रविवार, २७ नोव्हेंबर, २०११

किल्ल्याचे रहस्य

                                                     श्री                                                २६
               राजेश्वरी पाठलाग  करत निघाली खरी पण आपण नेहेमी बरोबर घेतो ती काठी घेतली नाही अन बापूला निदान सांगायला तरी हवे होते असे तिला वाटू लागले,तिला पाठलाग करताना पाहून इकडे त्या स्त्रीने आपली गती वाढवली,आज या प्रकरणाचा छडा लावायचाच असे ठरवून राजेश्वरी पण तिच्या मागे निघाली.ती सौधाकडे जाणाऱ्या जिन्याकडे जाऊ लागल्यावर राजेश्वरी पण धीटपणे निघाली.तिला पायऱ्या चढताना बघून राजेश्वरी ओरडली ए थांब कोण आहेस तू?आता ती स्त्री चक्क पायरीवर बसलेली दिसत होती अन राजेश्वरी तिला गाठणार तोच ती नाहीशी झाली.
                     राजेश्वरी पायरीजवळ आल्यावर तिच्या मनात एक विचार आला अन ती तो अमलात आणणार इतक्यात तिला रघुनाथचा आवाज आला अन त्याच्या बरोबर  कंदील काठ्या घेऊन येत असलेले  बरेच लोक दिसले.ती मागे फिरली,तिच्या चेहेऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता.रघुनाथ तिला खूप रागावला.त्याला न उठवता एकट्यानेच जाऊन राजेश्वरीने चांगले केले नाही असे बाकीच्या लोकांचे पण मत पडले.तिला घेऊन सगळे परत निघाले. खाली मान घालून राजेश्वरी चुपचाप ऐकून घेत होती.खोलीवर आल्यावर रघुनाथने तिला चांगलेच फैलावर घेतले.राजेश्वरी हळू आवाजात फक्त एव्हढच म्हणाली की मला हे रहस्य उलगडून काढायचे आहे कारण इथल्या लोकांच्या मनातली भीती मला दूर करायची आहे.रघुनाथ पाठ करून झोपून गेला.
                                पुढचे आठ दहा दिवस राजेश्वरीने कामाला वाहून घेतले.रघुनाथने सिव्हासनाच्या मागच्या भिंतीवर रथारूढ सूर्यनारायणाचे अप्रतिम चित्र काढले होते,आकाशी रंगाच्या पार्श्वभूमीवर ते फारच सुंदर दिसत होते.सुजयराजे रघुनाथवर प्रसन्न होते. उजवीकडच्या भिंतीवर राजेश्वरीने चित्र काढावे अशी त्यांची इच्छा होती अन त्याप्रमाणेच राजेश्वरी कामाला लागली होती. 
                                                           सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: