श्री ४१
मुख्य चित्र राजेश्वरीने काढावे व भोवतीची सजावट रघुनाथने करावी असा सगळ्यांनी आग्रह धरला कारण रघुनाथ बद्दल त्यांना खात्री होती पण राजेश्वरी उत्कृष्ट चित्र काढू शकते ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.दोघही बापलेक चित्र कुठले काढावे यावर विचार करू लागले.एरवी रघुनाथ अस्वस्थ झाला नसता,पण आज त्याच्या लेकीची मनःस्थिती ठीक नव्हती अन सुजयराजांच्या मित्रांमध्ये काही जाणकार इंग्रज मित्र पण असल्याचे त्याला माखन कडून कळले होते.चित्र काढावेच लागणार होते फार विचार करूनहि उपयोग नव्हता.
राजेश्वरीने रघुनाथच्या पायावर डोके ठेऊन चित्र काढण्यास सुरवात केली.कुठले चित्र काढणार आहे हे तिने हळू आवाजात बापूला सांगितले.रघुनाथ झटपट कामाला लागला,कारण त्या चित्राची आरास त्यालाच करायची होती.भिंतीवर साकार होणाऱ्या चित्राची उत्सुकता शिगेला पोचली होती.दिवसभर तहान भूक हरपून दोघही बापलेक कामात दंग झाले ते एकाच वेळेस चित्र पूर्ण करून खाली बसले.राधाकृष्णाचे अप्रतिम चित्र साकार झाले होते.राजांचे इंग्रज मित्र जागचे उठून त्या दोघांजवळ आले अन त्यांचे अभिनंदन करू लागले.ते बघून इतरही मित्र मंडळी त्या दोघांजवळ येऊन पोचली.रघुनाथ अन राजेश्वरीवर अभिनंदनाचा वर्षाव होत होता.दोघही विनम्रपणे या वर्षावात नाहून निघत होते.सुजयराजांनी माखनला त्या दोघांकरता काही खायला आणायला सांगितले.सगळ्यानी राजेश्वरीचे खूप कौतुक केले,हे बघून सुजयराजे प्रसन्न झाले होते.एकाएकी ते आपल्या जागेवरून उठून राजेश्वरीजवळ आले,राजेश्वरीच्या हृदयाचे ठोके जलद गतीने पडू लागले होते, त्यांनी राजेश्वरीकडे वळून एकदम विचारले "मी खूप दिवस एकटाच आहे,सुयोग्य जोडीदाराच्या शोधात मी होतो,आज मला असे वाटते आहे की तूच माझ्या जीवनाचे संगीत आहे,मी तुझ्याच शोधात होतो,तू जर मला होकार दिला तर या पृथ्वीवर मी सगळ्यात भाग्यवान व्यक्ती असेन.माझे जवळचे मित्र,आणी तुझे वडील यांच्या समक्ष मी तुला लग्नाची मागणी घालतो आहे.तुला पसंत नसेल तर तू नकार देऊ शकतेस.तुला स्वीकार असेल तर तू यातले लाल गुलाबाचे फूल या तूच काढलेल्या राधाकृष्णाच्या चित्रापुढे ठेव आणी नकार असेल तर पांढरे फूल ठेव.राजेश्वरीचा स्वतःच्या कानावर विश्वासच बसत नव्हता.आपण ऐकले ते खरे की खोटे?राजे रजवाड्यांच्या गमती जमतीचा तर हा भाग नाही.एरवी धिटाईने सगळ्यांकडे बघणारी राजेश्वरी आत्ता मात्र मान वर करून पाहू शकत नव्हती.इतक्यात राजांचा एक मित्र अधीर स्वरात ओरडला,लाल की पांढरे फूल ? लवकर निर्णय द्या बा !रघुनाथची अवस्था तर फारच विलक्षण झाली होती.अजून राजेश्वरीने निर्णय घेतला नव्हता पण ती जणू आजच सासरी जायला निघाल्या प्रमाणे त्याला दुखः होत होते.एकीकडे लेकीची काळजी मिटली म्हणून आनंदही वाटत होता. राजेश्वरी फुलांच्या तबकाच्या दिशेनी निघाल्या बरोबर सगळ्या उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला.सुजयराजांच्या हृदयाचे ठोके आता वाढले होते.राजेश्वरी तबकाजवळ अशी उभी होती की तिने कुठले फूल उचलले हे कोणालाच दिसले नाही,राधाकृष्णाच्या चित्रापुढे तिने ओंजळ रिकामी केली अन कुणालाही काही कळायच्या आत ती राजमहालातून धावत बाहेर पडली.
सौ.उषा.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा