शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

                                            श्री                                          १५
पुढचे आठ दिवस रघुनाथचे फारच धांदलीचे गेले.सुजय राजांची खोली आधी रंगवायला घ्यायची होती.त्याला एकट्याला हे झेपणार नव्हते.सुदर्शन महाराजांची भेट घेऊन त्याने राजेश्वरीची या कामात मदत घेण्या विषयी त्यांना विचारले कारण रघुनाथ आणखी कुणावर या कामात विश्वास ठेवायला तयार नव्हता.सुदर्शन महाराजांनी स्पष्ट नकार दिला अन पुन्हा या बद्दल न विचारण्याची ताकीद पण दिली रघुनाथला.महाराजांनी एकवार संधी देऊन बघावी असे विनवूनही महाराज तयार झाले नाहीत एकतर कुणा पोरी बाळींचे हे काम नाही अन सुजय राजांची चोखंदळ आवड निवड जपणं हे राजेश्वरीला नकीच झेपणारं काम नाही असं महाराजांच सुस्पष्ट मत ऐकल्यावर रघुनाथ चुपचाप कामाला लागला.
                                    सतत पाच सहा दिवस काम करून शेवटी व्ह्यायचे तेच झाले.रघुनाथला सडकून ताप भरला अन तो अति थकव्यामुळे त्या दिवशी घरी पण जाऊ शकला नाही.पूर्ण रात्र तो अर्धवट बेशुद्धीत राजेश्वरीची काळजी करत राह्यला,पहाटे कधी तरी त्याला झोप लागली.सकाळी महाराजांच्या कानावर हे पडल्यावर त्यांनी ताबडतोब रघुनाथची भेट घेऊन त्याला पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितले.सुजय राजांच्या महालाची काळजी होतीच,इतक्या वेळेवर दुसरा चांगला माणूस मिळणं कठीणच होतं द्यावी का राजेश्वरीला संधी या विचारासरशी त्यांनी घोड्यावर बसून किल्ल्याकडे कूच केले.इतक्या मोठ्या वास्तूत भली भली पुरुष मंडळी सुद्धा घाबरली असती,बिचारी राजेश्वरी ,कशी काढली असेल तिनी रात्र ?
                   सुदर्शन महाराज आज पुष्कळ दिवसांनी आले होते.घोड्यावरून खाली उतरून ते हळूहळू मारोती मंदिराजवळ आल्यावर स्वच्छ मंदिर अन नुकतीच देवपूजा करून फुलं व्हायलेली बघून प्रसन्न झाले.काही माणसांना सांगूनही काम जमत नाही अन काही न सांगता कितीतरी काम मोबदल्याची अपेक्षा न ठेवता करतात.तिथून पुढे आल्यावर त्यांना आणखी एक आनंदाचा धक्का बसला छोटीशीच फुलबाग अन कारंजाचे उडणारे तुषार आज किती वर्षानी बघायला मिळाले.सगळ्या परिसरावर पसरलेलं उदास सावट रघुनाथ अन राजेश्वरीने त्यांच्या पुरते का होईना पुसून काढले होते.तेवढ्या भागात फक्त आनंद होता.राजेश्वरी समोर येऊन उभी राह्यली तरी महाराज किती तरी वेळ आपल्याच विचारात दंग होते.

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: श्... : श्री...

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                श्र...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्र...: श्री १४ कारंजाचा विचार करता करताच राज...