सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री 22 रघुनाथला कोणालाच काही सांगायची गरज पडली...
श्री 22
रघुनाथला कोणालाच काही सांगायची गरज पडली नाही,बहुदा राजांनीच सगळ्यांना स्पष्ट शब्दात त्या दोघांच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली असावी कारण दोघं खोलीत आले तेव्हा त्यांचेच फक्त सामान त्या खोलीत होते.बाजूला रंगांच्या खोलीत सुद्धा कोणी सामान ठेवले नव्हते.
राजेश्वरीने दोघांचा स्वैपाक जेवण आटोपल्यावर पुन्हा त्या महालाकडे मोर्चा वळवला.रघुनाथ थोडी विश्रांती घेऊन येणार होता.अजूनही त्याची तब्बेत तितकीशी बरी नव्हती,राजेश्वरीने मुद्दामच बरोबर इतर कुणाला घेतले नव्हते.कुठलेही काम एकाग्र होऊन करण्याचा तिचा स्वभाव होता.काम करताना उगीच बडबड करून कामाचा विचका होतो असं तिचं ठाम मत होतं.डोक्यावर अन तोंडावर ओढणी घट्ट बांधून तिने आधी तिथली धूळ झाडून काढली,केव्हढा मोठा महाल हा !काय करायचं काय इतक्या मोठ्या खोलीच?आपल्याला अन बापूला किती लहान जागेत सर्व गरजा भागवता येतात या माणसांना का लागतात इतक्या मोठ्या खोल्या? काम करता करता एकीकडे तिचे विचारचक्र सुरु होते.धूळ जसजशी नाहीशी होऊ लागली तसतशी खालची काळी फरशी दिसू लागली.रघुनाथ येईतो राजेश्वरीने फरशी स्वच्छ धुऊन काढली होती.पुन्हा रंगाचे डाग पडणारच आहेत असं म्हणत रघुनाथ आत आला.राजमहाल खरच छान दिसत होता.
रघुनाथने बरोबर सगळे सामान आणले होते ते एका बाजूला रचून ठेवले.शिडी घेऊन त्याने पूर्वेकडील भिंतीपासून कामाला सुरुवात केली.भिंत खरवडून एक सारखी करण्यात त्याचा कितीतरी वेळ जाणार होता अन राजांना एक महिन्याच्या आत सारे काम पूर्ण करून हवे होते.जाऊदे कामावर लक्ष ठेवावे जेव्हडे होईल तेव्हडे तरी करावे. राजेश्वरीकडे त्याचे लक्ष गेले पार दमलेली दिसत होती,हिचा स्वैपाकाचा वेळ वाचवता आला तर तो वेळ इथल्या कामात उपयोगी पडेल.मनात विचार आल्याबरोबर त्याने राजेश्वरीला हा विचार बोलून दाखवला थोड्या नाराजीनेच ती तयार झाली.रात्री झोपायच्या आधी तिने वाड्यावरचा सेवक माखनला उद्यापासून आम्हा दोघांचे दोन्ही वेळचे जेवण बाकी सगळ्यांबरोबर असेल हे सांगितले.माखनला राजांनी मुद्दामच इथे राह्यला सांगितले होते.तो त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस होता.
रात्री दोघं बापलेक दिवसभराच्या थकव्याने लगेच झोपले.उद्या पुन्हा जंगलात फेरफटका मारावा लागणार होता.आधी तयार केलेले रंग उपयोगात आणता येतील पण ते पुरेसे नव्हते राजेश्वरीच्या स्वप्नात गहिरे रंग भरू लागले होते.
सौ.उषा.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)