सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

Finding the Tracking Code

Finding the Tracking Code

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री १० कुठून बर सुरु कराव ? हं मुख्य द...
                                                     श्री                                             १०
कुठून बर सुरु कराव ? हं मुख्य दारा जवळूनच सुरुवात करावी,मारोतीरायाच मंदिर पण आहे तिथे.मंदिर झाडून काढायला पाहिजे पहिले,विचार आल्याबरोबर ती खोलीकडे गेली. केरसुणी,काठी घेऊन मंदिराजवळ आली ,आत वाकून बघितलं मारोतीरायाची छान मूर्ती होती.सगळीकडे जाळे लागले होते ते आधी साफ केले,झाडले नमस्कार केला,मारोतीराया तुला उद्या सकाळी पाणी घालून छान आंघोळ घालीन,किती मळला आहेस तू.देव म्हणून मांडून ठेवतात तर स्वच्छता नको का ठेवायला स्वतःशीच बडबड करत राजेश्वरी झपाट्याने काम करत होती.सूर्य नारायण संध्यादेवी बरोबर निघाले म्हणताना पाखरांची घरट्याकडे परतायची लगबग सुरु झाली.राजेश्वरीने एकदा डोळेभरून आपल्या नव्या कामाकडे बघितले खोलीवर जाऊन कंदील लावायला हवा,बापू यायच्याआत स्वैपाक पण झाला तर मस्त गप्पा मारता येतील,हातातलं सामान संभाळत राजेश्वरीची पावलं भराभर पडत होती.संध्याकाळच्या सोनेरी किरणांनी राजमहालाचा उंच मनोरा नाहून निघाला होता.
                                स्वैपाक झाला तरी अजून रघुनाथ घरी आला नव्हता.किती वाट बघायची?इथे तर बोलायला पण कुणी नाही.कुत्र्याच्या पिल्लाला तिने जवळ ओढले,तू पटपट मोठा हो बऱ,तुला अजून पायऱ्या चढता येत नाही,पण तुझा या क्षणी मला मोठाच आधार वाटतो आहे.तुझ नाव काय रे ठेवायचं?बऱ बापू आला की ठरवू पण माझ्या बरोबर येतोस का थोडं अंगणात तरी जाऊ.बाहेर आल्यावर खरच बरं वाटतंय,रात्री पण त्या आरश्यात दुपार सारखंच दिसत असेल का ?किती मळके ,विटके चित्र होते आपले,पण आपण हे असे गावोगाव फिरणार त्यात रंगाच काम करणारे तेव्हा असेच कपडे घालावे लागतात.आपला चेहरा छान आहे असं सगळेच म्हणतात .आत्ता पाहूया का आरश्यात ?फक्त चेहेऱ्या जवळ कंदील धरायचा .मनात विचार आल्याक्षणी राजेश्वरी कंदील,काठी घेऊन निघाली.कुठेही जाताना काठी घेऊन जायची सवय तिला लहानपणापासूनच लावली होती रघुनाथने.आपल्या खोलीत आरसा नाही हे तिच्या पहिल्यांदाच लक्षात आले.मान झटकून ती तडक निघाली,तिच्या मागे छोटे पिल्लू पण होते .घाई घाईने त्या खोलीत शिरून राजेश्वरीने कंदील वर उचलला अरेच्या इथला आरसा कुठे गेला? दुपारी जितक्या खोल्या बघितल्या त्या सगळ्यांमधे आरसे होते मग आता का दिसत नाही?एव्हड्या मोठ्या जागेत आपण एकटेच आहोत हे राजेश्वरीला प्रकर्षाने जाणवले.राजेश्वरी वेगाने परत फिरली अन धावतच तिने आपली खोली गाठली! 
                                                                            सौ.उषा.
              

रविवार, ६ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ९ आज राजेश्वरी पूर्ण द...
                                                   श्री                                                         ९
आज राजेश्वरी पूर्ण दिवस एकटी राहणार होती.रघुनाथ सुदर्शन महाराजांना भेटायला जाणार होता.सकाळी रघुनाथ  बरोबरच तिनेही खाऊन घेतले,सगळी आवरासावर करून तिने एकदा खोलीभर नजर फिरवली.इथे आले त्यापेक्षा खोली खूपच छान दिसत होती .मुख्य म्हणजे खालची सारवलेली जमीन ! आज भरपूर वेळ असल्यामुळे तिने तो किल्लावजा राजमहाल नीट पहायचे नक्की केले.मनात विचार आल्याबरोबर राजेश्वरी तडक उठली,खोलीचं दार लावून ती एक एक खोली बघत निघाली.सगळ्या खोल्यांमध्ये हंड्या झुंबर लावून त्यांना सुशोभित केले होते.भिंतींमध्ये पूर्ण उंचीचे सुंदर आरसे,राजेश्वरीने स्वतःला त्या आरश्यात न्याहाळले,मातकट तपकिरी रंगाचा पायघोळ झगा,त्याखाली पायजमा अन अंगावर तितकीच विटकी ओढणी.राजमहालातल्या आरश्यात बघण्यासारखा अवतार नक्कीच नव्हता.झटदिशी आरश्या समोरून बाजूला होत राजेश्वरीने आपले लक्ष दुसरीकडे वळवले.खोलीतून बाहेर पडल्यावर बाजूलाच असलेल्या जिन्याकडे वळून ती सौधावर उभी राह्यली.रानाकडून येणाऱ्या प्रसन्न वाऱ्याने तिचे स्वागत केले.थोड्या वेळाने ती खाली जायला निघाली अन तिची नजर दूरवर काहीतरी शोधल्याच्या आनंदात होती.होय नक्कीच ती एक नदी होती जिचा क्षीण प्रवाह दुपारच्या उन्हात चमकत होता एखादी रुपेरी सतरंजी घडी करून अंथरल्यासारखा!उड्या मारतच जिना उतरून राजेश्वरी खाली आली.हा नवीन शोध बापूला केव्हा सांगते असे तिला झाले.राजेश्वरी स्वतःवर बेहद्द खूष होती.खोलीत येऊन झोपायचे ठरवले खरे पण रोजची सवय नसल्याने झोपही येईना,त्यात बोलायला कुणी नाही.जरी या एकटेपणाची तिला लहानपणापासून सवय असली तरी तो माणसांच्या समूहात राहून एकटेपणा होता.आज पहिल्यांदाच तिला हा एकटेपणा खायला उठला.उद्यापासून सरळ बापू बरोबर जायचे तिने मनाशी नक्की ठरवले.खोलीत बसून समोरचे उदास वातावरण आणखीच उदास होत चालले होते.रस्त्याच्या दुतर्फा वाढलेले गवत कापून काढावे तेवढाच वेळ जाईल.मनात आल्याबरोबर ती तडक कोयता घेऊन बाहेर पडली.राजेश्वरी म्हणजे मूर्तिमंत उत्साह! 
                           सौ.उषा. 

