श्री ३५
केशरनी राजेश्वरीला तिच्या मागे यायला सांगितले.त्या दोघी तिथून भरभर चालत निघाल्या.एका कपाटा जवळ येऊन केशर थांबली,तिने कपाटाचे दार उघडले,त्यातले दोन लाकडी खण खाली काढून ठेवले अन मग राजेश्वरीला तिथून दिसत असलेल्या भुयारात जायला सांगितले,राजेश्वरी चुपचाप भुयारात उतरली,,तिच्या पाठीवर खाडकन दार आपटल्याचा आवाज आला.मागे आणी पुढे गुडूप अंधार स्वतःच्या संरक्षणाचे कुठलेही साधन नाही अश्या अवस्थेत राजेश्वरी पुढे जात होती.डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या पण रहस्याचा उलगडा झाल्याशिवाय चैन पडत नाही असा स्वभाव !कितीतरी वेळ ती चालत होती भुयार संपतच नव्हते,तहान आणी भूक या दोन्ही शरीराच्या गरजा आता उग्र झाल्या होत्या पण तिकडे लक्ष द्यायला राजेश्वरीला वेळ नव्हता.इथून बाहेर पडणे हे पहिले लक्ष्य होते.
इकडे रघुनाथची वेगळीच पंचाईत झाली होती.रात्री त्याने खूप प्रयत्न करून पण ती पायरी जागची तसूभर सुद्धा सरकली नव्हती,शेवटी पहाटे कंटाळून तो आपल्या खोलीवर परत आला.आता त्याला वेगळीच चिंता भेडसावू लागली,उजाडल्यावर काही वेळाने राजमहालात जावे लागणार, राजेश्वरीच्या न येण्याचे कुठले कारण आपण सांगणार आहोत?रघुनाथला एकाच वेळेस राजेश्वरीचा राग आणी काळजी दोन्ही वाटत होती.या मुलीचे एकदा लग्न लावून दिले म्हणजे आपली या काळजीतून सुटका होईल,पण लग्न करणार कोण आपल्या ह्या विचित्र मुलीशी?अश्या कितीतरी विचारांनी रघुनाथ बिचारा हैराण झाला.नाही म्हटले तरी त्याचेही आता वय झाले होते,अन वयापेक्षाही गरीबी,भटकंती,अन काळजीने तो जास्त थकला होता.
आंघोळीला जायच्या आधी रघुनाथने गाद्या अन उशांची रचना अशी काही केली की बघणाऱ्याला वाटावे कुणी पांघरूण घेऊन झोपले आहे.वाटेत त्याला माखन भेटला,स्वतःच्या स्वभावाच्या विरुद्ध रघुनाथने त्याला आजच्या मेजवानीची तयारी कशीकाय चालली आहे अशी चौकशी केली,बोलता बोलता रघुनाथने माखनला हेही सांगितले की राजेश्वरीला चांगलाच ताप भरला आहे अन ती अगदी झोपून आहे आजच्या कार्यक्रमाला ती कितपत येऊ शकेल ह्याची शंकाच वाटते हे सांगायला पण रघुनाथ विसरला नाही .
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा