श्री ६0
भविष्यात काय दडले आहे ते.पण सुकन्या बरी होते आहे याचा तिला मनापासून आनंद होत होता.सुवर्णरेखा मात्र अगदी सुजयराजा सारखीच अस्वस्थ झाली होती आईच्या बरे होण्याच्या आनंदापेक्षा राजेश्वरीच्या येथून निघून जाण्याच्या कल्पनेने तिला जास्त व्याकुळ केले होते
आज महाराज सुदर्शन आणी महाराणी सुलक्षणा राजवाड्यात येणार म्हणून सकाळ पासून मोठी गड़बड़ सुरु होती.जो तो घाईने हातातले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता
सुकन्या त्या दोघांना बघून कशी वागते याची सर्वांनाच उत्सुकता होती.आज राजेश्वरीची पण परीक्षा होती.तिने सुकन्याला फुलबागेकड़े नेले.बागेत खूप वेळ फिरल्यावर तिने थोड्या शब्दात महाराज अन महाराणी येणार असल्याचे सांगितले.सुकन्याने हसून प्रतिसाद दिला.तिच्याच सांगण्यावरून त्या दोघींनी बागेतली गुलाबाची फुले तोडली.
सुकन्याने राजेश्वरीच्या मदतीने त्या फुलांचे सुंदर हार केले.राजेश्वरीच्या लक्षात आले की सुकन्या जवळ एक रसिक अन कलासक्त मन आहे.त्या दोघींची मैत्री दिवसेदिवस गहिरी होत चालली होती.
केशर धावत येताना दिसली म्हणून दोघी उठून उभ्या राह्यल्या.अपेक्षेप्रमाणे केशरने त्यांना महाराज अन महाराणी आल्याचे सांगितले.सगळेच लगबगीने निघाले.वाड्याच्या प्रवेशद्वारा
जवळ चांगलीच गर्दी झाली होती.सुकन्याने सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.टवटवीत
गुलाबाचे हार घालून अन नमस्कार करून तिने सुदर्शन अन सुलक्षणाला चांगलाच धक्का
दिला.आपल्या सुनेमध्ये झालेले हे परिवर्तन दोघांना सुखावून गेले.त्यांच्या मुलाचे सर्व वाईट दिवस संपले होते.डोळ्यातले पाणी न थांबविता महाराणी सुलक्षणा पुढे झाल्या अन त्यांनी
सुकन्याला आपल्या मिठीत घेतले.सुजयराजे पण हा आनंद सोहळा बघत होते.एकाएकी त्यांच्या लक्षात आले राजेश्वरी अन सुवर्णरेखा दोघी दिसत नव्हत्या.
सौ.उषा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा