श्री ४३
राजेश्वरी खोलीत परत आली.रघुनाथ तिचीच वाट बघत होता.ती आल्या आल्या तो म्हणाला "अग थोडं माझ्या म्हातारपणाचा विचार कर मी दिवा घेऊन शोधला असता तरी मला तुझ्या करता इतका चांगला नवरा शोधता आला नसता,मी खर म्हणजे तुझ्या काळजीने जास्त थकलो आहे.पोरी माझे केस काही उन्हात पांढरे झाले नाही,सुजयराजांनी तुला पसंत केली ही तुझी पूर्व पुण्याई फळाला आली असं समज त्यांना नकार देण्याचा करंटेपणा करू नकोस."राजेश्वरीने निमूट सारे बोलणे ऐकून घेतले .ती फक्त इतकेच म्हणाली "बापू मला जे माहिती आहे ते तुला माहिती नाही पण लवकरच मी ह्यातून काहीतरी मार्ग काढीन".रघुनाथ मान फिरवून झोपून गेला.
आता सगळी जवाबदारी राजेश्वरीवर होती.कुठून सुरुवात करावी हेच तिला कळत नव्हते.तिला कुणाची मदत नको होती कारण तो कुणीतरी राजांचाच माणूस असेल अन तो आपल्याला खरे काय ते कळू देणार नाही असे तिला वाटत होते.आज दिवसभर दोघांनाही खूप शारीरिक आणी मानसिक ताण पडला होता.आज इथून निघून जायचं अस नक्की ठरवलं असता आज पुन्हा थांबावं लागलं होतं.या थांबण्यात कुठेतरी खूप आनंद होता पण एक बोच होती ती दूर झाल्या शिवाय,छे! या विचारचक्रातून बाहेर कसं पडायचं तेच कळत नाही राजेश्वरी उशीरा रात्री केव्हातरी झोपली.
रात्री लवकर झोपल्यामुळे रघुनाथ सकाळी लवकर उठला होता.जरा वेळाने सुजयराजे येताना दिसले म्हणून त्याने खोलीचे दार ओढून घेतले आणी तो बाहेर येऊन उभा राह्यला.सुजयराजांनी अभिवादन केले तेव्हा रघुनाथला फारच संकोचल्यासारखे झाले,त्यांची नजर राजेश्वरीला शोधात होती पण रघुनाथ मुद्दामच न कळल्यासारखे दाखवून दुसऱ्याच विषयावर बोलत होता.राजेश्वरी सुजयराजांचा आवाज ऐकून धडपडून उठून बसली होती पण ती पण बाहेर आली नाही,एकतर तिने कालचे नवे कपडे पण बदलले नव्हते ,म्हणजे तिला खरतर सुचलंच नाही कारण इतक्या दिवस तिच्याकडे मोजून दोन कपडे असायचे आणी एकदा ते अंघोळ केल्यावर अंगावर चढवले की पुन्हा बदलण्याकरता दुसरे कपडे नव्हते आणी त्याची गरज पण नव्हती.अर्थात आज राजेश्वरीला या गोष्टीची पहिल्यांदाच जाणीव झाली.बाहेर एक अजून आवाज ऐकू आला म्हणून न राहवून राजेश्वरी बाहेर आली.आलेल्या व्यक्तीला बघून राजेश्वरीच्या डोक्यात अकस्मात एक कल्पना आली आणी तिचा चेहेरा आनंदाने फुलून गेला तिला तिच्या मोहिमेत हवा तसा साथीदार मिळाला होता.
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा