सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                  ५६
सुकन्याच्या तैनातीत राहणे तारे वर चालण्यासारखे कठीण आहे हे लवकरच राजेश्वरीच्या लक्षात आले.एकतर तिला या जीहुजूर करण्याची मुळीच सवय नव्हती पण कंटाळून चालणार नव्हते.तिला सुवर्णरेखेचेच कौतुक वाटत होते ती या सगळ्या नाटकात किती उत्साहाने सहभागी झाली होती.
                 दुसऱ्या दिवशी सुकन्याची लहर सांभाळत एकदाची तिला तयार केले अन राजेश्वरीने सुटकेचा श्वास सोडला.खरतर राजेश्वरीला वेशभूषा रंगभूषा केशभूषा यांचे केशर इतके काय अजिबातच ज्ञान नव्हते.केशरला घालवून आपण चूक केली असे क्षणभर तिच्या मनात आले पण आता मागे जाण्यात अर्थ नव्हता अन ते शक्य पण नव्हते.तिने सुकन्याला अदबीने विचारले की आपणास आता काय खायला आवडेल?तिने सांगितलेले पदार्थ ऐकून राजेश्वरी थक्क झाली.एकतर तिने मुळात ते पदार्थ कधी ऐकलेच नव्हते खाणं तर फार लांबची गोष्ट होती आता काय कराव तिला काही कळेना .इतक्यात छोटी सुवर्णरेखा धावत बाहेर गेली ती जरा वेळाने एका ताटात पुष्कळ पदार्थ घेऊन आली अन सुकन्याला म्हणाली यातले काय आवडेल ते खा त्या पदार्थांवर सुकन्या अगदी तुटून पडली.राजकन्येचे प्रसंगावधान बघून राजेश्वरीला तिचे खूप कौतुक वाटले.कसेही करून केशरला पुन्हा बोलावून घ्यायचे राजेश्वरीने मनाशी नक्की ठरवले.आता दरबाराची वेळ होत आली होती त्याच्या आधी तिला अन राजकन्येला तयार व्हायला हवे होते.
               चार दिवस झाले राजेश्वरीला सुकन्याची सेवा करता करता हे काम तिला मुळीच आवडत नव्हते आज तिने सुकन्याशी धीर करून बोलायचे ठरवले.दरबाराची वेळ होत आली की सुकन्या एकदम खुशीत असायची हीच वेळ साधून तिने सुकन्याला विचारले की महाराणी सुकन्याचे कोमल मन दरबारातल्या रोजच्या त्याच त्या कैद्यांना बघून अन त्यांना त्याच त्या शिक्षा देऊन अगदी कंटाळले असेल तरी मी थोडा बदल सुचवू का ?सुकन्याच्या कपाळाला आठी पडली पण तिला वाटले की न जाणो आपल्या पेक्षाही काही भयंकर शिक्षा ही सुचवणार असेल म्हणून तिने संमती दर्शक मान हलवली पण ती तिच्या चिरक्या आवाजात राजेश्वरीला ओरडून म्हणाली माझ्या कैदेतून मी त्यांना कधीच बाहेर काढणार नाही.राजेश्वरीला एकूणच सुकन्या हे व्यक्तिमत्व फारसं आवडल  नव्हतं पण आता काही उपाय नसल्याने तिने मान हलवली.
 राजेश्वरी एकदम काही सुचल्या प्रमाणे म्हणाली की महाराणी आपण त्या कैद्यांना रोज फटक्यांची शिक्षा देता अन नंतर ते सारा दिवस खाउन पिऊन मजेत घालवतात त्या पेक्षा त्यांच्याकडून दिवसभर आपल्या उपयोगाचे काही काम करून घेतले तर ते आपल्या जास्त फायद्याचे ठरेल अर्थात आपल्याला माझ्यापेक्षा जास्त कळते.सुकन्या थोडी चिडली होती पण रोज तीच शिक्षा अन तेच वातावरण याचा खरं म्हणजे तिला पण कंटाळा आला होता.तिने थोड्या कान्ताल्याने अन किंचित उत्सुकतेने विचारले की या तिघांना कुठल्याही कामाची सवय नाही.