शुक्रवार, १८ नोव्हेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: श्र...
usha-ushagmailcom.blogspot.com: श्र...: श्री १९ राजेश्वरीला ...
श्री १९
राजेश्वरीला आता जबर शिक्षेला तोंड ध्यावे लागेल ह्याबद्दल कुणालाही शंका वाटत नव्हती.सगळीकडे शांतता पसरली होती.सुजय राजांनी बोलायला सुरुवात केली.
राजेश्वरीच्या कलागुणां बरोबर एक माणूस,एक स्त्री म्हणून तिचा जो काही परिचय सुजय राजांना झाला होता त्याने ते अचंभित होते.सर्व सामान्य स्त्रियांपेक्षा ती निश्चितच वेगळी होती,आणी म्हणूनच त्यांनी तिच्या पुढे एक वेगळाच प्रस्ताव ठेवला होता तो म्हणजे जुन्या राजमहालातील एक महाल जो सुजय राजे स्वतःच तिला दाखविणार होते त्याची सजावट एक महिन्याच्या आत तिने व रघुनाथने करायची होती.त्याच महालात सुजय राजे त्यांच्या काही निवडक देशी अन परदेशी मित्रांना मेजवानी देणार होते.किल्ल्यातल्या या राजमहालाचे अन सभोवतालचे सगळे उजाड उदास वातावरण त्यांना पूर्ण बदलून हवे होते.ह्या कामात पण रघुनाथ अन राजेश्वरीच्या सौंदर्यदृष्टीचा त्यांना उपयोग करून घ्यायचा होता.सुजय राजे त्यांच्या जागेवर बसल्यावर सुदर्शन महाराज म्हणाले की ह्या कामात त्यांच्या मदतीला काही माणस देण्यात येतील ज्यात बागकाम करणारे,सुतार,मजूर जे पडेल ते कुठलेही काम करतील अश्या लोकांचा समावेश असेल.
राजेश्वरी अन रघुनाथ आश्चर्यचकित झाले होते.आजवर त्यांचे पुष्कळ कौतुक झाले होते पण त्यांच्यावर एव्हढा विश्वास ठेऊन काम सोपविण्याची ही पहिलीच वेळ होती.त्यांनी सहर्ष या प्रस्तावाचा स्वीकार केला.त्या दोघांच्या मनात जंगलातली निरनिराळी फुलझाडं आपल्या अनोख्या रंगांसकट हजर झाली.कुठला महाल त्यात कोणच चित्र अश्या सगळ्या विचारांनी एकच गर्दी केली.राजेश्वरीला तर कधी एकदा त्या महालात जाते असे झाले.खोलीतला तो आरसा असेल का तिथे ?अन आपण लावलेली झाडं,पुरते दोन दिवस झाले या वाड्यावर येऊन.रघुनाथला आनंद झाला पण त्याला एकच काळजी होती की आपल्या तब्बेतीने साथ दिली नाही तर एकट्या राजेश्वरीवर सगळा भार पडेल.महाराणी सुलक्षणा वेगळ्याच काळजीत होत्या ती म्हणजे सुंदरपुरातून त्यांच्या मदतीला जायला कोण तयार होणार?
सौ.उषा.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)