श्री ३३
राजेश्वरी जीव मुठीत धरून समोरचा दरबार बघत होती.ती ज्या आसनाच्या मागे लपली होती तिथे एक स्त्री येऊन बसल्याचे तिला एव्हाना कळले होते.सुजयराजांच्या किल्ल्यात त्यांच्याशिवाय आणखीही कुणी राहतंय हे त्यांना तरी माहित आहे की नाही कोण जाणे. स्वतःशीच विचार करत बसलेली राजेश्वरी एका त्रासदायक चिरक्या अन चिडक्या आवाजाने पुन्हा भानावर आली.कुणी तरी जोरात ओरडून विचारत होते अजून दरबाराचे काम सुरु का झाले नाही?दबक्या विनवणीच्या सुरात कुणीतरी उत्तर दिले आज आरोपींना आणायला उशीर झाला म्हणून महाराणीनी रागवू नये.त्याचे वाक्य संपता संपता दोघा तिघांना फरपटत आणले गेले.आणलेली माणसे खाली मान घालून उभी होती.ती स्त्री जिला महाराणी म्हटले होते ती एकदम उत्तेजित झाल्यासारखी ओरडली सुदर्शन अन सुलक्षणा दोघांना आमच्या समोर पंचवीस फटके मारा अन दिवसभर उपाशी ठेवा,राजेश्वरी दचकून समोर बघू लागली,पण हे काही महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणा नाहीत.अन दर फटक्यानिशी ते कळवळून ओरडत होते,विनवणी करत होते,ती स्त्री मात्र फारच आनंदित होत होती.हा सगळा विलक्षण प्रकार काय आहे ह्या विचारात असलेल्या राजेश्वरीच्या कानावर पुढचे वाक्य पडले त्या सुजयराजाला आमच्या समोर हजर करा अन त्याला चांगले पन्नास फटके मारा,अन हो त्याच्या मुलीला सोडू नका बरका ती पण विषवल्लीच आहे.तिला पण झोडपून काढा.एव्हढे ऐकल्यावर राजेश्वरी भान हरपून एकदम उभीच राहणार होती पण मोठ्या कष्टाने तिने स्वतःला आवरले.फटक्यांची शिक्षा झालेली माणसं तिथेच खाली बसली होती.राजेश्वरीला त्यांची खूप दया आली,अन त्या स्त्रीचा भयंकर संताप राग आला.हे काय गौडबंगाल आहे हे काही केल्या कळत नव्हते.तिने कानोसा घेतला ती महाराणी म्हणवणारी स्त्री उठून गेली होती पण समोर अजूनही ती फटके खाल्लेली माणसं बसली होती ,जरा वेळाने तिला पुन्हा गडबड ऐकू आली,राजेश्वरीने बघण्याचा निष्फळ प्रयत्न केला,इथून केव्हा बाहेर पडता येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता,तिला आता बापूच्या काळजीने घेरले,तो पण आत आला तर छे आपण इथून तडक बाहेर पडले पाहिजे पण कसे ?एका ओळखीच्या आवाजाने राजेश्वरी विचारचक्रातून बाहेर पडली,होय हा नक्कीच सुजयराजांचा आवाज आहे.
सौ.उषा.