शनिवार, १७ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                     श्री                                               ३४
माखन आज अशीकशी चूक झाली ? ती जिन्यातली झडप बंद केली नव्हती का?सुजयराजे त्यांच्या नेहेमीच्याच मृदू स्वरात विचारत होते.त्यांच्या प्रश्नावर माखन एव्हढेच म्हणाला राजे मी तुमच्या मित्रांच्या तैनातीत असताना नेमकी केशर तिथून गेली अन तुमचे मित्र तिच्या पाठलागावर निघालेले बघून मीच त्यांना दुसऱ्या वाटेवर घेऊन गेलो केशर नेहेमीच्या मार्गावरून सुखरूप गेलेली बघितल्यावर रात्री उशीरा मी ती झडप आतल्या बाजूने बंद करून टाकली,केशरला जरा दरडावून विचारल्यावर ती म्हणाली की महाराणी सुकन्याच्या आज्ञेप्रमाणे मला वागणे भाग होते,नाहीतर तिला फटके खावे लागले असते.बर जे झालं ते झालं आता दोन तीन दिवस केशरला बाहेर फिरकू देऊ नका,झालच तर राणी सुकन्या जास्त काळ झोपेत घालवतील ह्याची काळजी घ्यायला सांग केशरला.एव्हढं बोलून सुजयराजे झपाट्याने तिथून निघून गेले.त्यांच्या पाठोपाठ तिथली सगळी माणसं काहीच घडलं नाही अश्याप्रकारे निघून गेली. राजेश्वरीच्या डोक्यात अनेक विचारांनी थैमान घातले होते.जिला आपण मृत समजलो ती सुकन्या चक्क जिवंत आहे अन सुजयराजांना,माखनला हे गुपित माहीत असूनही सुंदरपुरात कुणाला माहिती नाही हे आणखी एक नवल!ती सुकन्या सगळ्यांना फटक्याची शिक्षा देऊन खूष होत होती अन सुजयराजांना सगळे माहीत असून त्यांना त्याबद्दल काहीच बोलायचे नव्हते.सगळीकडे नीरव शांतता पसरली होती,राजेश्वरी हलकेच कानोसा घेऊन उभी राह्यली आसपास कुणीही नाही बघितल्यावर ती उठून उभी राह्यली.एका जागी खूप वेळ बसल्याने सगळे अंग आखडून गेले होते,पण इथे फार काळ थांबणे धोकादायक होते,कसेही करून इथून सुटका करून घ्यायला हवी,राजेश्वरी विचारांच्या गुंत्यात पार गुरफटली होती,इतक्यात तिला काही बायकी आवाज आले,अरे ही तर तीच स्त्री आहे रात्री गाणे म्हणत फिरणारी ,काय कराव ? पुढे जाव का?ह्या स्त्रीची मदत मागावी का?निर्णय लवकर घ्यायला हवा.शेवटी धाडस करून राजेश्वरी एकदम पुढे झाली तिला बघून त्या स्त्रिया एकदम दचकल्या, त्या ओरडायच्या आत ती स्त्री, केशर म्हणाली मीच आणलं आहे तिला राजेश्वरी तिचे नाव!राजेश्वरी डोळे विस्फारून तिच्याकडे बघतच राह्यली.
                                                    सौ.उषा.