शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ...
                                                                            श्री                                                      8
धापा टाकत राजेश्वरी त्या पाहुण्याकडे पाहू लागली.एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू,काळभोर ,तपकिरी डोळ्यांचे अन इवल्याश्या नाकाचं.राजेश्वरीने त्याला उचलून पुन्हा पळायला सुरुवात केली.गाडी घेऊन आत येत असलेल्या रघुनाथला पाहून ती जागीच थांबली.काय नवीन मित्र पण मिळाला वाटतं,रघुनाथच्या प्रश्नावर ती मनमोकळं हसली.माझ्या आधी नवीन जागा बघून आलीस की काय ?रघुनाथच्या या प्रश्नावर राजेश्वरीने जोरात नाही म्हणून मान हलवली.रघुनाथ तिला सामाना जवळ उभं करून राजवाड्याच्या दिशेनी झपझप निघाला.बकुळीचा पार ओलांडून त्याने राजवाड्यात प्रवेश केला.अतिशय सुंदर वास्तू पण तितकीच उदास सगळीकडे पाला पाचोळा,धूळ,अन उघड्या बोडक्या खोल्या !जास्त विचार करायला वेळ नव्हता त्याने तिथेच उभं राहून दोन खोल्या सामान अन राहण्याच्या दृष्टीने पक्क्या केल्या.रघुनाथ अन राजेश्वरीने सगळे सामान एव्हाना त्या खोल्यांमध्ये रचून ठेवले होते.राजेश्वरीने सामानातली केरसुणी काढून दोन्ही खोल्या झाडून काढल्या ,रघुनाथने एका भिंतीवर गणपतीचं चित्र काढलं,दोघांनी नमस्कार केला.राजेश्वरीने तीन दगड मांडून चूल तयार केली,जवळचा पाचोळा अन झाडांच्या फांद्या तोडून सरपण तयार केले.दोघांचा स्वैपाक केला अन जेवणार तोच दाराशी आवाज आला.कुत्र्याचे पिल्लू दारात हजर,रघुनाथने संमती देताच तिने त्याला आत घेतलं,पोळीचे तुकडे त्याने भराभर खाल्ले बहुदा ते पण ह्यांच्या सारखेच उपाशी असावे.राजेश्वरीने ठरवलं उद्या त्याच्या करता एक पोळी सकाळ संध्याकाळ जास्त करावी हेच बरं.सामान आवरायचं उद्यावर ढकलून राजेश्वरीने मोठी सतरंजी काढून अंथरली दोन जाड चादरी पण पांघरायला घेतल्या एव्हाना रघुनाथने बैलगाडी सोडून बैलांना झाडाला बांधून ठेवलं.बैलांच्या खाण्या पिण्याची काहीच व्यवस्था नव्हती. कायम पायीच फिरायचं असल्याने दोघानांही हे लक्षात आले नव्हते.राजेश्वरीला संकोचल्या सारखे झाले.काय हे मुकी जनावरं बिचारी कुणाला सांगायची नाहीत पण आपल्या लक्षात राह्यला हवं होतं,ती उठली बैलांजवळ आली दोघांच्याही पाठीवर गळ्यावर तोंडावर हात फिरवून त्यांची माफी मागितली अन उद्या सकाळी त्यांना भरपूर खायला द्यायचे वचन दिल्यावरच तिला रात्री शांत झोप लागली.सकाळी जाग आली,पण नेहेमीपेक्षा उशीरच झाला होता.राजेश्वरीचा स्वैपाक झाल्यावर दोघही हातात काठी अन एक टोपली घेऊन अन आठवणीने बैलांना घेऊन निघाले.दोन तीन दिवस आता त्यांना सारं जंगल फुलांकारता पिंजून काढायचं होतं.रंग मनासारखे तयार व्हायला हवे.बैलांनी पण पोटभर चारा खाला,एव्हाना दोघं बापलेक टोपलीत फुलं,पानं अन भरपूर सरपण गोळा करून घेऊन आले होते.जंगलातल्या विविध वनस्पती पाहून रघुनाथ अगदी हरखून गेला होता,गेल्या कित्येक वर्षात त्याला इतकं सुंदर अन घनदाट जंगल बघायला मिळाल नव्हतं.
                                                  सौ.उषा.
                                          

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: ...
                                                                        श्री                                               7             

