शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: ...
                                                                        श्री                                               7             

रघुनाथ अन राजेश्वरी जुन्या राजवाड्यात राह्यला जाणार हे हळू हळू गळ्यांनाच समजले होते.प्रत्येकाच्या नजरेत एक प्रकारची भीती अन त्या दोघांबद्दल सहानुभूती होती.शेवटच्या प्रवासाला निघालेल्या माणसाला निरोप दिल्या सारखा प्रत्येक जण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांभाळून राह्यला सांगत होता.रघुनाथ नेहेमी प्रमाणेच निर्विकार होता पण राजेश्वरीला मात्र कुतूहल वाटू लागले होते.लहानपणापासूनच तिला अंधार अन गरीबी ह्यांची सोबत,त्यात मनस्वी कलंदर पित्याच्या सहवासात राजेश्वरी आपोआपच एक वेगळीच मुलगी झाली होती.सर्व सामान्य मुलींप्रमाणे तरुण वय असूनही तिला कधीच वेगवेगळे कपडे अन दागिने यांचे आकर्षण नव्हते.निसर्गाच्या सान्निध्यात राहून तसाच सरळपणा तिच्या स्वभावात आला होता.बैलगाडी थांबली तशी रघुनाथने पटकन खाली उडी मारली आता तो पुढे जाऊन बसला होता कारण इथून पुढे यायला गाडीवानाने सपशेल नकार दिला.खुणेनेच त्याने समोर बोट दाखविले.लक्ख सूर्यप्रकाशात राजवाड्याचा उंच मनोरा दिसत होता.जरी राजमहाल इथून दिसत होता तरीही तो अजून मैल दोन मैल तरी लांब होता,बैलगाडीत सामान भरपूर होते ते सगळे आता दोघांनाच लावावे लागणार होते.अर्थात कामाला दोघही मागे हटणार नव्हते.गाडीवानाचा निरोप घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला.बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजुळ आवाज ,रानपाखरांची किलबिल असं ओळखीचं वातावरण मिळाल्याबरोबर राजेश्वरी प्रसन्न होऊन मनाशीच गुणगुणू लागली..दुपारी दोनच्या सुमारास त्यांची गाडी राजमहाला समोर येऊन उभी राह्यली.रघुनाथच्या पाठोपाठ राजेश्वरीनेही खाली उडी मारली,अंगाला आळोखे पिळोखे देत ती विस्फारल्या नजरेनी समोरच सगळं हृदयात साठवून ठेवायचा प्रयत्न करू लागली .दिंडी दरवाजा,त्याच्या जवळच असलेलं मारोतीच छोटसं मंदीर,तिथून थेट राजमहालाकडे जाणारा प्रशस्त रस्ता .रस्त्याच्या दुतर्फा बहुदा बाग असावी,आता मात्र तिथे उंचच उंच गवत वाढलं होतं.राजेश्वरी मंत्रमुग्ध झाल्या सारखी पुढे पुढे जात होती.पुन्हा एक दरवाजा त्यातून वाकून आत जाव लागायचं मोठा रथ आल्यासच ते दार बहुदा उघडत असावे.थोडं पुढे गेल्यावर एक कारंज होतं,पावसाच पाणी अन झाडाची पानं कुजल्याचा असह्य वास जवळ न जाताही येत होता पण तिथून जवळच बकुळीचा सडा पण पडला होता.राजेश्वरीने ओंजळभर बकुळीची फुलं गोळा केली अन नाकाजवळ घेऊन डोळे मिटून खोलवर श्वास घेतला.सगळा शीण नाहीसा झाला.आता कुठे तिच्या लक्षात आले की रघुनाथ अजूनही बाहेरच आहे.ती वेगाने परत फिरली,बैलगाडीच्या दिशेने धावणाऱ्या राजेश्वरीची वाट अडविली ती एका अनोळखी पाहुण्याने!
                                                                           सौ,उषा.