शुक्रवार, २ डिसेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३० आज सकाळ पासूनच किल्ल्यावर गडबड सुर...

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३० आज सकाळ पासूनच किल्ल्यावर गडबड सुर...

किल्ल्याचे रहस्य

                                                         श्री                                       ३० 
आज सकाळ पासूनच किल्ल्यावर गडबड सुरु होती.आज दुपारी राजांचे मित्र राजमहालात राह्यला येणार होते.सुजयराजे तर सकाळपासूनच आले होते,पुढचे काही दिवस ते पण इथेच राहणार होते.आज सगळ्यांचाच स्वैपाक राजे सांगतील त्याप्रमाणे व्हयायचा होता.राजांच्या इंग्रज मित्रांच्या आवडीचा स्वैपाक करायला कुणी आचारी मुद्दाम बोलावला होता.
                  काम संपल्यावर तिथे राहणे रघुनाथ अन राजेश्वरीला कंटाळवाणे वाटत होते.रघुनाथ सुजयराजांना सांगून निघून जावे या विचारात असतानाच माखन त्यांच्या खोलीकडे येताना दिसला.पाठोपाठ सुजयराजे पण येताना दिसले.रघुनाथ उठून उभा राह्यला राजेश्वरी पण दाराचा आडोसा घेऊन उभी राह्यली.सुजयराजे हसत हसत आत आले त्यांनी माखनच्या हातातले सामान रघुनाथच्या हातात दिले,हे तुमच्या दोघांकारता,परवा त्या राजमहालात माझ्या मित्रांना मेजवानी आहे तुम्ही दोघांनी पण तिथे यावे असे मला वाटते,ह्यात काही कपडे अन अलंकार ठेवले आहेत त्याचा कृपया स्वीकार करा. त्या उरलेल्या भिंतीचे चित्रकाम माझ्या मित्रांसमोर करायचे आहे बरका एव्हढे बोलून सुजयराजे जितक्या त्वरेने आले तितक्याच पटकन निघून गेले.
                रघुनाथ अन राजेश्वरी एकमेकाकडे बघतच राह्यले.हे सगळेच त्यांच्या करता नवीन होते.हे कपडे,दागिने ते घालणार का असे कुणीच विचारले नव्हते राजेश्वरीने रघुनाथच्या हातातले सामान घेतले.इतका तलम अन सुंदर कपडा दोघांनी आजवर कधीच वापरला नव्हता.गुलाबी रंगाचा झगा त्यावर वेलबुट्टी,तशीच सुंदर ओढणी,अन तसाच पायजमा,गळ्यात घालायला टपोऱ्या चमकदार मोत्यांचा दुहेरी पदर असलेला हार राजेश्वरी करता अन सोनेरी रंगाचा फेटा किंचित हिरवी छटा असलेला कुर्ता अन पायजमा,मोत्यांचा एकसर गळ्यात घालण्याकरता रघुनाथ करता .या अनपेक्षित संकटाने दोघेही हतबल झाले होते.इथून रात्री पळून जावे असे पण आता त्याना वाटू लागले होते.