शनिवार, १५ जून, २०१३

 तीर निशाना साधा नभका और हम आगे बढ़ते गए 
 राह रोककर कृष्णकन्हैया हमसे बोले कहाँ चले 
कुछ तो न्यारे बन जाओ जगके प्यारे बन पाओ 
इस जगमे आए होतो कुछ तो ऐसा कर जाओ 
जग तुमको याद  करे ऐसी करनी करते जाओ 
छैल छबीली तिरछी मूरत ऐसी भाई तन मनको 
अहंकार कब छूट गया पता न चला हमको 

शनिवार, ६ एप्रिल, २०१३

रविवार, १३ मे, २०१२

किल्ल्याचे रहस्य

                                                  श्री                                           ६0
सुजयराजांच्या प्रश्नाला राजेश्वरी जवळ खरच उत्तर नव्हते.तिला तरी कुठे माहीती होते
भविष्यात काय दडले आहे ते.पण सुकन्या बरी होते आहे याचा तिला मनापासून आनंद होत होता.सुवर्णरेखा मात्र अगदी सुजयराजा  सारखीच अस्वस्थ झाली होती आईच्या बरे होण्याच्या आनंदापेक्षा राजेश्वरीच्या येथून निघून जाण्याच्या कल्पनेने तिला जास्त व्याकुळ केले होते
आज महाराज सुदर्शन आणी महाराणी सुलक्षणा  राजवाड्यात येणार म्हणून सकाळ पासून मोठी गड़बड़ सुरु होती.जो तो घाईने हातातले काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होता
सुकन्या त्या दोघांना बघून कशी वागते याची सर्वांनाच उत्सुकता होती.आज राजेश्वरीची पण परीक्षा होती.तिने सुकन्याला फुलबागेकड़े नेले.बागेत खूप वेळ फिरल्यावर तिने थोड्या शब्दात महाराज अन महाराणी येणार असल्याचे सांगितले.सुकन्याने हसून प्रतिसाद दिला.तिच्याच सांगण्यावरून त्या दोघींनी बागेतली गुलाबाची फुले तोडली.


                  सुकन्याने राजेश्वरीच्या मदतीने त्या फुलांचे सुंदर हार केले.राजेश्वरीच्या लक्षात आले की सुकन्या  जवळ एक रसिक अन कलासक्त मन आहे.त्या दोघींची मैत्री दिवसेदिवस गहिरी होत चालली  होती.

                           केशर धावत येताना दिसली म्हणून दोघी उठून उभ्या राह्यल्या.अपेक्षेप्रमाणे केशरने त्यांना  महाराज अन महाराणी आल्याचे सांगितले.सगळेच लगबगीने निघाले.वाड्याच्या प्रवेशद्वारा 
जवळ चांगलीच गर्दी झाली होती.सुकन्याने सगळ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.टवटवीत 
गुलाबाचे हार घालून अन नमस्कार करून तिने सुदर्शन अन सुलक्षणाला चांगलाच धक्का 
दिला.आपल्या सुनेमध्ये झालेले हे परिवर्तन दोघांना सुखावून गेले.त्यांच्या मुलाचे सर्व वाईट  दिवस संपले होते.डोळ्यातले पाणी न थांबविता महाराणी सुलक्षणा पुढे झाल्या अन त्यांनी 
सुकन्याला आपल्या मिठीत घेतले.सुजयराजे पण हा आनंद सोहळा बघत होते.एकाएकी  त्यांच्या लक्षात आले राजेश्वरी अन सुवर्णरेखा दोघी दिसत नव्हत्या.
                                                                              सौ.उषा

मंगळवार, ८ मे, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:
...
: श्री ...

किल्ल्याचे रहस्य

श्री 59
गेले पंधरा दिवस राजेश्वरी अन सुकन्या सतत बरोबर होत्या.छोटी सुवर्णरेखा अवती भवति असायचीच
सुजयराजांना मात्र राजेश्वरी ठरवून पण वेळ देऊ शकत नव्हती त्यांची आणखी ही एका कारणाने घालमेल होत होती
खर म्हंटल तर सगळा राजवाडाच अस्वस्थ झाला होता.सुकन्याची झपाट्याने होणारी प्रगति जेवढी स्तिमित करणारी
होती तेव्हढीच ती राजेश्वरीच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह लावणारी होती.राजेश्वरी मात्र या सगळ्या काळजीतुन मुक्त
होती.हाती घेतलेले काम सर्व शक्तिनिशी पूर्णत्वास न्यायचे हेच ती लहानपणापासून शिकली होती निसर्गाच्या सहवासातुन आपोआप येणारा मनाचा मोठेपणा राजेश्वरीचा बहुमोल अलंकार होता.निसर्गाचा सर्वांना भरभरून
देण्याचा स्वभाव
आणी उद्याची चिंता नसणे ह्या सर्वच गुणामुले राजेश्वरीने आपोआपच सगळ्यांचे लक्ष वेधून
घेतले होते अगदी एखाद्या नुकत्या उमललेल्या फुला सारखी ती सदैव हसतमुख अन प्रसन्न असायची.जे काय
तिच्या जवळ होते त्यात ती नेहेमीच संतुष्ट असायची।
सुकन्या अगदी थोड़े सुद्धा तिला नजरेआड होऊ देत नसे.राजेश्वरीला कामाचा ताण पडू नए म्हणून तिने पुन्हा केशरला बोलावून घेतले होते.केशर आल्याने राजेश्वरीचे काम खरच कमी झाले.सुकन्याला कुठल्याही प्रकारे

झोपेचे औषध न  देण्यास मात्र तिने केशरला अगदी आल्या बरोबर बजावून सांगितले.सुकन्यालाझोप येण्याकरता कुठलाही उपचार घेण्याची गरज राहिली नाही हे सत्य पचनी पडायला केशरला बराच त्रास झाला।
रात्री उशीरा राजेश्वरीला गाठून सुजयराजांनी विचारले सुकन्या सुधारली म्हणून तू आम्हाला सोडून जाणार नाही ना ?
सौ.उषा                                

शनिवार, ५ मे, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य:                                                श्री                                     ५७ राजेश्वरी लगेच उत्साहाने म्हणाली आपण माझ्या...

किल्ल्याचे रहस्य

                                                श्री                                         58
सुकन्या झोपली पण सुवर्णरेखा रुसुन बसली होती तिची राजेश्वरीने 
कशीबशी समजूत काढली.संध्याकाळी तिला बरोबर न्यायचे कबूल केले 
तेव्हा कुठे तिचा राग शांत झाला.
                 संध्याकाळी राजेश्वरीने सुकन्या अन सुवर्णरेखा दोघींना 
तयार केले आणी मग त्या तिघी फिरायला बाहेर पडल्या.त्यांच्यामागे
सुरक्षित अंतर ठेवून सुजयराजे अन माखन पण बाहेर पडले.राजमहालाभोवती  
असलेल्या बागेत फिरायचे त्यांनी ठरवले.
बागेत आल्यावर सगळेच खूप आनंदित झाले.तिथली हिरवळ,सुंदर रंगीबेरंगी 
फुल,फुलपाखर सगळेच आनंददायी.सुकन्याच्या डोळ्यात निरागस 
भाव होते.तिथले विकृत क्रूर भाव कुठल्या कुठे नाहीसे झाले होते.
सुजयराजांना इतक्या लांबून हा बदल जरी दिसत नसला तरी त्यांचे  हावभाव एकदाही आवाज न चढता होत असलेले संभाषण त्यांना सुखावून जात 
होते.हळूहळू रात्रीच्या दिशेनी दिवसाची वाटचाल सुरु झाली होती.       रात्रीचा अंधार जरी आता सगळीकडे पसरू लागला असला तरी वर 
आकाशात नक्षत्रांचा खच पडला होता.पौर्णिमा जवळ असल्याने असेल 
पण चंद्रबिंब पण चांगलेच मोठे दिसत होते.त्या गूढ रम्य प्रकाशात सुकन्या 
राजेश्वरी अन सुवर्णरेखा चढाओढीने सुस्वरूप दिसत होत्या.त्या दिव्य
सौंदर्याकडे सगळेच भान हरपून बघत होते.सुकन्याच काय सुवर्णरेखा सुद्धा 
तिथून उठायला तयार होईना.रात्र सुद्धा इतकी सुंदर असते हे त्यांना आज कळले 
होते.दोघींच्याही डोळ्यात राजेश्वरीबद्दल होते फक्त प्रेम अन आदर.
                                           सौ.उषा