रघुनाथ अन राजेश्वरी जुन्या राजवाड्यात राह्यला जाणार हे हळू हळू सगळ्यांनाच समजले होते.प्रत्येकाच्या नजरेत एक प्रकारची भीती अन त्या दोघांबद्दल सहानुभूती होती.शेवटच्या प्रवासाला निघालेल्या माणसाला निरोप दिल्या सारखा प्रत्येक जण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना सांभाळून राह्यला सांगत होता.रघुनाथ नेहेमी प्रमाणेच निर्विकार होता पण राजेश्वरीला मात्र कुतूहल वाटू लागले होते.लहानपणापासूनच तिला अंधार अन गरीबी ह्यांची सोबत,त्यात मनस्वी कलंदर पित्याच्या सहवासात राजेश्वरी आपोआपच एक वेगळीच मुलगी झाली होती.सर्व सामान्य मुलींप्रमाणे तरुण वय असूनही तिला कधीच वेगवेगळे कपडे अन दागिने यांचे आकर्षण नव्हते.निसर्गाच्या सान्निध्यात राहून तसाच सरळपणा तिच्या स्वभावात आला होता.बैलगाडी थांबली तशी रघुनाथने पटकन खाली उडी मारली आता तो पुढे जाऊन बसला होता कारण इथून पुढे यायला गाडीवानाने सपशेल नकार दिला.खुणेनेच त्याने समोर बोट दाखविले.लक्ख सूर्यप्रकाशात राजवाड्याचा उंच मनोरा दिसत होता.जरी राजमहाल इथून दिसत होता तरीही तो अजून मैल दोन मैल तरी लांब होता,बैलगाडीत सामान भरपूर होते ते सगळे आता दोघांनाच लावावे लागणार होते.अर्थात कामाला दोघही मागे हटणार नव्हते.गाडीवानाचा निरोप घेऊन पुढचा प्रवास सुरु झाला.बैलांच्या गळ्यातल्या घुंगरांचा मंजुळ आवाज ,रानपाखरांची किलबिल असं ओळखीचं वातावरण मिळाल्याबरोबर राजेश्वरी प्रसन्न होऊन मनाशीच गुणगुणू लागली..दुपारी दोनच्या सुमारास त्यांची गाडी राजमहाला समोर येऊन उभी राह्यली.रघुनाथच्या पाठोपाठ राजेश्वरीनेही खाली उडी मारली,अंगाला आळोखे पिळोखे देत ती विस्फारल्या नजरेनी समोरच सगळं हृदयात साठवून ठेवायचा प्रयत्न करू लागली .दिंडी दरवाजा,त्याच्या जवळच असलेलं मारोतीच छोटसं मंदीर,तिथून थेट राजमहालाकडे जाणारा प्रशस्त रस्ता .रस्त्याच्या दुतर्फा बहुदा बाग असावी,आता मात्र तिथे उंचच उंच गवत वाढलं होतं.राजेश्वरी मंत्रमुग्ध झाल्या सारखी पुढे पुढे जात होती.पुन्हा एक दरवाजा त्यातून वाकून आत जाव लागायचं मोठा रथ आल्यासच ते दार बहुदा उघडत असावे.थोडं पुढे गेल्यावर एक कारंज होतं,पावसाच पाणी अन झाडाची पानं कुजल्याचा असह्य वास जवळ न जाताही येत होता पण तिथून जवळच बकुळीचा सडा पण पडला होता.राजेश्वरीने ओंजळभर बकुळीची फुलं गोळा केली अन नाकाजवळ घेऊन डोळे मिटून खोलवर श्वास घेतला.सगळा शीण नाहीसा झाला.आता कुठे तिच्या लक्षात आले की रघुनाथ अजूनही बाहेरच आहे.ती वेगाने परत फिरली,बैलगाडीच्या दिशेने धावणाऱ्या राजेश्वरीची वाट अडविली ती एका अनोळखी पाहुण्याने!
                                                                           सौ,उषा. 

