मंगळवार, १० जानेवारी, २०१२

                                         श्री                                    ४८
राजेश्वरी राजकन्येचा हात घट्ट धरून अंधारात दडून बसली होती.ती मनातल्यामनात देवाचा धावा करत होती "देवा केशर दिसू दे",माखन तर सुजयराजांबरोबर गेला असल्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता.केशर पण दिसत नव्हती त्यात ही राजकन्या,अन पुढे घडणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेनी राजेश्वरी शहारली.आता थोडी हिम्मत दाखवावी लागणार होती,तिनी पुन्हा एकदा राजकन्येला सांगितले काहीही बोलायचे नाही,मी बोलीन तेच फक्त ऐकायचं.सुवर्णरेखा आता चांगलीच उतीजीत झाली होती,तिने पटकन मान डोलावली.राजेश्वरी एकदम पुढे झाली अन समोरच्या स्त्रीला म्हणाली केशर कुठे आहे ?इथे दोन नवीन नोकर हवे आहे म्हणून तिने आम्हा दोघीना बोलावले होते.ती स्त्री पण राजेश्वरीच्या अकस्मात पुढे येण्याने दचकली होती पण तिने केशारचे नाव घेतल्याने लगेच सावरून म्हणाली "नवीन नोकर ?मला काहीच माहीत नाही,पण मी तुला बाईसाहेबांकडे घेऊन चलते.त्या दोघी तिच्या मागे चालू लागल्या.एका प्रशस्त दालनात आल्यावर तिने केशरला हाक मारून या दोघींकडे खूण केली.त्या दोघीना समोर बघून केशर चांगलीच घाबरली होती तिला याची कुठलीही पूर्वसूचना नव्हती त्यात राजेश्वरी राजकन्येला बरोबर घेऊन आली होती.तिचा गोंधळ राजेश्वरीच्या लक्षात आला.ती पटकन म्हणाली इथे दोन नवीन नोकर हवे म्हणून तूच नाहीका आम्हाला बोलावले?केशर चाट पडली पण लगेच साव्र्रोन म्हणाली हो इथे इतकं काम आहे की दोन काय चार सुद्धा नोकर कमीच पडतील पण नोकर मात्र आमच्या बाईसाहेबच निवडतात.केशर लगेच म्हणाली "महाराणी सुकन्या आपणास ह्या नवीन नोकरांना काही प्रश्न विचारायचे आहे का?सुकन्याने एक तुच्छ नजर त्या दोघींवर टाकली अन म्हंटल ठीक आहे केशर तुझ्या चाचणीतून उतीर्ण झाल्या आहेत न मग मी नको विचारायला काही शिवाय दरबाराची वेळ पण होत आली आहे.राजकन्या सुवर्णरेखा आश्चर्याने थक्क झाली होती.ही तिच्या समोर तिची आईच होती अन तरीही तिने आपल्याला ओळखू नये याचे तिच्या बालमनाला विलक्षण दुखः होत होते.न जाणो आपल्या आई सारखी दिसणारी ही कुणी दुसरीच स्त्री असावी,आणी आपली आई तर सुजयराजांच्या हातून मेली आहे.डोळ्यात सारखे पाणी येत होते. राजेश्वरीला तिची अवस्था समजत होती पण आत्ता ह्या क्षणाला ती काहीही बोलू शकत नव्हती 


काहीतरी सुचून राजेश्वरीने तिथल्याच तबकातले एक
सुंदर गुलाबाचे फूल उचलले,राणी सुकन्याच्या जवळ जाऊन तिने ते फूल तिच्या पुढे ठेवले अन म्हणाली महाराणी सुकन्याचा जयजयकार असो,आपल्या सेवेची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही दोघी आपल्या आभारी आहोत.महाराणी म्हटल्याने खुशीत असलेल्या सुकन्याने तिला आपल्या गळ्यातील मोत्याचा हार बक्षीस दिला. राजेश्वरीचे धाडस बघून केशर थक्क झाली.केशरच त्यांना काम सांगणार होती.इतक्यात सुकन्या म्हणाली आजच्या दिवस त्यांना आमचा दरबार अन तिथली मौज बघू दे मग उद्यापासून सांग काम. केशरनी यांत्रिकपाने मान हलवली.
                                           सौ.उषा. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: