शुक्रवार, २ डिसेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: ...
usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ३० आज सकाळ पासूनच किल्ल्यावर गडबड सुर...

किल्ल्याचे रहस्य
श्री ३०
आज सकाळ पासूनच किल्ल्यावर गडबड सुरु होती.आज दुपारी राजांचे मित्र राजमहालात राह्यला येणार होते.सुजयराजे तर सकाळपासूनच आले होते,पुढचे काही दिवस ते पण इथेच राहणार होते.आज सगळ्यांचाच स्वैपाक राजे सांगतील त्याप्रमाणे व्हयायचा होता.राजांच्या इंग्रज मित्रांच्या आवडीचा स्वैपाक करायला कुणी आचारी मुद्दाम बोलावला होता.
काम संपल्यावर तिथे राहणे रघुनाथ अन राजेश्वरीला कंटाळवाणे वाटत होते.रघुनाथ सुजयराजांना सांगून निघून जावे या विचारात असतानाच माखन त्यांच्या खोलीकडे येताना दिसला.पाठोपाठ सुजयराजे पण येताना दिसले.रघुनाथ उठून उभा राह्यला राजेश्वरी पण दाराचा आडोसा घेऊन उभी राह्यली.सुजयराजे हसत हसत आत आले त्यांनी माखनच्या हातातले सामान रघुनाथच्या हातात दिले,हे तुमच्या दोघांकारता,परवा त्या राजमहालात माझ्या मित्रांना मेजवानी आहे तुम्ही दोघांनी पण तिथे यावे असे मला वाटते,ह्यात काही कपडे अन अलंकार ठेवले आहेत त्याचा कृपया स्वीकार करा. त्या उरलेल्या भिंतीचे चित्रकाम माझ्या मित्रांसमोर करायचे आहे बरका एव्हढे बोलून सुजयराजे जितक्या त्वरेने आले तितक्याच पटकन निघून गेले.
रघुनाथ अन राजेश्वरी एकमेकाकडे बघतच राह्यले.हे सगळेच त्यांच्या करता नवीन होते.हे कपडे,दागिने ते घालणार का असे कुणीच विचारले नव्हते राजेश्वरीने रघुनाथच्या हातातले सामान घेतले.इतका तलम अन सुंदर कपडा दोघांनी आजवर कधीच वापरला नव्हता.गुलाबी रंगाचा झगा त्यावर वेलबुट्टी,तशीच सुंदर ओढणी,अन तसाच पायजमा,गळ्यात घालायला टपोऱ्या चमकदार मोत्यांचा दुहेरी पदर असलेला हार राजेश्वरी करता अन सोनेरी रंगाचा फेटा किंचित हिरवी छटा असलेला कुर्ता अन पायजमा,मोत्यांचा एकसर गळ्यात घालण्याकरता रघुनाथ करता .या अनपेक्षित संकटाने दोघेही हतबल झाले होते.इथून रात्री पळून जावे असे पण आता त्याना वाटू लागले होते.

गुरुवार, १ डिसेंबर, २०११
usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य
usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री २९ संध्याकाळी दिवेल...
बुधवार, ३० नोव्हेंबर, २०११
किल्ल्याचे रहस्य
श्री २९
संध्याकाळी दिवेलागणीला राजेश्वरी उठून बसली पण आपल्याच मनाशी विचार करत होती,खोलीतून बाहेर यावेसे वाटत नव्हते.सगळ्यांच्या प्रश्नार्थक नजरा न बोलून बरच काही बोलत होत्या त्यापेक्षा इथेच बरे,पण आपण काही गुन्हा केला आहे का?त्यांच्या सगळ्यांच्या प्रश्नाला खरे उत्तर ध्यावे का?नाही नकोच उगीच फालतू चर्चा! राजेश्वरीने सगळ्यांना आवडेल असे उत्तर द्यायचे ठरवले.
रात्री जेवायच्या ठिकाणी ती स्वतःच गेली अन तिने रघुनाथला उद्देशून पण सगळ्यांना ऐकायला जाईल अश्याप्रकारे सांगायला सुरुवात केली"तुम्हा सगळ्यांनाच उत्सुकता असेल की मी रात्रभर कुठे होते,मी संध्याकाळी काम आटोपून सौधावर उभी होते.अगदी अंधारून आले म्हणून मी खाली उतरून तिथल्याच एका खोलीत कसला तरी आवाज आला म्हणून डोकावले अन तिथेच चक्कर येऊन पडले.खोलीत अंधार असल्यामुळे कदाचित मी कोणाला दिसले नसेन,सकाळी शुद्धीत आल्यावर मी लगेच आपल्या खोलीवर आले बस एवढेच.सगळ्यांना खात्री होती की हे त्या स्त्रीचेच काम असावे कारण राजेश्वरी सारख्या तरुण मुलीला उगीचच चक्कर कशी येईल आणी सगळ्यांनी एकमेकाला बजावले की संध्याकाळ व्हायच्या आत सगळे एकत्र दिसले पाहिजे.राजेश्वरीने जोरात मान हलवून रुकार दिला,तिने हळूच रघुनाथकडे बघितले त्याचा चेहेरा निर्विकार होता.
पुढचे आठ दिवस सगळ्यांनाच फार धांदलीचे गेले.राजांनी सगळा किल्ला,राजमहाल स्वतःच्या देखरेखीखाली स्वच्छ करून घेतला. किल्ल्यातला राजमहाल आता खरोखर नटला होता.चारीकडे फुलबाग, वेगवेगळ्या आकाराची कारंजी,इकडून तिकडे उडणारी फुलपाखरं ,अन वस्तीला येऊ बघणारे पक्षी,मुख्य म्हणजे माणसांची वर्दळ यामुळे राजमहाल फारच शोभिवंत दिसू लागला होता.सुजयराजांचे मित्र दोन दिवसांनी इथेच राह्यला येणार होते.मेजवानीचा मोठाच बेत राजांनी आखला होता त्याची जय्यत तयारी सुरु होती.रंगीबेरंगी गालिचे,पडदे हंड्या झुंबर अन आणखी कितीतरी वस्तूंनी राजमहालाच्या सगळ्या खोल्या आकर्षक दिसू लागल्या होत्या.माखन सांगेल त्याप्रमाणे खोल्यांची सजावट केली जात होती.स्वतः सुजयराजे दिवसातून दोन वेळा येऊन कामाची खातरजमा करून घेत होते.त्या महालात राजेश्वरीचे चित्र पूर्ण झाल्यावर सुजयराजांना निरोप दिल्यावर ते लगेच आले.लहान मुलाच्या उत्सुकतेनी त्यांनी चित्र बघून त्याची खूप तारीफ केली,पण राजेश्वरीला का कोण जाणे असं वाटलं की बहुदा त्यांना विशेष आवडले नसावे.एकच भिंत राह्यली होती त्या भिंतीला फक्त रंग लावून ठेवायला सांगून सुजयराजे निघून गेले.
सौ.उषा.

usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री २८ अलगद पाय टाकत राजे...
मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११
किल्ल्याचे रहस्य
श्री २८
अलगद पाय टाकत राजेश्वरी पुढे निघाली.ती दोन्ही हातांनी चाचपडत चालत होती.डोळे अंधाराला सरावले होते.पुष्कळ वेळ चालल्यावर तिला माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला,थोड्या प्रकाशाची तिरीप पण दिसू लागली होती,आपल्याच श्वासोच्छ्वासाचा आवाज फार जोरात येतो आहे असं वाटून ती आणखीच जपून चालत होता आता ती पुढे पाऊल टाकणार तोच एका मजबूत हाताने तिचे तोंड दाबून धरले.घाबरलेल्या राजेश्वरीने मागे वळून बघण्याचा प्रयत्न केला नाही,कसंबसं स्वतःला सावरून तिने डोळे घट्ट मिटून घेतले.आता जे काय होईल त्याला सामोरं जायला हवं अशी मनाची समजूत घालण्याचा आटोकाट प्रयत्न ती करत होती.तिला जवळ जवळ ओढत,फरफटत त्या व्यक्तीने एका ठिकाणी आणले,कुठलेसे दार उघडून तिला आत ढकलून त्याने पुन्हा दार लावून घेतले.एक अस्फुट किंकाळी तिच्या तोंडून बाहेर पडली राजेश्वरी तिथेच बेशुद्ध होऊन पडली.
सकाळी जाग आल्यावर ती पटकन उठून बसली.आपण आहो तरी कुठे हे बघण्या करता ती इकडे तिकडे बघू लागली.ही जागा आपल्या ओळखीची आहे नक्कीच राजेश्वरी आनंदाने बघू लागली त्या आरश्याकडे.होय ही तीच खोली आहे आरश्याची जादू असलेली.पण आपल्याला तर कित्येक कोस चालल्या सारखे वाटते आहे.पाय किती दुखताहेत.हातालाही खूप खरचटलं आहे.उजवा हात तर दुखतो पण आहे.बाहेर उजाडले होते,राजेश्वरी हळूहळू आपल्या खोलीत आली.
राजेश्वरी रात्रभर न आल्याने सगळ्यांनाच खूप काळजी वाटत होती.सगळीच रात्रभर जागी होती.रघुनाथने सगळ्यांच्या देखत तिला जोरात थप्पड मारली.राजेश्वरी रडत रडत रघुनाथच्या गळ्यात पडली.बापू मी आता नाही जाणार मला माफ कर असे म्हणून पण रघुनाथचा राग ती शांत करू शकली नाही.
दिवसभर राजेश्वरी खोलीत झोपून होती.तिला चांगलाच ताप भरला होता.रघुनाथने तिला कसलासा पाला उकळून काढा करून प्यायला लावला पण अजूनही त्याचा राग गेला नव्हता.कालपासून राजेश्वरी अन रघुनाथ उपाशीच होते.रघुनाथ खोलीचे दार लोटून राजमहालाच्या कामाला निघून गेला.राजेश्वरीचे विचारचक्र एकीकडे सुरूच होते.मी पुन्हा तिथे जाणार नाही असं म्हणत असतानाच तिचे आतले मन म्हणत होते मी पुन्हा नक्कीच तिथे जाईन,पुरत्या तयारीनिशी,तिला स्वतःचेच एकीकडे नवल वाटत होते,या रहस्याचा उलगडा करून तिचा कोणचाच फायदा नव्हता,हे काम संपल्यावर त्यांना इथून लवकरच जायचे होते.तिच्या उजव्या हाताला ठणका लागला होता त्याच्याकडे मधून मधून तिचे लक्ष जात होते.डोळ्यावर झोपेचा अंमल चढू लागला होता.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)