गुरुवार, ३ नोव्हेंबर, २०११

श्री 6
महाराज क्षणभर विचारात पडले पण पुढच्याच क्षणी त्यांनी सर्व सेवक आणी राजेश्वरीला महालाच्या बाहेर जाण्यास सांगितले.त्यांना जे काही सांगायचे होते ते ते फक्त रघुनाथला सांगणार होते.खूप वेळ बाहेर वाट बघत बसलेली राजेश्वरी भिंतीला टेकून केव्हा झोपली ते तिलाही कळले नाही.रात्री नाही म्हटलं तरी जागरण झालेच होते त्यात दोन तीन दिवसांची पायपीट,राजेश्वरी आणखी पुष्कळ वेळ झोपली असती ती जागी झाली तीच राजकन्या सुवर्णरेखेच्या किंचाळण्याने,महाराजांच्या कक्षाचे दार बंद होते, आणी सेवक तिला आत जाऊ देत नव्हते.तिने रागा रागाने राजेश्वरीला जोरात हलवून विचारले ही काय झोपायची वेळ आहे की जागा?तिने राजेश्वरीला थपडा मारायला सुरुवात केली.राजेश्वरीने हलका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच राजकन्या आणखीच चवताळली.बाहेरचा आरडा ओरडा ऐकून महाराज स्वतःच बाहेर आले त्यांनी राजकन्येला हळुवार थोपटले,एव्हाना महाराणी सुलक्षणा आणी रघुनाथ पण बाहेर आले होते.राजकन्या बरीच शांत झाली होती.महाराज रघुनाथला म्हणाले की त्यांनी इतकं सांगितल्यावर आता जुन्या राजवाड्यात राहण्याच्या रघुनाथच्या विचारात फरक पडला आहे की नाही?रघुनाथ नम्रपणे म्हणाला की महाराज माझ्या सारख्या सामान्य माणसाबद्दल आपल्याला इतकी काळजी वाटते हे आपल्या मोठ्या मनाचे अन प्रेमळ स्वभावाचे निदर्शक आहे पण मला कृपा करून त्या वाड्यात एका खोलीत रंगकामाची तयारी अन एक खोली राहण्याकरता मिळाली तर सोयीचे होईल.मी माझी अन राजेश्वरीची पुरेशी काळजी घेईन.महाराजांनी नाईलाजाने त्यांना परवानगी दिली अन राजवाड्यातल्या सेवकांना रघुनाथला आवश्यक ते सामान अन मदत करण्याची आज्ञा दिली.महाराजांना नमस्कार करून रघुनाथ अन राजेश्वरी आपल्या नवीन ठिकाणाकडे निघाले।
सौ.उषा.

usha-ushagmailcom.blogspot.com:                                            श्री मह...

usha-ushagmailcom.blogspot.com: श्री मह...: श्री महाराज क्षणभर विचारात पडले पण पुढच्याच क्षणी त्यांनी सर्व सेवक आणी राजेश्वरीला महालाच्य...
श्री 6 महाराज क्षणभर विचारात पडले पण पुढच्याच क्षणी त्यांनी सर्व सेवक आणी राजेश्वरीला महालाच्या बाहेर जाण्यास सांगितले.त्यांना जे काही सांगायचे होते ते ते फक्त रघुनाथला सांगणार होते.खूप वेळ बाहेर वाट बघत बसलेली राजेश्वरी भिंतीला टेकून केव्हा झोपली ते तिलाही कळले नाही.रात्री नाही म्हटलं तरी जागरण झालेच होते त्यात दोन तीन दिवसांची पायपीट,राजेश्वरी आणखी पुष्कळ वेळ झोपली असती ती जागी झाली तीच राजकन्या सुवर्णरेखेच्या किंचाळण्याने,महाराजांच्या कक्षाचे दार बंद होते, आणी सेवक तिला आत जाऊ देत नव्हते.तिने रागा रागाने राजेश्वरीला जोरात हलवून विचारले ही काय झोपायची वेळ आहे की जागा?तिने राजेश्वरीला थपडा मारायला सुरुवात केली.राजेश्वरीने हलका प्रतिकार करण्याचा प्रयत्न करताच राजकन्या आणखीच चवताळली.बाहेरचा आरडा ओरडा ऐकून महाराज स्वतःच बाहेर आले त्यांनी राजकन्येला हळुवार थोपटले,एव्हाना महाराणी सुलक्षणा आणी रघुनाथ पण बाहेर आले होते.राजकन्या बरीच शांत झाली होती.महाराज रघुनाथला म्हणाले की त्यांनी इतकं सांगितल्यावर आता जुन्या राजवाड्यात राहण्याच्या रघुनाथच्या विचारात फरक पडला आहे की नाही?रघुनाथ नम्रपणे म्हणाला की महाराज माझ्या सारख्या सामान्य माणसाबद्दल आपल्याला इतकी काळजी वाटते हे आपल्या मोठ्या मनाचे अन प्रेमळ स्वभावाचे निदर्शक आहे पण मला कृपा करून त्या वाड्यात एका खोलीत रंगकामाची तयारी अन एक खोली राहण्याकरता मिळाली तर सोयीचे होईल.मी माझी अन राजेश्वरीची पुरेशी काळजी घेईन.महाराजांनी नाईलाजाने त्यांना परवानगी दिली अन राजवाड्यातल्या सेवकांना रघुनाथला आवश्यक ते सामान अन मदत करण्याची आज्ञा दिली.महाराजांना नमस्कार करून रघुनाथ अन राजेश्वरी आपल्या नवीन ठिकाणाकडे निघाले।
सौ.उषा.