सोमवार, २६ डिसेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                           श्री                                    ४२
राजेश्वरी राजमहाल सोडून निघून गेली,सगळ्यांनाच नवल वाटलं .कुठली कोण हातावर पोट असलेल्या बापाची मुलगी अचानक राणी होणार ते भाग्य लाथाडून ही गेलीच कशी ?सुजयराजांचा चेहेरा पण उतरला होता.त्यांनी जरी राजेश्वरीला निर्णयाचा अधिकार दिला असला तरी त्यांना मनातून खात्री होती की नकार मिळणार नाही.मग ही अशी तडका फडकी निघून कशी गेली?रघुनाथला तर मेल्याहून मेल्या सारखे झाले होते.राजेश्वरीच्या विचित्र वागण्याचा त्याला जरी अनुभव होता तरी आयुष्यातली इतकी मोठी संधी ती अश्याप्रकारे ठोकरून लावेल यावर त्याचा विश्वास बसत नव्हता.त्याला तिथून एकाएकी निघून पण जाता येत नव्हते.सगळ्यात आधी सावरला तो राजांचा एक इंग्रज मित्र,त्याने सुजय राजांना राधाकृष्णाच्या चित्रापुढे आणून उभे केले.राजेश्वरीने लाल अन पांढऱ्या दोन्ही रंगांची फुलं चित्रापुढे ठेवली होती. डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिणारे दृश्य सुजयराजांनी डोळ्यातले पाणी निपटून नीट बघितले.पूर्ण नकार नव्हता तर !त्यांच्या चेहेऱ्यावर पुन्हा नेहेमीचेच स्मित दिसू लागले. त्यांचा मित्र पण आनंदाने त्यांच्या पाठीवर थोपटू लागला.रघुनाथला हे काहीच समजले नव्हते सुजय राजांनी त्याला जायची परवानगी दिली अन रात्री भेटतो असे हळू आवाजात सांगितले.
                     राजमहालातून रघुनाथ तडक खोलीवर आला.थोड्या रागानेच त्याने हाक मारली राजेश्वरीला पण तिथे कुणीच नव्हते ही मुलगी आता गेली तरी कुठे ?रघुनाथ तिथेच खाली बसला.आज रघुनाथ तिला शोधायला जाणार नव्हता.त्याच्या पायात बळच उरलं नव्हतं.कुठून सुंदरपुरला यायची बुद्धी झाली असे आता त्याला वाटू लागले होते.

                       सगळ्या मित्रांचा निरोप घेऊन सुजयराजे घाईने निघाले.कधी एकदा राजेश्वरीला भेटतो असे झाले होते.खोलीकडे जाता जाता ते एकदम सौधाच्या दिशेने चालू लागले.राजांचा अंदाज अगदी बरोबर होता.राजेश्वरी एकटीच सौधावर उभी होती, हीच त्यांना हवी अशी अनुकूल संधी होती.सुजयराजांना तिथे बघून राजेश्वरीला अजिबात आश्चर्य वाटले नाही,जणूकाय दोघांचे आधीपासूनच भेटायचे ठरले होते. ती फक्त इतकेच म्हणाली माझे काही प्रश्न आहेत ज्यांची मला उत्तरं हवी आहे.सुजयराजे म्हणाले मी माखनला बोलावून घेतो,त्यावर राजेश्वरीने त्यांना सांगितले की माझ्या प्रश्नांची उत्तरं ह्याच राजमहालात सापडतील असे वाटते फक्त मला इथे माझ्या मनाप्रमाणे फिरण्याची मुभा द्यावी.सुजयराजे लगेच तयार झाले,फक्त तळघरात जाताना माखन किंवा केशर बरोबर असेल अशी काळजी घ्यायला सांगितले,राजेश्वरीच्या जीवाला धोका होऊ शकतो असे स्पष्टीकरण राजांनी दिले,थोड्याश्या अनिच्छेनी राजेश्वरीने होकार दिला.सुजयराजे अनिमिष नेत्रांनी राजेश्वरीकडे बघत होते.गडद अंधारात सुद्धा त्यांच्या नजरेनी राजेश्वरी अस्वस्थ झाली होती.ही भावना तिच्या करता सर्वस्वी नवीन होती,पण अजून तिला त्यात पुरतेपणी झोकून देता येत नव्हते कारण राणी सुकन्याचा चिरका,चिडका आवाज तिच्या कानात घुमत होता,"त्या सुजय राजाला चांगले पन्नास फटके मारा"का ? कश्याकरता पन्नास फटके मारायला निघाली होती ती ? हे गूढ उकलल्याशिवाय पुढचा विचार नको.
                                 सौ.उषा.

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                           श्री                   ४...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ४...: श्री ४१ मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरल...