रविवार, २५ डिसेंबर, २०११

                          श्री                   ४१
मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरला कारण रघुनाथ बद्दल त्यांना खात्री होती पण राजेश्वरी उत्कृष्ट चित्र काढू शकते ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.दोघही बापलेक चित्र कुठले काढावे यावर विचार करू लागले.एरवी रघुनाथ अस्वस्थ झाला नसता,पण आज त्याच्या लेकीची मनःस्थिती ठीक नव्हती अन सुजयराजांच्या मित्रांमध्ये काही जाणकार इंग्रज मित्र पण असल्याचे त्याला माखन कडून कळले होते.चित्र काढावेच लागणार होते फार विचार करूनहि उपयोग नव्हता.
                  राजेश्वरीने रघुनाथच्या पायावर डोके ठेऊन चित्र काढण्यास सुरवात केली.कुठले चित्र काढणार आहे हे तिने हळू आवाजात बापूला सांगितले.रघुनाथ झटपट कामाला लागला,कारण त्या चित्राची आरास त्यालाच करायची होती.भिंतीवर साकार होणाऱ्या चित्राची उत्सुकता शिगेला पोचली होती.दिवसभर तहान भूक हरपून दोघही बापलेक कामात दंग झाले ते एकाच वेळेस चित्र पूर्ण करून खाली बसले.राधाकृष्णाचे अप्रतिम चित्र साकार झाले होते.राजांचे इंग्रज मित्र जागचे उठून त्या दोघांजवळ आले अन त्यांचे अभिनंदन करू लागले.ते बघून इतरही मित्र मंडळी त्या दोघांजवळ येऊन पोचली.रघुनाथ अन राजेश्वरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.दोघही विनम्रपणे या वर्षावात नाहून निघत होते.सुजयराजांनी माखनला त्या दोघांकरता काही खायला आणायला सांगितले.सगळ्यानी राजेश्वरीचे खूप कौतुक केले,हे बघून सुजयराजे प्रसन्न झाले होते.एकाएकी ते आपल्या जागेवरून उठून राजेश्वरीजवळ आले,राजेश्वरीच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले होते, त्यांनी राजेश्वरीकडे वळून एकदम विचारले "मी खूप दिवस एकटाच आहे,सुयोग्य जोडीदाराच्या शोधात मी होतो,आज मला असे वाटते आहे की तूच माझ्या जीवनाचे संगीत आहे,मी तुझ्याच शोधात होतो,तू जर मला होकार दिला तर या पृथ्वीवर मी सगळ्यात भाग्यवान व्यक्ती असेन.माझे जवळचे मित्र,आणी तुझे वडील यांच्या समक्ष मी तुला लग्नाची मागणी घालतो आहे.तुला पसंत नसेल तर तू नकार देऊ शकतेस.तुला स्वीकार असेल तर तू यातले लाल गुलाबाचे फूल या तूच काढलेल्या राधाकृष्णाच्या चित्रापुढे ठेव आणी नकार असेल तर पांढरे फूल ठेव.राजेश्वरीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.आपण ऐकले ते खरे की खोटे?राजे रजवाड्यांच्या गमती जमतीचा तर हा भाग नाही.एरवी धिटाईने सगळ्यांकडे बघणारी राजेश्वरी आत्ता मात्र मान वर करून पाहू शकत नव्हती.इतक्यात राजांचा एक मित्र अधीर स्वरात ओरडला,लाल की पांढरे फूल ? लवकर निर्णय द्या बा !रघुनाथची अवस्था तर फारच विलक्षण झाली होती.अजून राजेश्वरीने निर्णय घेतला नव्हता पण ती जणू आजच सासरी जायला निघाल्या प्रमाणे त्याला दुखः होत होते.एकीकडे लेकीची काळजी मिटली म्हणून आनंदही वाटत होता.                                                                राजेश्वरी फुलांच्या तबकाच्या   दिशेनी निघाल्या बरोबर सगळ्या उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.सुजयराजांच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते.राजेश्वरी तबकाजवळ अशी उभी होती की तिने कुठले फूल उचलले हे कोणालाच दिसले नाही,राधाकृष्णाच्या चित्रापुढे तिने ओंजळ रिकामी केली अन कुणालाही काही कळायच्या आत ती राजमहालातून धावत बाहेर पडली.
                               सौ.उषा.
                 

Adding a site with Google Friend Connect to your Reading List

Adding a site with Google Friend Connect to your Reading List

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री 40 राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्य...

किल्ल्याचे रहस्य

                                                श्री                                40          
राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्या आवाजाने.सुजयराजे रघुनाथला सांगत होते उद्या सकाळी ९ वाजता राजमहालाच्या भिंतीवर दोघांनी चित्र काढायचे आहे.येताना नवे कपडे घालून या अशी आठवण सुजय राजांनी करून दिली,रघुनाथने मान डोलावून होकार दिला. 
                    रात्री रघुनाथ जवळ जवळ जागाच होता,ही मुलगी पुन्हा नाहीशी झाली तर काय.रात्र संपून दिवस उजाडला दोघही बापलेक आंघोळ करून तयार होऊन बसले,सध्या त्यांनी त्यांचे रोजचेच कपडे घातले होते.अगदी जाताना नवे कपडे घालू असे ठरले.काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून  दोघं विचारात असतानाच एक स्त्री त्यांच्या खोलीकडे येताना दिसली.ती जवळ आल्यावर राजेश्वरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ती केशर होती.राजेश्वरी एकदम उठून उभी राह्यली तू? इथे?केशर हसत हसत आत आली अन म्हणाली  आता जास्त बोलायला वेळ नाही तुला व्यवस्थित तयार करून आणायला मला सांगितले आहे . हे बघ मी काही सामान पण आणले आहे.राजेश्वरी म्हणाली मी अंघोळ करून तयारच आहे फक्त कपडे बदलले की झाले.केशर यावर मस्त हसली,तिने राजेश्वरीला तिच्या पुढे बसण्यास सांगितले,थोड्या नाराजीने राजेश्वरी तयार झाली.अर्ध्या तासात केशरने तिच्या केसांना तेल लावून सुंदर केश रचना केली,अन तिला सुजयराजांनी दिलेले नवे कपडे घालायला सांगितले.कपडे घातल्यावर तिने राजेश्वरीला ओढत आरश्याच्या खोलीत नेऊन आरश्या समोर उभे केले.आरश्यातल्या राजेश्वरीला बघून राजेश्वरी थक्क झाली किती सुंदर दिसत होती ती!केसांना तेलाची तकाकी,त्यांची विलोभनीय रचना अन गुलाबी रंगाच्या कपड्यात खरोखरच तिचा कायापालट झाला होता.रघुनाथ पण आपल्या मुलीचे हे नवे रूप बघून स्तिमित झाला होता.केशरनी तिला हळूच आठवण करून दिली राजमहालात जायची वेळ झाली होती.तिचे वाक्य संपता संपता माखन बोलवायला आला.रघुनाथ पण आज नवे कपडे घालून तयार होता,त्यांचे रंगाचे साहित्य,माखन आणी दुसरे काही सेवक आणणार होते त्यामुळे रघुनाथ अन राजेश्वरी दोघही त्या राजमहालाकडे निघाले.
                       राजमहालाच्या प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या सेवकांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या करता असलेल्या मंचावर त्यांना बसायला सांगितले.ठरलेल्या वेळेच्या थोड्या आधीच दोघही बापलेक हजर असलेले बघून सुजयराजे खूष झाले.राजेश्वरीचे मनमोहक रूप आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.सुजयराजे स्वतःला मोठ्या कष्टाने आवरत होते.तिच्याकडे बघण्याचा अनावर मोह मनाला होऊनही त्यानी स्वतःला संयमाने बांधून ठेवले होते.सुजयराजांची सगळी मित्र मंडळी जमल्यावर सुजयराजांनी राजेश्वरीची सगळ्यांना ओळख करून दिली. आधी थोडे खाऊन मग त्या दोघांनी चित्र काढावे असे ठरले.
                 रघुनाथ अन राजेश्वरी दोघही अतिशय संकोचले होते. ह्या आधी त्यांना इतके बरोबरीच्या नात्याने कुणीच वागवले नव्हते अन त्यांचीही तशी अपेक्षा नव्हती.सुजयराजांच्या व्यक्तिमत्वाने दोघही खूपच प्रभावित झाले होते.राजेश्वरीच्या इच्छेविरुद्ध सुजयराजांचे चित्र तिच्या मनःपटलावर कोरले गेले होते.ते पुसण्याचा निष्फळ प्रयत्न राजेश्वरीने चालवला होता,कारण ती कुठल्याच दृष्टीने त्यांच्या योग्य नव्हती,सगळ्यात मुख्य ते विवाहित होते,राणी सुकन्या जिवंत होती,हे राजेश्वरीने स्वतःच्या डोळ्याने पहिले होते.काय करावे ?या मनाला कसे समजवावे ?डोळ्यात जमा झालेले पाणी राजेश्वरीने हलकेच निपटून टाकले.एकदा हे चित्राचे काम झाले की आपण येथून निघून जाणार आहो मग सुजय राजे आपल्याला दिसणार नाही,त्यांच्याशी तसाही आपला काही संबध नाही असे स्वतःला बजावत राजेश्वरी चित्र काढण्याकरता सज्ज झाली.
                                     सौ.उषा