बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: ...: usha-ushagmailcom.blogspot.com: ... : श...
                                                           श्री                                12
संध्याकाळी अगदी अंधार पडे पर्यंत दोघांनी आधी उंच वाढलेले गवत कापून काढले.राजेश्वरी ठरवूनही आदल्या दिवशी हे काम करू शकली नव्हती.मारोती मंदिर साफ करण्यात कितीतरी वेळ गेला होता.गवत कापल्याने रस्ता छान दिसू लागला होता.निदान दोन तरी रोपं आज लावायचीच असे ठरवून रघुनाथने त्याला आवडलेल्या जांभळ्या अन पिवळ्या फुलांची रोपं जमिनीत रोवून आजच्या दिवसाचे काम संपविले.तुळशी करता वेगळी जागा त्याने बघून ठेवली होती.राजेश्वरीने केलेल्या कालवणाचा सुवास भुकेची जाणीव करून देत होता.
              रात्री जेवून सतरंजीवर पडल्या पडल्या रघुनाथला गाढ झोप लागली.राजेश्वरी कितीतरी वेळ जागीच होती.केव्हा तरी अर्धवट झोपेत तिला कुणीतरी गाणं म्हणत असल्याचा भास झाला.खर तर तिला अजिबात उठायची इच्छा नव्हती पण मनातली उत्सुकता तिला झोपू पण देणार नव्हती.ती हळूच उठली,खोलीबाहेर डोकावून बघण्याचा मोह आवरून तिने रघुनाथला हलवून जागे केले.त्रासलेल्या रघुनाथच्या तोंडावर हात ठेवून तिने बाहेर खूण केली.विस्फारलेल्या डोळ्यांनी दोघही बघू लागले.एक शुभ्र वस्त्र परिधान केलेली स्त्री गाणं म्हणत होती.स्वतःच्या एकटेपणाची कुठलीच भीती बहुदा तिला नसावी.रघुनाथ उठून तर बसला पण तिचा पाठलाग करावा की नाही या संभ्रमात असतानाच ती स्त्री कुठे तरी नाहीशी झाली.उरलेली रात्र दोघांनी जागूनच काढली.
                  सकाळी रघुनाथ म्हणाला तू चल माझ्या बरोबर मी सांगतो महाराजांना.राजेश्वरीने स्पष्ट नकार दिला.बापू मला अजिबात भीती वाटत नाही.तुम्हीच मला लहानपणापासून शिकविले,आणी आता तुम्हीच,रघुनाथने मान हलविली.नाही पण पोरी मला यायला किती रात्र होते,अन अश्या ओसाड जागेत तू एकटी, छे.पटत नाही.बापू माझ्या सोबतीला आता बरीच मंडळी आहेत हं.ए तुझ नाव काय ठेवायचं वाघ्या म्हणू का ?कुत्र्याच्या पिल्लाने समजल्या सारखी मान हलवली,शिवाय आपण काल आणलेली रोपं ती मात्र तुम्ही जायच्या आधी सगळी लावून जा.रघुनाथला माहिती होतं आता राजेश्वरी ह्या रहस्याची उकल केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.राजेश्वरीला आरसा खुणावत होता.कधी एकदा काम संपतं अन आज जाऊया का त्या खोलीत ?  
                                            सौ.उषा.

               
                          
                  

मंगळवार, ८ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ११ स्वतःच्या श्वासाचा आवाज...
                                                     श्री                                                     ११
स्वतःच्या श्वासाचा आवाज सुद्धा मोठ्ठा वाटावा अशी शांतता सगळीकडे होती.थंडी वाजत नसताना सुद्धा तिने चादर अंगावर लपेटून घेतली,जेमतेम डोळे उघडे राहतील एव्हढीच ओढणी डोक्यावर घेतली.भूक लागली होती पण बापू !छे बुवा आपण उगीचच राह्यलो घरी,विचारात दंग झालेल्या राजेश्वरीला जाग आली ती रघुनाथच्या आवाजाने,तिने बापूला घट्ट मिठी मारली.किंचित तक्रारीच्या स्वरात म्हणाली उद्यापासून मी पण येणार तुमच्या बरोबर.रघुनाथने तिला सांगितले की मोठ्या मुश्किलीने तिच्या राहण्याची परवानगी मिळाली आहे आता उगीचच हट्ट करून तिने हाती आलेले काम घालवू नये.राजेश्वरीला वाटलं सांगावा का तो आरश्याचा किस्सा ?पण नकोच बापू उलट तिलाच घाबरली म्हणून चिडवायचा त्यापेक्षा आपणच उद्या पुन्हा त्या खोलीत जाऊन बघू.
                    जेवण झाल्यावर रघुनाथ उद्या न जाता परवा राजवाड्यावर जाणार आहे हे कळल्यावर राजेश्वरी सगळा राग विसरून शांत झोपी गेली.दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून दोघं बापलेक नेहेमीचं सामान घेऊन जंगलाकडे निघाले.फुलं गोळा करणं मोठच आनंददायक काम.चांगली मोठं टोपलं भरून फुलं जमा झाल्यावर सरपण गोळा करण्यात दोघांचा बराच वेळ गेला.आता सूर्यनारायण आकाशात आले म्हटल्यावर पाखरांचा चिवचिवाट जास्तच वाढला होता. फुलपाखरांचे थवे इकडून तिकडे मस्त उडत होते.अचानक राजेश्वरीच्या मनात आले ह्यातली काही झाडं आपण त्या ओसाड वाड्याच्या अंगणात लावली तर आपल्याला बोलायला जिवंत पानं फुलं,अन त्यांच्या मोहानी आलेल्या फुलपाखरांची भुंग्यांची तरी निदान सोबत होईल,लगेचच तिने बापूला आपली कल्पना बोलून दाखवली,   रघुनाथने तत्काळ होकार दिला.हातातलं सामान खोलीवर ठेवून राजेश्वरी पुन्हा जंगलाकडे गेली,रघुनाथने पुष्कळ रोपं काढून ठेवली होती ती सगळी राजेश्वरीने टोपल्यात ठेवली अन दोघं बापलेक खोलीकडे निघाले,मारोती मंदिरा जवळ आल्यावर रघुनाथच लक्ष गेलं,मंदीर स्वच्छ केल्याबद्दल त्याने राजेश्वरीच कौतुक केलं.
रघुनाथ घरी नाही असे बघून राजेश्वरी राजमहालातल्या  त्या खोलीत डोकावून आली होती.मोठ्ठा आरसा समोर होता.आपल्याला काहीपण भास होतो काल रात्री कंदील बहुतेक भलत्याच भिंतीवर धरला होता.स्वतःच्या मूर्खपणावर तिला स्वतःलाच हसू आलं.राजेश्वरीचा स्वैपाक अन इतर कामं होईपर्यंत  रघुनाथ पुन्हा एकदा बैलांना घेऊन जंगलात जाऊन आला होता त्याने भरपूर हिरवी पानं अन जांभळ्या रंगाची फुलं आणली होती.एक मोठा दगड कोरून त्याने मारोती पुढे लावायला दिवा पण तयार केला.
                                               सौ.उषा.

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

Finding the Tracking Code

Finding the Tracking Code

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री १० कुठून बर सुरु कराव ? हं मुख्य द...
                                                     श्री                                             १०
कुठून बर सुरु कराव ? हं मुख्य दारा जवळूनच सुरुवात करावी,मारोतीरायाच मंदिर पण आहे तिथे.मंदिर झाडून काढायला पाहिजे पहिले,विचार आल्याबरोबर ती खोलीकडे गेली. केरसुणी,काठी घेऊन मंदिराजवळ आली ,आत वाकून बघितलं मारोतीरायाची छान मूर्ती होती.सगळीकडे जाळे लागले होते ते आधी साफ केले,झाडले नमस्कार केला,मारोतीराया तुला उद्या सकाळी पाणी घालून छान आंघोळ घालीन,किती मळला आहेस तू.देव म्हणून मांडून ठेवतात तर स्वच्छता नको का ठेवायला स्वतःशीच बडबड करत राजेश्वरी झपाट्याने काम करत होती.सूर्य नारायण संध्यादेवी बरोबर निघाले म्हणताना पाखरांची घरट्याकडे परतायची लगबग सुरु झाली.राजेश्वरीने एकदा डोळेभरून आपल्या नव्या कामाकडे बघितले खोलीवर जाऊन कंदील लावायला हवा,बापू यायच्याआत स्वैपाक पण झाला तर मस्त गप्पा मारता येतील,हातातलं सामान संभाळत राजेश्वरीची पावलं भराभर पडत होती.संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी राजमहालाचा उंच मनोरा नाहून निघाला होता.
                                स्वैपाक झाला तरी अजून रघुनाथ घरी आला नव्हता.किती वाट बघायची?इथे तर बोलायला पण कुणी नाही.कुत्र्याच्या पिल्लाला तिने जवळ ओढले,तू पटपट मोठा हो बऱ,तुला अजून पायऱ्या चढता येत नाही,पण तुझा या क्षणी मला मोठाच आधार वाटतो आहे.तुझ नाव काय रे ठेवायचं?बऱ बापू आला की ठरवू पण माझ्या बरोबर येतोस का थोडं अंगणात तरी जाऊ.बाहेर आल्यावर खरच बरं वाटतंय,रात्री पण त्या आरश्यात दुपार सारखंच दिसत असेल का ?किती मळके ,विटके चित्र होते आपले,पण आपण हे असे गावोगाव फिरणार त्यात रंगाच काम करणारे तेव्हा असेच कपडे घालावे लागतात.आपला चेहरा छान आहे असं सगळेच म्हणतात .आत्ता पाहूया का आरश्यात ?फक्त चेहेऱ्या जवळ कंदील धरायचा .मनात विचार आल्याक्षणी राजेश्वरी कंदील,काठी घेऊन निघाली.कुठेही जाताना काठी घेऊन जायची सवय तिला लहानपणापासूनच लावली होती रघुनाथने.आपल्या खोलीत आरसा नाही हे तिच्या पहिल्यांदाच लक्षात आले.मान झटकून ती तडक निघाली,तिच्या मागे छोटे पिल्लू पण होते .घाई घाईने त्या खोलीत शिरून राजेश्वरीने कंदील वर उचलला अरेच्या इथला आरसा कुठे गेला? दुपारी जितक्या खोल्या बघितल्या त्या सगळ्यांमधे आरसे होते मग आता का दिसत नाही?एव्हड्या मोठ्या जागेत आपण एकटेच आहोत हे राजेश्वरीला प्रकर्षाने जाणवले.राजेश्वरी वेगाने परत फिरली अन धावतच तिने आपली खोली गाठली! 
                                                                            सौ.उषा.