शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                    श्री           ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ४६ राजेश्वरीला एकदम हायसं झालं.केशर आल्यामुळे राजेश्वरीची समस्या सुटल्या सा...
                                   श्री                        ४६
राजेश्वरीला एकदम हायसं झालं.केशर आल्यामुळे राजेश्वरीची समस्या सुटल्या सारखीच होती पण सुवर्णरेखा काही केल्या तिच्या बरोबर जायला तयार नव्हती.शेवटी सगळेच परत फिरले,राजमहालात थोड्या नाखुशीने गेलेल्या सुवर्णरेखेकडे राजेश्वरी कितीतरी वेळ बघत बसली होती,ती भानावर आली ती सुजयराजांच्या हळुवार चौकशीने,त्यांनी मोठ्या नम्रपणे रघुनाथची माफी मागितली,त्यांच्या लेकीमुळे रघुनाथ अन राजेश्वरीला  नियोजित कार्यक्रमात थोडा बदल करावा लागणार होता.सुवर्णरेखा आई वेगळी दुर्दैवी मुलगी असल्याने ती थोडी जास्त लाडावली गेली आहे हे त्यांनी एकदम मान्य केले,पण तिला कसं सावरायचं तेच कळत नसल्याचे पण त्यांनी सांगून टाकले.पण तुमच्या बरोबर ती कुठेही आली तरी मला चालणार आहे हे पण त्यांनी स्पष्ट केले. दुपारी जेवण झाल्यावर आपण सगळेच जंगलात जाऊ असा प्रस्ताव त्यानी मांडला त्यावर हो म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.
           जंगलात आल्यावर राजकन्या अगदी हरखून गेली होती. सगळ्या लवाजम्याशिवाय आज ती फक्त तिच्या वडलांबरोबर होती अगदी राजेश्वरी सारखीच ती पण आज स्वच्छंद होती!जंगलातल्या विविध वनस्पतींची रघुनाथला असलेली माहिती बघून तिला खूपच नवल वाटत होतं,आणी इथलीच फुलं वापरून त्यांनी रंग तयार केले हा तर तिच्या दृष्टीने चमत्कारच होता.तिथले कित्येक प्राणी सुवर्णरेखेनी आज पहिल्यांदाच बघितले होते.तिला रघुनाथ ,राजेश्वरी म्हणजे कुणी जगावेगळीच माणसं वाटत होती.
 जंगलातल्या फुलांनी,फुलपाखरांनी तर राजकन्येला इतकी भुरळ घातली की ती काही केल्या घरी परतायला तयार होईना,इवल्याश्या डोळ्यांच्या,खारुताई,इकडून तिकडे उगीचच उड्या मारणारी माकडांची टोळी,अन मण्यांसारख्या डोळ्यांच्या ससोबाने तिची खूपच करमणूक केली.उद्या पुन्हा परत येऊ या आश्वासनानंतरच ती घरी परतायला तयार झाली.
             राजेश्वरी थोडी नाराजच होती कारण इथे उगीचच थांबण्यात त्या दोघा बापलेकांना अजिबात रस नव्हता.सगळंसुरळीत पार पडलं तर ठीक नाहीतर इथून जायचं नक्कीच आहे.राजेश्वरीने एकदम सुजयराजांकडे बघितले चालण्याच्या श्रमाने दोघही बापलेक थकल्या सारखे दिसत होते,पण दोघही आज आनंदात होते.वडलांचा हात धरून चालताना राजकन्येला वेगळीच गम्मत वाटत होती.तिचे वडील तिला खूप आवडू लागले होते.हीच का ती सुवर्णरेखा हे राजेश्वरीलाच खरे वाटत नव्हते.आता तिला जास्तच आत्मविश्वास वाटू लागला.ती राजकन्येचा हात धरून म्हणाली उद्या तुला एक वेगळीच गम्मत दाखवणार आहे.
                              सौ.उषा.