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ...
                                                                            श्री                                                      8
धापा टाकत राजेश्वरी त्या पाहुण्याकडे पाहू लागली.एक छोटंसं कुत्र्याचे पिल्लू,काळभोर ,तपकिरी डोळ्यांचे अन इवल्याश्या नाकाचं.राजेश्वरीने त्याला उचलून पुन्हा पळायला सुरुवात केली.गाडी घेऊन आत येत असलेल्या रघुनाथला पाहून ती जागीच थांबली.काय नवीन मित्र पण मिळाला वाटतं,रघुनाथच्या प्रश्नावर ती मनमोकळं हसली.माझ्या आधी नवीन जागा बघून आलीस की काय ?रघुनाथच्या या प्रश्नावर राजेश्वरीने जोरात नाही म्हणून मान हलवली.रघुनाथ तिला सामाना जवळ उभं करून राजवाड्याच्या दिशेनी झपझप निघाला.बकुळीचा पार ओलांडून त्याने राजवाड्यात प्रवेश केला.अतिशय सुंदर वास्तू पण तितकीच उदास सगळीकडे पाला पाचोळा,धूळ,अन उघड्या बोडक्या खोल्या !जास्त विचार करायला वेळ नव्हता त्याने तिथेच उभं राहून दोन खोल्या सामान अन राहण्याच्या दृष्टीने पक्क्या केल्या.रघुनाथ अन राजेश्वरीने सगळे सामान एव्हाना त्या खोल्यांमध्ये रचून ठेवले होते.राजेश्वरीने सामानातली केरसुणी काढून दोन्ही खोल्या झाडून काढल्या ,रघुनाथने एका भिंतीवर गणपतीचं चित्र काढलं,दोघांनी नमस्कार केला.राजेश्वरीने तीन दगड मांडून चूल तयार केली,जवळचा पाचोळा अन झाडांच्या फांद्या तोडून सरपण तयार केले.दोघांचा स्वैपाक केला अन जेवणार तोच दाराशी आवाज आला.कुत्र्याचे पिल्लू दारात हजर,रघुनाथने संमती देताच तिने त्याला आत घेतलं,पोळीचे तुकडे त्याने भराभर खाल्ले बहुदा ते पण ह्यांच्या सारखेच उपाशी असावे.राजेश्वरीने ठरवलं उद्या त्याच्या करता एक पोळी सकाळ संध्याकाळ जास्त करावी हेच बरं.सामान आवरायचं उद्यावर ढकलून राजेश्वरीने मोठी सतरंजी काढून अंथरली दोन जाड चादरी पण पांघरायला घेतल्या एव्हाना रघुनाथने बैलगाडी सोडून बैलांना झाडाला बांधून ठेवलं.बैलांच्या खाण्या पिण्याची काहीच व्यवस्था नव्हती. कायम पायीच फिरायचं असल्याने दोघानांही हे लक्षात आले नव्हते.राजेश्वरीला संकोचल्या सारखे झाले.काय हे मुकी जनावरं बिचारी कुणाला सांगायची नाहीत पण आपल्या लक्षात राह्यला हवं होतं,ती उठली बैलांजवळ आली दोघांच्याही पाठीवर गळ्यावर तोंडावर हात फिरवून त्यांची माफी मागितली अन उद्या सकाळी त्यांना भरपूर खायला द्यायचे वचन दिल्यावरच तिला रात्री शांत झोप लागली.सकाळी जाग आली,पण नेहेमीपेक्षा उशीरच झाला होता.राजेश्वरीचा स्वैपाक झाल्यावर दोघही हातात काठी अन एक टोपली घेऊन अन आठवणीने बैलांना घेऊन निघाले.दोन तीन दिवस आता त्यांना सारं जंगल फुलांकारता पिंजून काढायचं होतं.रंग मनासारखे तयार व्हायला हवे.बैलांनी पण पोटभर चारा खाला,एव्हाना दोघं बापलेक टोपलीत फुलं,पानं अन भरपूर सरपण गोळा करून घेऊन आले होते.जंगलातल्या विविध वनस्पती पाहून रघुनाथ अगदी हरखून गेला होता,गेल्या कित्येक वर्षात त्याला इतकं सुंदर अन घनदाट जंगल बघायला मिळाल नव्हतं.
                                                  सौ.उषा.