श्री २८
अलगद पाय टाकत राजेश्वरी पुढे निघाली.ती दोन्ही हातांनी चाचपडत चालत होती.डोळे अंधाराला सरावले होते.पुष्कळ वेळ चालल्यावर तिला माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला,थोड्या प्रकाशाची तिरीप पण दिसू लागली होती,आपल्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज फार जोरात येतो आहे असं वाटून ती आणखीच जपून चालत होता आता ती पुढे पाऊल टाकणार तोच एका मजबूत हाताने तिचे तोंड दाबून धरले.घाबरलेल्या राजेश्वरीने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला नाही,कसंबसं स्वतःला सावरून तिने डोळे घट्ट मिटून घेतले.आता जे काय होईल त्याला सामोरं जायला हवं अशी मनाची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती.तिला जवळ जवळ ओढत,फरफटत त्या व्यक्तीने एका ठिकाणी आणले,कुठलेसे दार उघडून तिला आत ढकलून त्याने पुन्हा दार लावून घेतले.एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली राजेश्वरी तिथेच बेशुद्ध होऊन पडली.
सकाळी जाग आल्यावर ती पटकन उठून बसली.आपण आहो तरी कुठे हे बघण्या करता ती इकडे तिकडे बघू लागली.ही जागा आपल्या ओळखीची आहे नक्कीच राजेश्वरी आनंदाने बघू लागली त्या आरश्याकडे.होय ही तीच खोली आहे आरश्याची जादू असलेली.पण आपल्याला तर कित्येक कोस चालल्या सारखे वाटते आहे.पाय किती दुखताहेत.हातालाही खूप खरचटलं आहे.उजवा हात तर दुखतो पण आहे.बाहेर उजाडले होते,राजेश्वरी हळूहळू आपल्या खोलीत आली.
राजेश्वरी रात्रभर न आल्याने सगळ्यांनाच खूप काळजी वाटत होती.सगळीच रात्रभर जागी होती.रघुनाथने सगळ्यांच्या देखत तिला जोरात थप्पड मारली.राजेश्वरी रडत रडत रघुनाथच्या गळ्यात पडली.बापू मी आता नाही जाणार मला माफ कर असे म्हणून पण रघुनाथचा राग ती शांत करू शकली नाही.
दिवसभर राजेश्वरी खोलीत झोपून होती.तिला चांगलाच ताप भरला होता.रघुनाथने तिला कसलासा पाला उकळून काढा करून प्यायला लावला पण अजूनही त्याचा राग गेला नव्हता.कालपासून राजेश्वरी अन रघुनाथ उपाशीच होते.रघुनाथ खोलीचे दार लोटून राजमहालाच्या कामाला निघून गेला.राजेश्वरीचे विचारचक्र एकीकडे सुरूच होते.मी पुन्हा तिथे जाणार नाही असं म्हणत असतानाच तिचे आतले मन म्हणत होते मी पुन्हा नक्कीच तिथे जाईन,पुरत्या तयारीनिशी,तिला स्वतःचेच एकीकडे नवल वाटत होते,या रहस्याचा उलगडा करून तिचा कोणचाच फायदा नव्हता,हे काम संपल्यावर त्यांना इथून लवकरच जायचे होते.तिच्या उजव्या हाताला ठणका लागला होता त्याच्याकडे मधून मधून तिचे लक्ष जात होते.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता.
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा