रविवार, ६ नोव्हेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ९ आज राजेश्वरी पूर्ण द...
श्री ९
आज राजेश्वरी पूर्ण दिवस एकटी राहणार होती.रघुनाथ सुदर्शन महाराजांना भेटायला जाणार होता.सकाळी रघुनाथ बरोबरच तिनेही खाऊन घेतले,सगळी आवरासावर करून तिने एकदा खोलीभर नजर फिरवली.इथे आले त्यापेक्षा खोली खूपच छान दिसत होती .मुख्य म्हणजे खालची सारवलेली जमीन ! आज भरपूर वेळ असल्यामुळे तिने तो किल्लावजा राजमहाल नीट पहायचे नक्की केले.मनात विचार आल्याबरोबर राजेश्वरी तडक उठली,खोलीचं दार लावून ती एक एक खोली बघत निघाली.सगळ्या खोल्यांमध्ये हंड्या झुंबर लावून त्यांना सुशोभित केले होते.भिंतींमध्ये पूर्ण उंचीचे सुंदर आरसे,राजेश्वरीने स्वतःला त्या आरश्यात न्याहाळले,मातकट तपकिरी रंगाचा पायघोळ झगा,त्याखाली पायजमा अन अंगावर तितकीच विटकी ओढणी.राजमहालातल्या आरश्यात बघण्यासारखा अवतार नक्कीच नव्हता.झटदिशी आरश्या समोरून बाजूला होत राजेश्वरीने आपले लक्ष दुसरीकडे वळवले.खोलीतून बाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या जिन्याकडे वळून ती सौधावर उभी राह्यली.रानाकडून येणाऱ्या प्रसन्न वाऱ्याने तिचे स्वागत केले.थोड्या वेळाने ती खाली जायला निघाली अन तिची नजर दूरवर काहीतरी शोधल्याच्या आनंदात होती.होय नक्कीच ती एक नदी होती जिचा क्षीण प्रवाह दुपारच्या उन्हात चमकत होता एखादी रुपेरी सतरंजी घडी करून अंथरल्यासारखा!उड्या मारतच जिना उतरून राजेश्वरी खाली आली.हा नवीन शोध बापूला केव्हा सांगते असे तिला झाले.राजेश्वरी स्वतःवर बेहद्द खूष होती.खोलीत येऊन झोपायचे ठरवले खरे पण रोजची सवय नसल्याने झोपही येईना,त्यात बोलायला कुणी नाही.जरी या एकटेपणाची तिला लहानपणापासून सवय असली तरी तो माणसांच्या समूहात राहून एकटेपणा होता.आज पहिल्यांदाच तिला हा एकटेपणा खायला उठला.उद्यापासून सरळ बापू बरोबर जायचे तिने मनाशी नक्की ठरवले.खोलीत बसून समोरचे उदास वातावरण आणखीच उदास होत चालले होते.रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत कापून काढावे तेवढाच वेळ जाईल.मनात आल्याबरोबर ती तडक कोयता घेऊन बाहेर पडली.राजेश्वरी म्हणजे मूर्तिमंत उत्साह!
सौ.उषा.
सौ.उषा.
NAGPUR INDIA
नागपुर, महाराष्ट्र, India
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)