूर्वसूचना नव्हती त्यात राजेश्वरी राजकन्येला बरोबर घेऊन आली होती.तिचा गोंधळ राजेश्वरीच्या लक्षात आला.ती पटकन म्हणाली इथे दोन नवीन नोकर हवे म्हणून तूच नाहीका आम्हाला बोलावले?केशर चाट पडली पण लगेच साव्र्रोन म्हणाली हो इथे इतकं काम आहे की दोन काय चार सुद्धा नोकर कमीच पडतील पण नोकर मात्र आमच्या बाईसाहेबच निवडतात.केशर लगेच म्हणाली "महाराणी सुकन्या आपणास ह्या नवीन नोकरांना काही प्रश्न विचारायचे आहे का?सुकन्याने एक तुच्छ नजर त्या दोघींवर टाकली अन म्हंटल ठीक आहे केशर तुझ्या चाचणीतून उतीर्ण झाल्या आहेत न मग मी नको विचारायला काही शिवाय दरबाराची वेळ पण होत आली आहे.राजकन्या सुवर्णरेखा आश्चर्याने थक्क झाली होती.ही तिच्या समोर तिची आईच होती अन तरीही तिने आपल्याला ओळखू नये याचे तिच्या बालमनाला विलक्षण दुखः होत होते.न जाणो आपल्या आई सारखी दिसणारी ही कुणी दुसरीच स्त्री असावी,आणी आपली आई तर सुजयराजांच्या हातून मेली आहे.डोळ्यात सारखे पाणी येत होते. राजेश्वरीला तिची अवस्था समजत होती पण आत्ता ह्या क्षणाला ती काहीही बोलू शकत नव्हती
काहीतरी सुचून राजेश्वरीने तिथल्याच तबकातले एक
सुंदर गुलाबाचे फूल उचलले,राणी सुकन्याच्या जवळ जाऊन तिने ते फूल तिच्या पुढे ठेवले अन म्हणाली महाराणी सुकन्याचा जयजयकार असो,आपल्या सेवेची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही दोघी आपल्या आभारी आहोत.महाराणी म्हटल्याने खुशीत असलेल्या सुकन्याने तिला आपल्या गळ्यातील मोत्याचा हार बक्षीस दिला. राजेश्वरीचे धाडस बघून केशर थक्क झाली.केशरच त्यांना काम सांगणार होती.इतक्यात सुकन्या म्हणाली आजच्या दिवस त्यांना आमचा दरबार अन तिथली मौज बघू दे मग उद्यापासून सांग काम. केशरनी यांत्रिकपाने मान हलवली.

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ४८ राजेश्वरी राजकन्येचा हात घट्ट धरून अंधारात दडून बसली ह...
रविवार, ८ जानेवारी, २०१२
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री राजेश्वरीन...
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री
राजेश्वरीन...: श्री राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयर...
राजेश्वरीन...: श्री राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयर...
किल्ल्याचे रहस्य
श्री
राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयराजांनी तिला महाराज आणी महाराणीना तिथून परत पाठवले अर्थात त्याला कारणही तसेच होते म्हणा एक तर येणारे दोन तीन दिवस सुजयराजे त्यांच्या मित्राबरोबर कुठेतरी जाणार होते आणी स्वतः तिथे नसताना त्यांना त्या तिघांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नव्हता आज काहीकेल्या राजेश्वरीचा दिवस जात नव्हता. संध्याकाळ होत आली तशी तिला एक कल्पना सुचली आणी रघुनाथच्या कानावर घालून ती लगेच निघाली.रघुनाथला आज पण तिने आपल्या बरोबर येऊ दिले नाही.हातात काठी,कमरेला दोरी,राजेश्वरी झपाट्याने सौधाच्या दिशेनी निघाली.त्या विशिष्ट पायरी जवळ येऊन तिने त्या फुलाच्या पाकळ्या फिरवल्या बरोबर पायरी सरकली आणी आत लटकत असलेल्या जाड दोरखंडाला धरून राजेश्वरी आत उतरली,पण कुणीतरी तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली होती.राजेश्वरी चांगलीच घाबरली होती हे काय नवे संकट?अंधारात काही दिसत पण नाही.तिने कमरे भोवतीच्या हातावर हात ठेवला,लहान मुलाचा हात राजेश्वरी एकदम दचकली राजकन्या सुवर्णरेखा तर नाही?तिने हात धरून तिला पुढे ओढले.होय सुवर्णरेखाच होती ती,राजवाड्यातून स्वतःच्या घोड्यावर बसून ती मुद्दाम राजेश्वरीला भेटायला आली होती आणी अनपेक्षितपणे तिला राजेश्वरीचे रहस्यमय वागणे आवडले आणी आपणही तिच्या मोहिमेत सामील व्हावे म्हणून ती चोरपावलाने राजेश्वरीच्या मागे येऊन उभी राह्यली अन राजेश्वरीने पायरी सरकावल्या बरोबर तिने झटकन राजेश्वरीच्या कमरेला मिठी मारली आणी तिच्या बरोबर त्या अंधाऱ्या भुयारात आता ती समोर उभी होती.तिला जरी दिसत नसले तरी राजेश्वरीला आपले येणे आवडले नाही हे तिला समजले होते.आता राजेश्वरीला आल्या प्रसंगाला तोंड देण्याबरोबर राजकन्येची जपणूक करायची होती.तिने खाली वाकून तिच्या कानात सांगितले,इथे काहीही दिसले तरी बोलायचे नाही आपण इथून बाहेर पडे पर्यत दोघींनी एकमेकीजवळ थांबायचे.राजकन्या एकदम आनंदित झाली,हीच ती गम्मत असणार,बर झालं आपण आज आलो ते.दोघींनी आता हात घट्ट धरून पुढे चालायला सुरुवात केली.आता थोडा थोडा उजेड दिसू लागला होता.काही माणसं इकडून तिकडे येजा करताना दिसत होती.समोरचा दरबार दिसू लागला होता पण आज राजेश्वरीला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता.ती योग्य संधीची वाट बघत होती.

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ४६ राजेश्वरीला एकदम हायसं झालं.केशर आल्यामुळे राजेश्वरीची समस्या सुटल्या सा...
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)