शनिवार, १२ नोव्हेंबर, २०११

                                                 श्री                                         16
                         राजेश्वरी नमस्कार करून किती तरी वेळ उभी होती.महाराज म्हणाले ही झाडं कुणी लावली?अन हे कारंज हे कुणी सुरु केलं?त्यांना खर म्हणजे या प्रश्नाच उत्तर माहीत होतं,राजेश्वरी घाई घाईने स्पष्टीकरण देऊ लागली,इथे फारच गवत वाढलं होतं,कारंजात कचरा कुजून घाण वास येत होता,मनातल्या मनात राजेश्वरी चांगलीच घाबरली होती कारण ही जागा आपली नसताना त्यात आपण मूळ मालकाला न विचारता बदल केले हे आपलं चुकलच आहे ह्या विषयी तिला अजिबात शंका वाटत नव्हती,पण अश्या अडचणीच्या प्रसंगी बापू पण बरोबर नाही.सुदर्शन महाराज एकटेच कसे काय आले?तिच्या मनातले सगळे प्रश्न समजल्या सारखे महाराज बोलू लागले.
                                  महाराज म्हणाले की राजेश्वरीचे त्यांना फार कौतुक वाटले.आता अर्थातच महाराज वेगळ्याच कारणाने तिथे आले आहेत.मग महाराजांनी तिला रघुनाथच आजारपण,सुजय राजांच्या खोलीचे अर्धवट राहयलेले रंगकाम.रघुनाथने सुचविलेले राजेश्वरीचे नाव अन त्याला महाराजांनी केलेला विरोध असं सगळं तपशीलवार सांगितलं अन मग महाराज म्हणाले की रंगकाम करण्याचा राजेश्वरीला कितपत अनुभव आहे माहीत नाही पण तरी सुजय राजे येण्याची वेळ अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपल्यामुळे ते तिला ही संधी देऊ इच्छितात.
                                राजेश्वरीचा थोड्यावेळ स्वतःच्या कानावर विश्वासच बसेना,जरा वेळाने तिने ही जवाबदारी घ्यायला तयार असल्याचे महाराजांना सांगितले.महाराजांनी तिला लगेच राजवाड्यावर येण्याचा हुकुम सोडला,राजेश्वरीने नम्र शब्दात त्यांना जाणीव करून दिली की इथे रघुनाथने तयार केलेला रंग आहे आणी तोच बरोबर नेणे आवश्यक आहे.महाराजांनी तिला गाडीतून सर्व सामान घेऊन येण्यास सांगितले.राजेश्वरीकरता राजवाड्यातून गाडी जाणार हे राजवाड्यात सगळ्यांनाच समजले.प्रत्येकाला राजेश्वरीचा कौतुक मिश्रित हेवा वाटू लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: