शनिवार, २६ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com

usha-ushagmailcom.blogspot.com
                                                       श्री                                            २५
                  राजमहालातल्या कामावर लक्ष केंद्रित करायचे ठरवूनही राजेश्वरीचे लक्ष कामात लागेना.हातातला रंगाचा डबा अलगद खाली ठेऊन ती सौधावर जाऊन उभी राह्यली.मनात असंख्य विचारांनी गर्दी केली होती.सुजयराजे केव्हा येऊन उभे राह्यले ते पण राजेश्वरीला कळलं नाही. हळू आवाजात राजे म्हणाले कालच्या घटनेबद्दल मी दिलगीर आहे.पुढचे काही ऐकून न घेता राजेश्वरी पायऱ्या उतरून पुन्हा कामाला लागली म्हणजे तिने भासवले तरी तसे.रघुनाथने सिव्हासनामागच्या भिंतीवर आकाशी रंग द्यायला सुरुवात केली होती.राजेश्वरीला माहीत होते की उरलेल्या भिंतीचे काम आपण न केल्याने बापूला एकदम मुख्य भिंतीला हात लावावा लागला होता,पण तिचं  मन काही केल्या थाऱ्यावर येईना.
                        सुजयराजे रघुनाथशी कामाबद्दल बोलत होते. रघुनाथ पण त्यांना व्यवस्थित उत्तर देत होता.काहीच न घडल्यासारखे दोघही कसं  बोलू शकतात याच राजेश्वरीला आश्चर्य वाटत होतं.रघुनाथने दिलेल्या आकाशी  रंगाची राजे तारीफ करत होते,तिथे कुठले चित्र काढणार त्याची पण त्यांना उत्सुकता होती. जेवण तयार असल्याचे सांगायला एक सेवक आला तो राजांना पाहून तिथेच थबकला.हलक्या आवाजात त्याने रघुनाथ अन राजेश्वरीला जेवायला या म्हणून सांगितले अन तो निघूनही गेला. सुजयराजे तिथेच उभे असताना आपण जेवायला कसे जायचे या विचारात असलेल्या रघुनाथला राजांनीच जायला सांगितले.राजेश्वरी अन रघुनाथच्या पाठोपाठ सुजयराजे पण आले सगळ्यांना पोटभर अन सावकाश जेवा हे सांगून घोड्यावर बसून ते राजवाड्याकडे निघून गेले,त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे राजेश्वरी कितीतरी वेळ बघत होती.  
                            पुढचे दोन तीन दिवस राजेश्वरीने राजमहालातल्या भिंती सारख्या करण्यात घालवल्या.रात्री उशीरा पर्यंत ती काम करत असायची.रात्री काम संपल्यावर जेवल्यावर झोप अशी काही लागायची की एकदम पहाटेच जाग यायची.आता राजमहालाच्या भोवती छोटीशी फुलबाग पण साकारायला लागली होती.हळूहळू सगळ्यांच्या प्रयत्नाने तिथले उजाड.उदास वातावरण बदलू लागले होते.फुलपाखरानी पण नव्या फुलबागेकडे मोर्चा वळवला होता.सगळा परिसर रंगीत अन आनंदी दिसू लागला होता.राजेश्वरीच्या मनात मात्र अंधार दाटला होता.तिथले सगळे रंग उडून गेले होते,एक भेसूर शांतता तिला व्यापून टाकत होती.
                           रात्री पडल्या पडल्या राजेश्वरी हळूहळू झोपेच्या उबदार पांघरुणात शिरणार इतक्यात तिला पुन्हा तीच पांढरे वस्त्र नेसलेली स्त्री फिरताना दिसली.ती बारीक आवाजात गुणगुणत होती.राजेश्वरीअंगावरचे पांघरूण झटकून खोलीच्या बाहेर आली,वळून बघितले रघुनाथ गाढ झोपला होता.पलीकडच्या खोलीतल्या कुणीतरी हे दृश बघितले असावे कारण जोरात किंकाळी ऐकू आली पण राजेश्वरीला मागे वळून बघायला वेळ नव्हता ती झपाट्याने त्या स्त्रीचा पाठलाग करू लागली. 
                                         सौ.उषा.

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री २4 रात्रभर राजे...