श्री ५३
राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महाराज स्वतःच म्हणाले पायी जाऊ नका तुम्ही आमच्या सुजयराजांची वधू आहात सुजयराजे बाहेर त्यांच्या बरोबर आले आणी त्यांनी हळू आवाजात त्या दोघांना जास्त सावध राहण्याची सूचना केली.आणी आज संध्याकाळी आपण येईपर्यंत खोलीतून कुठेही न जाण्याची त्यांनी अप्रत्यक्ष सूचनाच केली.त्यांचे बोलणे सुरु होते तोच कुठूनतरी सुवर्णरेखा धावत आली आणी राजेश्वरी बरोबर जाण्याचा हट्ट करू लागली.शेवटी सुजयराजे तिला म्हणाले की आजी आजोबा हो म्हणाले तरच जायचं,राजकन्या पटकन आत धावत गेली अन येताना महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणाला बरोबर घेऊन आली त्यानी राजेश्वरीला राजकन्येची काळजी घ्यायला बजावून सांगितले.तिचा सेवक पण थोड्यावेळात तिच्याकरता खाण्याचे साहित्य अन काही कपडे घेऊन हजर झाला.रात्री उशीरा राजवाड्यावर परत यायचे नाही असे त्यानी सांगितल्यामुळेतर राजकन्येला फारच आनंद झाला.म्हणजे आज रात्री पण आपल्याला किल्य्यावर राह्यला मिळेल,राजेश्वरी बरोबर राह्यला मिळेल.सेवक घोड्यावर अन बाकी तिघं बैलगाडीतून निघाले.राजेश्वरीच मन पिसा सारखं हलकं झालं होतं.तिच्या बुद्धी आणी मनाचा मोठा अजब खेळ चालला होतं.बुद्धी सर्व तपासून घ्यायला सांगत होती,अन मन म्हणत होतं मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर नको.मला सुजय राजांनी आपलं म्हंटल हेच माझ्या करता पुरेसे आहे.हातातल्या काठीशी एकीकडे तिचा खेळ सुरु होता.राजेश्वरी भानावर आली ती समोरच्या दृश्याने
राजकन्या तर भीतीने थरथर कापू लागली.समोर मोठ्या डौलात बसलेल्या वाघोबांना बघून सगळेच घाबरले होते,बैल आधीच बुजले होते पण आपल्याच तालात असलेल्या राजेश्वरीच्या ते लक्षात आले नव्हते. रघुनाथ खाली उतरला अन म्हणाला तुम्ही माघारी जा मी एकटा या वाघाला थोपवून धरतो .राजेश्वरीने सपशेल नकार दिला,तिने पटकन अंगावरची ओढणी काढली गाडीवाना जवळून त्याची काड्यापेटी घेतली अन ओढणी पेटवून दिली,एका हातात पेटलेली ओढणी अन दुसऱ्या हातात काठी घेऊन ती सरळ वाघावर चालून गेली.वाघ जागचा उठून जंगलात पळाला.राजेश्वरीचे प्रसंगावधान बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. उरलेलेला प्रवास निर्विघ्न पार पडला.साऱ्या रस्ताभर सुवर्णरेखा राजेश्वरीला बिलगून बसली.राजेश्वरी अन रघुनाथ हाच विचार करत होते की आजवर जंगलात इतक्या वेळा जाऊन कधीही वाघ दिसला नाही. संकट थोडक्यात टळले होते.
सौ.उषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा