महाराज क्षणभर विचारात पडले पण पुढच्याच क्षणी त्यांनी सर्व सेवक आणी राजेश्वरीला महालाच्या बाहेर जाण्यास सांगितले.त्यांना जे काही सांगायचे होते ते ते फक्त रघुनाथला सांगणार होते.खूप वेळ बाहेर वाट बघत बसलेली राजेश्वरी भिंतीला टेकून केव्हा झोपली ते तिलाही कळले नाही.रात्री नाही म्हटलं तरी जागरण झालेच होते त्यात दोन तीन दिवसांची पायपीट,राजेश्वरी आणखी पुष्कळ वेळ झोपली असती ती जागी झाली तीच राजकन्या सुवर्णरेखेच्या किंचाळण्याने,महाराजांच्या कक्षाचे दार बंद होते, आणी सेवक तिला आत जाऊ देत नव्हते.तिने रागा रागाने राजेश्वरीला जोरात हलवून विचारले ही काय झोपायची वेळ आहे की जागा?तिने राजेश्वरीला थपडा मारायला सुरुवात केली.राजेश्वरीने हलका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच राजकन्या आणखीच चवताळली.बाहेरचा आरडा ओरडा ऐकून महाराज स्वतःच बाहेर आले त्यांनी राजकन्येला हळुवार थोपटले,एव्हाना महाराणी सुलक्षणा आणी रघुनाथ पण बाहेर आले होते.राजकन्या बरीच शांत झाली होती.महाराज रघुनाथला म्हणाले की त्यांनी इतकं सांगितल्यावर आता जुन्या राजवाड्यात राहण्याच्या रघुनाथच्या विचारात फरक पडला आहे की नाही?रघुनाथ नम्रपणे म्हणाला की महाराज माझ्या सारख्या सामान्य माणसाबद्दल आपल्याला इतकी काळजी वाटते हे आपल्या मोठ्या मनाचे अन प्रेमळ स्वभावाचे निदर्शक आहे पण मला कृपा करून त्या वाड्यात एका खोलीत रंगकामाची तयारी अन एक खोली राहण्याकरता मिळाली तर सोयीचे होईल.मी माझी अन राजेश्वरीची पुरेशी काळजी घेईन.महाराजांनी नाईलाजाने त्यांना परवानगी दिली अन राजवाड्यातल्या सेवकांना रघुनाथला आवश्यक ते सामान अन मदत करण्याची आज्ञा दिली.महाराजांना नमस्कार करून रघुनाथ अन राजेश्वरी आपल्या नवीन ठिकाणाकडे निघाले।
सौ.उषा.
सौ.उषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा