सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

                                                  श्री                                          22
रघुनाथला कोणालाच काही सांगायची गरज पडली नाही,बहुदा राजांनीच सगळ्यांना स्पष्ट शब्दात त्या दोघांच्या वेगळेपणाची जाणीव करून दिली असावी कारण दोघं खोलीत आले तेव्हा त्यांचेच फक्त सामान त्या खोलीत होते.बाजूला रंगांच्या खोलीत सुद्धा कोणी सामान ठेवले नव्हते.
                           राजेश्वरीने दोघांचा स्वैपाक जेवण आटोपल्यावर पुन्हा त्या महालाकडे मोर्चा वळवला.रघुनाथ थोडी विश्रांती घेऊन येणार होता.अजूनही त्याची तब्बेत तितकीशी बरी नव्हती,राजेश्वरीने मुद्दामच बरोबर इतर कुणाला घेतले नव्हते.कुठलेही काम एकाग्र होऊन करण्याचा तिचा स्वभाव होता.काम करताना उगीच बडबड करून कामाचा विचका होतो असं तिचं ठाम मत होतं.डोक्यावर अन तोंडावर ओढणी घट्ट बांधून तिने आधी तिथली धूळ झाडून काढली,केव्हढा मोठा महाल हा !काय करायचं काय इतक्या मोठ्या खोलीच?आपल्याला अन बापूला किती लहान जागेत सर्व गरजा भागवता येतात या माणसांना का लागतात इतक्या मोठ्या खोल्या? काम करता करता एकीकडे तिचे विचारचक्र सुरु होते.धूळ जसजशी नाहीशी होऊ लागली तसतशी खालची काळी फरशी दिसू लागली.रघुनाथ येईतो राजेश्वरीने फरशी स्वच्छ धुऊन काढली होती.पुन्हा रंगाचे डाग पडणारच आहेत असं म्हणत रघुनाथ आत आला.राजमहाल खरच छान दिसत होता.
                        रघुनाथने बरोबर सगळे सामान आणले होते ते एका बाजूला रचून ठेवले.शिडी घेऊन त्याने पूर्वेकडील भिंतीपासून कामाला सुरुवात केली.भिंत खरवडून एक सारखी करण्यात त्याचा कितीतरी वेळ जाणार होता अन राजांना एक महिन्याच्या आत सारे काम पूर्ण करून हवे होते.जाऊदे कामावर लक्ष ठेवावे जेव्हडे होईल तेव्हडे तरी करावे. राजेश्वरीकडे  त्याचे लक्ष गेले पार दमलेली दिसत होती,हिचा स्वैपाकाचा वेळ वाचवता आला तर तो वेळ इथल्या कामात उपयोगी पडेल.मनात विचार आल्याबरोबर त्याने राजेश्वरीला हा विचार बोलून दाखवला थोड्या नाराजीनेच ती तयार झाली.रात्री झोपायच्या आधी तिने वाड्यावरचा सेवक माखनला उद्यापासून आम्हा दोघांचे दोन्ही वेळचे जेवण बाकी सगळ्यांबरोबर असेल हे सांगितले.माखनला राजांनी मुद्दामच इथे राह्यला सांगितले होते.तो त्यांचा अत्यंत विश्वासू माणूस होता.
                        रात्री दोघं बापलेक दिवसभराच्या थकव्याने लगेच झोपले.उद्या पुन्हा जंगलात फेरफटका मारावा लागणार होता.आधी तयार केलेले रंग उपयोगात आणता येतील पण ते पुरेसे नव्हते राजेश्वरीच्या स्वप्नात गहिरे रंग भरू लागले होते.
                                                               सौ.उषा.


                                                  

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                    श्री           ...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री 21 राजेश्वरीने ती रात्र कशीतरी काढली.बापुची काळजी ...
                                   श्री                                21
                 राजेश्वरीने ती रात्र कशीतरी काढली.बापुची काळजी तिला झोपू देत नव्हती.तो इथेच असता तर बरं झालं असतं.त्याचे पाय चेपून देणे,औषध देणे सगळेच सोपे झाले असते.सकाळी ती सगळ्यांच्या आधी उठून अंघोळ वगैरे करून तयार झाली.आज सुजयराजे स्वतः येऊन त्यांना तो महाल दाखवणार होते.बाकीची मंडळी पण सुचेल ते काम करू लागली.प्रत्येकालाच सुजयराजांवर आपली छाप पडावी असं वाटत होतं.कालच्या घटनेनी सगळ्यांनाच आशा वाटू लागली होती.राजेश्वरीच्या उद्धटपणाबद्दल तिला सुजयराजांनी कुठलीच शिक्षा केली नव्हती उलट जास्त जवाबदारीचे काम सोपवून तिचा गौरवच केला होता ह्याचे सगळ्यांनाच नवल वाटत होते.
                      राजेश्वरी पायऱ्या चढून थेट सौधावर उभी होती.सुजयराजे आल्या शिवाय तिला कामाची दिशा ठरवता येत नव्हती.इतक्या उंचावरून सभोवतालचे रमणीय वातावरण तिच्यातल्या कलाकाराला आनंदित करीत होते.सगळीकडे हिरवा रंग दाटून राह्यला होता.क्षितिजावर हिरव्या निळ्या रंगाची गुंफण फारच मनोहारी होती.दूरवर दिसणारे नदीचे क्षीण पात्र उन्हात छान चमकत होते.खालचा माणसांचा आवाज पण वर येईतो अगदी कुजबुज केल्यासारखा येत होता.ही शांतता राजेश्वरीची बाल मैत्रीण होती.ह्या शांततेचा भंग केला तो एका गंभीर आवाजाने.सुजयराजे केव्हा आले हे पण तिला कळले नाही इतकी ती विचारात गढून गेली होती.ही जागा आहेच तशी कुणालाही आवडावी अशीच,तुम्ही इथे असल्याचे कळले म्हणून मी इथे आलो,सुजयराजांच्या शब्दांनी राजेश्वरी अगदी संकोचून गेली,ती हळू आवाजात म्हणाली कुणालाही पाठवून बोलावले असते तरी चालले असते आपण स्वतः कशाला कष्ट घेतले, सुजयराजे यावर फक्त हसले अन तिला खाली चलण्याची खूण केली.
                         राजेश्वरी अन रघुनाथ फक्त दोघांनाच बरोबर घेऊन राजे झपाट्याने निघाले.एका महाला जवळ आल्यावर ते थांबले,इकडे तिकडे बघून त्यांनी झटकन आत प्रवेश केला.रघुनाथ अन राजेश्वरी पण आत शिरले.सगळीकडे धुळीचे साम्राज्य होते,पण सुजयराजे फुलांच्या पायघड्या घातल्या सारखे चालत होते,तंद्रीत असल्यासारखे.या खोलीत पण एक आरसा होता,अर्थातच धुळीने माखलेला!राजांनी तो आरसा अलगद खाली काढून ठेवला.दोघांकडे वळून म्हणाले तुमचे काम या महालात करायचे आहे.भिंतीवर कुठला रंग ,कुठले चित्र याचे तुम्हा दोघांना पूर्ण स्वातंत्र्य असणार आहे फक्त आजपासून एक महिन्याच्या आत काम झाले पाहिजे आणी हा जो आरसा मी खाली काढून ठेवला आहे तो इथल्या भिंतीवर पुन्हा लागला पाहिजे.जितक्या झपाट्याने राजे आले तितक्याच झपाट्याने ते निघूनही गेले.रघुनाथ राजेश्वरीला घेऊन तिथून बाहेर पडला.आज काही करून आपली खोली पुन्हा मिळवली पाहिजे म्हणजे राजेश्वरीशी निवांत बोलता येईल.
                                      सौ.उषा. 

शनिवार, १९ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                                        श्री       ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com:                                                 श्...

usha-ushagmailcom.blogspot.com: usha-ushagmailcom.blogspot.com: श्...

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                 श्...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्...: श्री २० सुदर्शन महाराजांनी त्य...
                                                श्री                                             २०
                सुदर्शन महाराजांनी त्यांच्या दिवाणाला ह्या कामा करता शेजारच्या गावा मधून माणसांना आणायला सांगितले.एव्हाना सगळ्या सुंदरपुरात ही बातमी पसरली.जुन्या राजमहालाच्या कामाकरता जायला कित्येक लोक स्वतःच तयार झाले आणी काहीनी त्यांची इच्छा दिवाणजीना समक्ष बोलूनही दाखविली.सुंदरपुरात हे परिवर्तन काही एकाएकी घडून आले नव्हते.गेले कित्येक दिवस रघुनाथ अन राजेश्वरी जुन्या राजमहालात रहात होते.त्यांच्या निर्भय वृतीचा प्रभाव सगळ्यांवरच पडला होता.स्वतःच्या   भित्रेपणाची त्यांना मनोमन लाज वाटत होती.ह्या निमित्ताने त्यांना राजमहालात काम करणे नक्कीच आवडणार होते.
                       रघुनाथ अन राजेश्वरी त्यांच्या करता असलेल्या बैलगाडीत बसून जुन्या राजमहालाकडे निघाले फरक फक्त इतकाच की या वेळेस त्यांच्या बरोबर पुष्कळ माणस होती.गावाची सीमा ओलांडून जंगलाचा भाग सुरु झाला होता.इथे अतिशय दाट झाडी होती.हिरव्या रंगाच्या असंख्य छटा मनास भुरळ पाडत होत्या.त्या हिरव्या मखमलीवर विसावलेली अगणित सुंदर फुलं अन त्यावर बागडणारी फुलपाखर सारच कसं स्वर्गीय होतं!वर निळ्या आकाशात पांढऱ्या ढगांनी वेगळीच रांगोळी काढली होती.
                    तो पहा राजमहाल दिसू लागला.राजेश्वरीला जुना मित्र भेटावा तसा आनंद झाला.किल्ल्यातून आत प्रवेश करताना मात्र राजेश्वरीला राहवले नाही,बैलगाडीतून सरळ उडी मारून ती धावत निघाली.तिची चाहूल लागून कुठूनसा वाघ्या पण आला.राजेश्वरीच्या अंगावर पुढचे दोन्ही पाय ठेऊन शेपटी हलवून तो त्याचा आनंद व्यक्त करत होता.प्राण्यांचं एक बर असतं त्यांची तक्रार नसते,निव्वळ प्रेम असतं अपेक्षारहित ! 
                       रघुनाथ अन राजेश्वरीची खोली ठरलीच होती,बरोबर आलेल्या मंडळींची व्यवस्था करायला वाड्यावरचा सेवक आला होता.शक्यतो सगळ्यांच्या राहण्याची सोय जवळ जवळ असावी असे ठरले त्यात काही बायका पण होत्या.सूर्य क्षितिजावर टेकलेला बघून त्यांचं उसन अवसान गळून पडलं राजेश्वरीच्या खोलीतच राहण्याचा,निजण्याचा त्यानी पक्का निश्चय केला,अन लगेच अमलात पण आणला.रघुनाथ बिचारा आपलं सामान उचलून खोली बाहेर पडला.
                                            सौ.उषा.