मंगळवार, ८ मे, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:
...
: श्री ...

किल्ल्याचे रहस्य

श्री 59
गेले पंधरा दिवस राजेश्वरी अन सुकन्या सतत बरोबर होत्या.छोटी सुवर्णरेखा अवती भवति असायचीच
सुजयराजांना मात्र राजेश्वरी ठरवून पण वेळ देऊ शकत नव्हती त्यांची आणखी ही एका कारणाने घालमेल होत होती
खर म्हंटल तर सगळा राजवाडाच अस्वस्थ झाला होता.सुकन्याची झपाट्याने होणारी प्रगति जेवढी स्तिमित करणारी
होती तेव्हढीच ती राजेश्वरीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावणारी होती.राजेश्वरी मात्र या सगळ्या काळजीतुन मुक्त
होती.हाती घेतलेले काम सर्व शक्तिनिशी पूर्णत्वास न्यायचे हेच ती लहानपणापासून शिकली होती निसर्गाच्या सहवासातुन आपोआप येणारा मनाचा मोठेपणा राजेश्वरीचा बहुमोल अलंकार होता.निसर्गाचा सर्वांना भरभरून
देण्याचा स्वभाव
आणी उद्याची चिंता नसणे ह्या सर्वच गुणामुले राजेश्वरीने आपोआपच सगळ्यांचे लक्ष वेधून
घेतले होते अगदी एखाद्या नुकत्या उमललेल्या फुला सारखी ती सदैव हसतमुख अन प्रसन्न असायची.जे काय
तिच्या जवळ होते त्यात ती नेहेमीच संतुष्ट असायची।
सुकन्या अगदी थोड़े सुद्धा तिला नजरेआड होऊ देत नसे.राजेश्वरीला कामाचा ताण पडू नए म्हणून तिने पुन्हा केशरला बोलावून घेतले होते.केशर आल्याने राजेश्वरीचे काम खरच कमी झाले.सुकन्याला कुठल्याही प्रकारे

झोपेचे औषध न  देण्यास मात्र तिने केशरला अगदी आल्या बरोबर बजावून सांगितले.सुकन्यालाझोप येण्याकरता कुठलाही उपचार घेण्याची गरज राहिली नाही हे सत्य पचनी पडायला केशरला बराच त्रास झाला।
रात्री उशीरा राजेश्वरीला गाठून सुजयराजांनी विचारले सुकन्या सुधारली म्हणून तू आम्हाला सोडून जाणार नाही ना ?
सौ.उषा