बुधवार, १ फेब्रुवारी, २०१२
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य
उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५५ दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा ...
किल्ल्याचे रहस्य
श्री ५५
दुपारी केशर घाई घाईने राजेश्वरीला एक कपड्यांचा जोड देऊन गेली.हा साधा वेश आणी नेहेमीच्या पद्धतीचा,राजेश्वरीला मनापासून आनंद झाला,तिने झटकन त्यातला एक अंगावर चढवला सुद्धा.हल्ली राजेश्वरीला पण जरा आरश्यात डोकवून पाहावेसे वाटू लागले होते. त्यामुळे अंगावरचा विटका अन फटका कपडा तिने लगेच टाकून दिला. कपडा अगदी नवा नव्हता केशरनी तिच्या जवळचा एक जोड आणून दिला होता,पण राजेश्वरीच्या कपड्यांपेक्षा नक्कीच चांगला होता.
कसातरी दिवस घालवून संध्याकाळी राजेश्वरी रघुनाथला घेऊन सौधाकडे गेली.अंधार पडेतो ते बापलेक सभोवतीचा परिसर न्याहाळत उभे होते.मागे कुणाची तरी चाहूल लागली म्हणून तिने सहज वळून पहिले सुजयराजे अन राजकन्या लगबगीने येत होते.त्यांनी हळू आवाजात विचारले आम्हाला उशीर झाला का?राजेश्वरीने नाही अशी मान हलवली,आता मात्र लवकर निघायला पाहिजे.
आज सुवर्णरेखा फारच खूष होती.तिला कुणीतरी कसल्यातरी कामात सामावून घेणार याचा तिला अतोनात आनंद झाला होता.इकडे राजेश्वरीला काळजी होती की जर सुकन्याने विचारले की तो दुर्मिळ फुलांचा हार कुठे आहे तर आपण काय उत्तर देणार तिने लगेच ही शंका सुजयराजांजवळ बोलून दाखवली त्यावर त्यांनी तिला काहीतरी कानात सांगितले ते तिला पटले.सगळीकडे मिट्ट काळोख पसरला होता. त्या पायरी जवळच्याच मार्गाने खाली जायचे नक्की झाले होते.पायरी जवळ येऊन सुजयराजांनी तिथल्या फुलाच्या पाकळ्या फिरवायला सुरवात केली,पायरी बाजूला सरकल्या बरोबर आत लोंबणारा दोरखंड त्यानी धरला अन झटकन आत उतरले,इकडे रघुनाथने पायरी धरून ठेवली होती,हातातली काठी घट्ट धरून राजेश्वरी अन राजकन्या पाठोपाठ आत उतरल्या अन सगळ्यात शेवटी रघुनाथ.राजेश्वरीने रघुनाथचा हात धरला एक तर अंधार होता अन रघुनाथ आज पहिल्यांदाच इथे आला होता.त्या दोघा बापलेकीचे बघून राजकन्या पण कुठूनशी एक काठी घेऊन आली होती.ती अगदी राजेश्वरी प्रमाणे वागायचा प्रयत्न करत होती.अंधारात चालत शेवटी ते त्या दालना जवळ येऊन पोचले.रात्रीची वेळ असल्याने फारशी वर्दळ नव्हती.त्या तिघांना तेथेच थांबवून सुजयराजे तिथून निघून गेले.थोड्याच वेळात केशर तिथे आली,तिच्याशी बोलून राजेश्वरीने झटकन निर्णय घेतला आता राजेश्वरीने अन छोट्या राजकन्येने केशरचा हात घट्ट धरून तिला ओढत सुकन्याच्या दालनात आणले,तिच्या अपेक्षेप्रमाणे सुकन्या तिच्यावर जोरात ओरडली तू दोन तीन दिवस कुठे होतीस? काम करायला नको तुम्हाला ?चांगले फटके मारायला हवे,तिचे सगळे बोलणे झाल्यावर राजेश्वरी नम्र स्वरात म्हणाली महाराणी सुकन्या आपण रागावला ते अगदी बरोबर आहे फक्त माझ्या ऐवजी या केशरला रागवावे,आपणा करता केलेला हार हिने चक्क सुजय राजांना देऊन टाकला आणी ही आम्हाला इथे आपल्या समोर येऊ देत नव्हती,आत्ता आम्ही बळजबरीने आत आलो आहो,हे ऐकल्यावर सुकन्याचा अवतार पाहण्यासारखा होता.ती केशरला खूप रागावली अन ताबडतोब तिला हा महाल सोडून जायला सांगितले.तिने राजेश्वरीची आपल्या सेवे करता निवड केली.राजेश्वरीला अगदी हवे तसेच सगळे घडले होते.तिने सुकन्याला वाकून नमस्कार केला,तिचे बघून सुवर्णरेखेने पण तसाच नमस्कार केला.आता डाव पूर्णपणे राजेश्वरीच्या हातात होता,म्हणजे निदान तिला तरी असे वाटत होते.
सौ.उषा.
सौ.उषा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)