मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ११ स्वतःच्या श्वासाचा आवाज...
                                                     श्री                                                     ११
स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा मोठ्ठा वाटावा अशी शांतता सगळीकडे होती.थंडी वाजत नसताना सुद्धा तिने चादर अंगावर लपेटून घेतली,जेमतेम डोळे उघडे राहतील एव्हढीच ओढणी डोक्यावर घेतली.भूक लागली होती पण बापू !छे बुवा आपण उगीचच राह्यलो घरी,विचारात दंग झालेल्या राजेश्वरीला जाग आली ती रघुनाथच्या आवाजाने,तिने बापूला घट्ट मिठी मारली.किंचित तक्रारीच्या स्वरात म्हणाली उद्यापासून मी पण येणार तुमच्या बरोबर.रघुनाथने तिला सांगितले की मोठ्या मुश्किलीने तिच्या राहण्याची परवानगी मिळाली आहे आता उगीचच हट्ट करून तिने हाती आलेले काम घालवू नये.राजेश्वरीला वाटलं सांगावा का तो आरश्याचा किस्सा ?पण नकोच बापू उलट तिलाच घाबरली म्हणून चिडवायचा त्यापेक्षा आपणच उद्या पुन्हा त्या खोलीत जाऊन बघू.
                    जेवण झाल्यावर रघुनाथ उद्या न जाता परवा राजवाड्यावर जाणार आहे हे कळल्यावर राजेश्वरी सगळा राग विसरून शांत झोपी गेली.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून दोघं बापलेक नेहेमीचं सामान घेऊन जंगलाकडे निघाले.फुलं गोळा करणं मोठच आनंददायक काम.चांगली मोठं टोपलं भरून फुलं जमा झाल्यावर सरपण गोळा करण्यात दोघांचा बराच वेळ गेला.आता सूर्यनारायण आकाशात आले म्हटल्यावर पाखरांचा चिवचिवाट जास्तच वाढला होता. फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे मस्त उडत होते.अचानक राजेश्वरीच्या मनात आले ह्यातली काही झाडं आपण त्या ओसाड वाड्याच्या अंगणात लावली तर आपल्याला बोलायला जिवंत पानं फुलं,अन त्यांच्या मोहानी आलेल्या फुलपाखरांची भुंग्यांची तरी निदान सोबत होईल,लगेचच तिने बापूला आपली कल्पना बोलून दाखवली,   रघुनाथने तत्काळ होकार दिला.हातातलं सामान खोलीवर ठेवून राजेश्वरी पुन्हा जंगलाकडे गेली,रघुनाथने पुष्कळ रोपं काढून ठेवली होती ती सगळी राजेश्वरीने टोपल्यात ठेवली अन दोघं बापलेक खोलीकडे निघाले,मारोती मंदिरा जवळ आल्यावर रघुनाथच लक्ष गेलं,मंदीर स्वच्छ केल्याबद्दल त्याने राजेश्वरीच कौतुक केलं.
रघुनाथ घरी नाही असे बघून राजेश्वरी राजमहालातल्या  त्या खोलीत डोकावून आली होती.मोठ्ठा आरसा समोर होता.आपल्याला काहीपण भास होतो काल रात्री कंदील बहुतेक भलत्याच भिंतीवर धरला होता.स्वतःच्या मूर्खपणावर तिला स्वतःलाच हसू आलं.राजेश्वरीचा स्वैपाक अन इतर कामं होईपर्यंत  रघुनाथ पुन्हा एकदा बैलांना घेऊन जंगलात जाऊन आला होता त्याने भरपूर हिरवी पानं अन जांभळ्या रंगाची फुलं आणली होती.एक मोठा दगड कोरून त्याने मारोती पुढे लावायला दिवा पण तयार केला.
                                               सौ.उषा.