श्री 58
सुकन्या झोपली पण सुवर्णरेखा रुसुन बसली होती तिची राजेश्वरीने
कशीबशी समजूत काढली.संध्याकाळी तिला बरोबर न्यायचे कबूल केले
तेव्हा कुठे तिचा राग शांत झाला.
संध्याकाळी राजेश्वरीने सुकन्या अन सुवर्णरेखा दोघींना
तयार केले आणी मग त्या तिघी फिरायला बाहेर पडल्या.त्यांच्यामागे
सुरक्षित अंतर ठेवून सुजयराजे अन माखन पण बाहेर पडले.राजमहालाभोवती
असलेल्या बागेत फिरायचे त्यांनी ठरवले.
बागेत आल्यावर सगळेच खूप आनंदित झाले.तिथली हिरवळ,सुंदर रंगीबेरंगी
फुल,फुलपाखर सगळेच आनंददायी.सुकन्याच्या डोळ्यात निरागस
भाव होते.तिथले विकृत क्रूर भाव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते.
सुजयराजांना इतक्या लांबून हा बदल जरी दिसत नसला तरी त्यांचे हावभाव एकदाही आवाज न चढता होत असलेले संभाषण त्यांना सुखावून जात
होते.हळूहळू रात्रीच्या दिशेनी दिवसाची वाटचाल सुरु झाली होती. रात्रीचा अंधार जरी आता सगळीकडे पसरू लागला असला तरी वर
आकाशात नक्षत्रांचा खच पडला होता.पौर्णिमा जवळ असल्याने असेल
पण चंद्रबिंब पण चांगलेच मोठे दिसत होते.त्या गूढ रम्य प्रकाशात सुकन्या
राजेश्वरी अन सुवर्णरेखा चढाओढीने सुस्वरूप दिसत होत्या.त्या दिव्य
सौंदर्याकडे सगळेच भान हरपून बघत होते.सुकन्याच काय सुवर्णरेखा सुद्धा
तिथून उठायला तयार होईना.रात्र सुद्धा इतकी सुंदर असते हे त्यांना आज कळले
होते.दोघींच्याही डोळ्यात राजेश्वरीबद्दल होते फक्त प्रेम अन आदर.
सौ.उषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा