श्री ४९
दुसऱ्या दिवशी सकाळी दरबाराचे काम सुरु झाले.एक बलदंड माणूस दोघा म्हाताऱ्या माणसांना साखळदंडाने जखडून फरपटत आणत होता.ती दोघही म्हातारी माणसं कशी बशी चालत होती,त्यांची ही अवस्था बघून सुकन्या खदखदून हसत होती.तिच्या समोर त्यांना आणल्या बरोबर ती तिच्या चिरक्या आवाजात ओरडली "महाराज सुदर्शन,अन महाराणी सुलक्षणा काय ही तुमची अवस्था!पण मला अजिबात दया येत नाही तुमची.मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही."इतक्या वेळ खाली मान घालून उभी असलेली राजकन्या आपल्या आजी आजोबांचे नाव ऐकताक्षणी वर बघू लागली. त्या दोघांचेही चेहेरे अजिबात ओळखू येत नव्हते इतकी त्यांनी खाली मान घातली होती.इतक्यात अधीरपणे सुकन्या म्हणाली आम्ही उगीच कुणाला शिक्षा करत नाही आधी ह्यांचा गुन्हा सांगा.दरबारातला एक माणूस उभा राह्यला अन म्हणाला "महाराणी सुकन्याचा जयजयकार असो.
आपल्या न्यायाची कीर्ती दिगंत पसरली आहे.समोर असलेले दोन गुन्हेगार हे राजद्रोही आहेत.महाराणी सुकन्याला महाराणी ह्या उच्च पदापासून त्यांनी जाणून बुजून दूर ठेवले.हा गुन्हा त्यांना मान्य आहे.आपण सांगाल ती शिक्षा ते आनंदानी भोगायला तयार आहे." सुकन्या किंचाळली त्या दोघांना चांगले पंचवीस फटके मारा,अन दिवसभर उपाशी ठेवा."तिचे ओरडणे अन फटक्यांची शिक्षा ऐकून राजकन्या पुन्हा रडू लागली.तिने राजेश्वरीच्या विरलेल्या मळक्या ओढणीत आपला चेहेरा लपवला.राजेश्वरीने पण तिला आपल्या जवळ ओढून घेतले.इतक्यात तिथे तिसरा आरोपी पण आणला गेला.तो पण खाली मान घालून उभा होता.सुकन्या जोरात ओरडली ह्या सुजयराजाला तर पन्नास फटके मारा अन आठवडाभर जेवायला घालू नका.हमसून रडत असलेल्या सुवर्णरेखेनी तोंडावरची झिरझिरीत ओढणी बाजूला करून
आपल्या वडलांकडे बघितले.एरवी ताठ मानेनी उभे असलेले तिचे वडील आज खाली मान घालून उभे असलेले बघून तिचे मन कासावीस झाले.काय करावे काहीच सुचत नव्हते.तिला त्या राणी बद्दल एकदम तिटकारा वाटू लागला.सुकन्याची पुढची आज्ञा ऐकून तर राजकन्या भीतीने थरथर कापू लागली.सुकन्या सांगत होती त्या सुजयराजाची मुलगी कुठे आहे?तिला सोडू नका बरका ती माझ्या वाटेतला मोठ्ठा अडथला आहे.असं करा तिला मारूनच टाका. आता मात्र राजकन्या पुरतीच घाबरली.ती राजेश्व्रीला म्हणाली आपण येथून ताबडतोब बाहेर जाऊ.तिच्या रडक्या आवाजाने सुकन्याचे लक्ष वेधले गेले ती ओरडून म्हणाली आमचे नवीन नोकर काय म्हणताहेत?त्यांना मौज वाटली की नाही?राजेश्वरीने सुवर्णरेखेला आपल्या जवळ ओढून घेतले आणी तिचा चेहेरा कुरवाळून म्हणाली "महाराणी सुकन्या आपला दरबार अन त्यातली ही मौज आम्हा दोघीना फार आवडली पण ही छोटी म्हणते आहे की ह्या मजे करता आपण महाराणींना जंगलातल्या त्या दुर्मिळ फुलांचा हार करून घातला पाहिजे,आपली परवानगी असेल तर आम्ही येथून बाहेर जातो आणी जंगलातल्या त्या फुलांचा हार आपल्या करता करून आणतो. आपल्या सेवेची संधी देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती." राजेश्वरीच्या नम्र आणी गोड बोलण्याचा अचूक परिणाम झाला. सुकन्याने त्या दोघीना ताबडतोब तिथून जाण्याची परवानगी दिली. केशरने त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला.बाहेर येऊन दोघींनी एकमेकीना घट्ट मिठी मारली.राजेश्वरीने राजकन्येला समजावले की तू जर कुणाला ह्याबद्दल सांगितले तर सारेच तुला रागावतील पण आता तू माझ्या बरोबर पुन्हा येऊ नकोस.राजकन्येनी रडत रडत होकार दिला.
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा