श्री 40
राजेश्वरीला जाग आली तीच मुली सुजयराजांच्या आवाजाने.सुजयराजे रघुनाथला सांगत होते उद्या सकाळी ९ वाजता राजमहालाच्या भिंतीवर दोघांनी चित्र काढायचे आहे.येताना नवे कपडे घालून या अशी आठवण सुजय राजांनी करून दिली,रघुनाथने मान डोलावून होकार दिला.
रात्री रघुनाथ जवळ जवळ जागाच होता,ही मुलगी पुन्हा नाहीशी झाली तर काय.रात्र संपून दिवस उजाडला दोघही बापलेक आंघोळ करून तयार होऊन बसले,सध्या त्यांनी त्यांचे रोजचेच कपडे घातले होते.अगदी जाताना नवे कपडे घालू असे ठरले.काहीतरी खाऊन घ्यावे म्हणून दोघं विचारात असतानाच एक स्त्री त्यांच्या खोलीकडे येताना दिसली.ती जवळ आल्यावर राजेश्वरीच्या आश्चर्याला पारावर राहिला नाही ती केशर होती.राजेश्वरी एकदम उठून उभी राह्यली तू? इथे?केशर हसत हसत आत आली अन म्हणाली आता जास्त बोलायला वेळ नाही तुला व्यवस्थित तयार करून आणायला मला सांगितले आहे . हे बघ मी काही सामान पण आणले आहे.राजेश्वरी म्हणाली मी अंघोळ करून तयारच आहे फक्त कपडे बदलले की झाले.केशर यावर मस्त हसली,तिने राजेश्वरीला तिच्या पुढे बसण्यास सांगितले,थोड्या नाराजीने राजेश्वरी तयार झाली.अर्ध्या तासात केशरने तिच्या केसांना तेल लावून सुंदर केश रचना केली,अन तिला सुजयराजांनी दिलेले नवे कपडे घालायला सांगितले.कपडे घातल्यावर तिने राजेश्वरीला ओढत आरश्याच्या खोलीत नेऊन आरश्या समोर उभे केले.आरश्यातल्या राजेश्वरीला बघून राजेश्वरी थक्क झाली किती सुंदर दिसत होती ती!केसांना तेलाची तकाकी,त्यांची विलोभनीय रचना अन गुलाबी रंगाच्या कपड्यात खरोखरच तिचा कायापालट झाला होता.रघुनाथ पण आपल्या मुलीचे हे नवे रूप बघून स्तिमित झाला होता.केशरनी तिला हळूच आठवण करून दिली राजमहालात जायची वेळ झाली होती.तिचे वाक्य संपता संपता माखन बोलवायला आला.रघुनाथ पण आज नवे कपडे घालून तयार होता,त्यांचे रंगाचे साहित्य,माखन आणी दुसरे काही सेवक आणणार होते त्यामुळे रघुनाथ अन राजेश्वरी दोघही त्या राजमहालाकडे निघाले.
राजमहालाच्या प्रवेश द्वारावर उभ्या असलेल्या सेवकांनी त्यांचे स्वागत करून त्यांच्या करता असलेल्या मंचावर त्यांना बसायला सांगितले.ठरलेल्या वेळेच्या थोड्या आधीच दोघही बापलेक हजर असलेले बघून सुजयराजे खूष झाले.राजेश्वरीचे मनमोहक रूप आज सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होते.सुजयराजे स्वतःला मोठ्या कष्टाने आवरत होते.तिच्याकडे बघण्याचा अनावर मोह मनाला होऊनही त्यानी स्वतःला संयमाने बांधून ठेवले होते.सुजयराजांची सगळी मित्र मंडळी जमल्यावर सुजयराजांनी राजेश्वरीची सगळ्यांना ओळख करून दिली. आधी थोडे खाऊन मग त्या दोघांनी चित्र काढावे असे ठरले.
रघुनाथ अन राजेश्वरी दोघही अतिशय संकोचले होते. ह्या आधी त्यांना इतके बरोबरीच्या नात्याने कुणीच वागवले नव्हते अन त्यांचीही तशी अपेक्षा नव्हती.सुजयराजांच्या व्यक्तिमत्वाने दोघही खूपच प्रभावित झाले होते.राजेश्वरीच्या इच्छेविरुद्ध सुजयराजांचे चित्र तिच्या मनःपटलावर कोरले गेले होते.ते पुसण्याचा निष्फळ प्रयत्न राजेश्वरीने चालवला होता,कारण ती कुठल्याच दृष्टीने त्यांच्या योग्य नव्हती,सगळ्यात मुख्य ते विवाहित होते,राणी सुकन्या जिवंत होती,हे राजेश्वरीने स्वतःच्या डोळ्याने पहिले होते.काय करावे ?या मनाला कसे समजवावे ?डोळ्यात जमा झालेले पाणी राजेश्वरीने हलकेच निपटून टाकले.एकदा हे चित्राचे काम झाले की आपण येथून निघून जाणार आहो मग सुजय राजे आपल्याला दिसणार नाही,त्यांच्याशी तसाही आपला काही संबध नाही असे स्वतःला बजावत राजेश्वरी चित्र काढण्याकरता सज्ज झाली.
सौ.उषा

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा