रविवार, २९ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५४ किल्ला...

किल्ल्याचे रहस्य

                                              श्री                                                    ५४
                        किल्ला दुरून दिसू लागला होता.आपले घर दिसल्या सारखा आनंद सगळ्यांना झाला.राजेश्वरी खोलीत आली आणी ती आश्चर्य चकित झाली एकाच दिवसात खोलीचा कायापालट झाला होता.खोलीत दोन पलंग त्यावर गाद्या सुंदर चादरी अन खोलीत पाय रुतेल इतका जाड गालीचा. रघुनाथ पण या बदलाने प्रभावित झाल्याशिवाय राह्यला नाही. त्याला फक्त एकाच काळजीने व्यापले होते की आपण आता झोपायचे कसे? इतक्या जाड गादीवर आजवर तो कधीच झोपला नव्हता. सुवर्णरेखेला मात्र या सगळ्यापेक्षा आपल्याला इथे राह्यला मिळणार अन जमलं तर त्या बाईला पुन्हा भेटायला मिळणार.माझ्या म्हाताऱ्या आजी आजोबांना,माझ्या बापूला फटके मारणाऱ्या, उपाशी ठेवणाऱ्या त्या बाईला काहीतरी जबरदस्त शिक्षा केली पाहिजे या विचारात ती दंग होती.राजेश्वरी फुलांच्या पायघड्यांवर जणू चालत होती.एकाच वेळेस सर्व रंग अवतरले होते .त्या रंगांचे कौतुक राजेश्वरी शिवाय कोण जाणू शकणार!
तिचा जन्मच मुळी रंगांशी खेळण्या करता झाला होता.
                      किल्ल्यावरची सगळी माणसं काहीतरी निमित्त साधून खोलीत डोकावून गेली होती.राजेश्वरी अन रघुनाथचे एका दिवसात पालटलेले भाग्य सगळ्यांच्याच कुतूहलाचा विषय होते.त्यात राजकन्येला त्यांच्या बरोबर राह्यची परवानगी हा तर रहस्यमय भाग होता.राजेश्वरीला मनातल्या मनात हसू येत होते.आपल्या अंगावर धड कपडे नाही अन या उंची गालिचे अन चादरीवर आपण वावरायचे छे!ही बहुदा राजकन्ये करता व्यवस्था केली असावी.आपणच रात्री दुसरी खोली गाठावी हेच बरे.तिची विचार शृंखला तुटली ती माखनच्या आवाजाने त्याने हातातले गाठोडे तिच्या स्वाधीन केले अन सांगितले की महाराणी म्हणाल्या की यापुढे हेच कपडे अन अलंकार घालायचे.त्याचे वाक्य जणु पूर्ण करण्या करता आत येत सुजयराजे म्हणाले तसेही तुझे वस्त्र वाघाशी लढताना फाटले,जळले आहे,तेव्हा आता नाही म्हणू नकोस आणी या सगळ्याचा स्वीकार कर. राजेश्वरी फक्त एवढेच म्हणाली की मला जर त्या ठिकाणी नोकर म्हणून जायचे असेल तर मला एवढे भारी कपडे अन अलंकार घालणे सोयीचे नाही.आपण या आधी दिलेले हे थोडे अलंकार मी रोज घालते,मला कपड्यांची आवश्यकता आहे पण ते साधे कपडे,त्यांची कृपया व्यवस्था करावी.आणी हो आपल्याला कसे कळले मी वाघाला पळवले,सुजयराजे हसत म्हणाले,आम्ही तुमच्या मागोमाग इकडे यायला निघालो.आम्ही संध्याकाळी येणार होतो पण मग विचार आला की तुझ्या शोध मोहिमेत मला पण भाग घ्यायला मिळाला तर तेवढाच आनंद मिळेल.
                                   राजेश्वरीच्या योजनेप्रमाणे रात्री सगळ्यांनी वागायचे नक्की झाले.रघुनाथ,सुजयराजे बरोबर येणार म्हणून एकीकडे तिला आनंद झाला होता अन त्याच वेळेस त्यांचे येणे त्यात सुवर्णरेखा बरोबर म्हणजे थोडी काळजी वाटत होती.याच योजनेचा भाग म्हणून सुजयराजे राजकन्येला घेऊन राजमहालात गेले.
                                सौ.उषा.
                       
                    




                                                                             

बुधवार, २५ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                          श्री     ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ५३ राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महारा...
                                         श्री                                    ५३
राजेश्वरी राजवाड्यातून बाहेर जायला निघाल्यावर महाराज स्वतःच म्हणाले पायी जाऊ नका तुम्ही आमच्या सुजयराजांची वधू आहात सुजयराजे बाहेर त्यांच्या बरोबर आले आणी त्यांनी हळू आवाजात त्या दोघांना जास्त सावध राहण्याची सूचना केली.आणी आज संध्याकाळी आपण येईपर्यंत खोलीतून कुठेही न जाण्याची त्यांनी अप्रत्यक्ष सूचनाच केली.त्यांचे बोलणे सुरु होते तोच कुठूनतरी सुवर्णरेखा धावत आली आणी राजेश्वरी बरोबर जाण्याचा हट्ट करू लागली.शेवटी सुजयराजे तिला म्हणाले की आजी आजोबा हो म्हणाले तरच जायचं,राजकन्या पटकन आत धावत गेली अन येताना महाराज सुदर्शन अन महाराणी सुलक्षणाला बरोबर घेऊन आली त्यानी राजेश्वरीला राजकन्येची काळजी घ्यायला बजावून सांगितले.तिचा सेवक पण थोड्यावेळात तिच्याकरता खाण्याचे साहित्य अन काही कपडे घेऊन हजर झाला.रात्री उशीरा राजवाड्यावर परत यायचे नाही असे त्यानी सांगितल्यामुळेतर राजकन्येला फारच आनंद झाला.म्हणजे आज रात्री पण आपल्याला किल्य्यावर राह्यला मिळेल,राजेश्वरी बरोबर राह्यला मिळेल.सेवक घोड्यावर अन बाकी तिघं बैलगाडीतून निघाले.राजेश्वरीच मन पिसा सारखं हलकं झालं होतं.तिच्या बुद्धी आणी मनाचा मोठा अजब खेळ चालला होतं.बुद्धी सर्व तपासून घ्यायला सांगत होती,अन मन म्हणत होतं मला कुठल्याच प्रश्नांची उत्तर नको.मला सुजय राजांनी आपलं म्हंटल हेच माझ्या करता पुरेसे आहे.हातातल्या काठीशी एकीकडे तिचा खेळ सुरु होता.राजेश्वरी भानावर आली ती समोरच्या दृश्याने 
राजकन्या तर भीतीने थरथर कापू लागली.समोर मोठ्या डौलात बसलेल्या वाघोबांना बघून सगळेच घाबरले होते,बैल आधीच बुजले होते पण आपल्याच तालात असलेल्या राजेश्वरीच्या ते लक्षात आले नव्हते. रघुनाथ खाली उतरला अन म्हणाला तुम्ही माघारी जा मी एकटा या वाघाला थोपवून धरतो .राजेश्वरीने सपशेल नकार दिला,तिने पटकन अंगावरची ओढणी काढली गाडीवाना जवळून त्याची काड्यापेटी घेतली अन ओढणी पेटवून दिली,एका हातात पेटलेली ओढणी अन दुसऱ्या हातात काठी घेऊन ती सरळ वाघावर चालून गेली.वाघ जागचा उठून जंगलात पळाला.राजेश्वरीचे प्रसंगावधान बघून सगळेच आश्चर्यचकित झाले. उरलेलेला प्रवास निर्विघ्न पार पडला.साऱ्या रस्ताभर सुवर्णरेखा राजेश्वरीला  बिलगून बसली.राजेश्वरी अन रघुनाथ हाच विचार करत होते की आजवर जंगलात इतक्या वेळा जाऊन कधीही वाघ दिसला नाही. संकट थोडक्यात टळले होते.
                                सौ.उषा.

रविवार, २२ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५२ सुजयराजे घोड्यावरून खाली उतरून त्या दोघांबरोबर पाय...

किल्ल्याचे रहस्य

                                            श्री                                 ५२
सुजयराजे घोड्यावरून खाली उतरून त्या दोघांबरोबर पायी चालत राजवाड्यात आले.सुदर्शन महाराज आणी महाराणी सुलक्षणा बसलेल्या कक्षात त्यानी राजेश्वरीसह प्रवेश केला.राजकन्या त्यांना बघून आनंदाने पुढे झेपावली.तिने सुजयराजांना बापू म्हणत घट्ट मिठी मारली.हा आनंद   सुजयराजांना अगदीच अनपेक्षित होता.गेल्या कित्येक वर्षात त्यांच्या लेकीने त्यांच्यावर अश्याप्रकारे प्रेमवर्षाव केला नव्हता.त्या दिवशी जंगलात थोडं वेगळे वागली होती पण ती तिची क्षणिक लहर म्हणून त्यांनी फार लक्ष दिले नव्हते,आजचा प्रकार काही वेगळाच होता.त्यांचे आई वडील पण हा प्रकार पाहून आश्चर्यचकित झाले होते.राजांनी आपल्या लेकीला कडेवर उचलून तिचे खूप लाड केले.आणी मग एकदम भानावर आल्यासारखे त्यांनी तिला खाली उतरवले.राजकन्या थोडी नाराज झाली कारण तिला तिच्या वडलांना खूप काहीतरी सांगायचे होते,ती फक्त इतकेच म्हणाली "माझे बापू जगातले सगळ्यात चांगले बापू आहेत."सुजयराजांच्या डोळ्यात पाणी तरळले, राजकन्या बाहेर खेळायला निघून गेली.
                               सुजयराजांनी आता राजेश्वरीचा हात धरून तिला महाराज अन महाराणी पुढे उभे केले,अन ते म्हणाले की तुम्हीच आमच्या मागे लागला होता दुसरे लग्न कर म्हणून,आम्ही हिला आपला जीवनाचा जोडीदार म्हणून निवडले आहे,तिच्या काही प्रश्नांची उत्तरं ती शोधते आहे आणी म्हणून आम्ही ह्या दोघांना इथे राहण्याची कुठेही फिरण्याची अनुमती दिली आहे.आपणास पसंत नसेल तर आम्ही आयुष्यभर असेच राहू पण आम्हाला पुन्हा दुसरा विवाह करण्यास सांगू नये.राजांच्या स्पष्ट बोलण्याने थोड्यावेळ त्यांचे आईवडील पण चकित झाले,इकडे राजेश्वरी उभ्या जागी थरथर कापत होती राजांनी आपल्या हातातला तिचा हात दाबून तिला आश्वस्त केले.महाराज सुदर्शन म्हणाले की कुणामुळे का होईना तुम्ही विवाहास तयार झाला हेच आम्हाला विशेष वाटते पण एका राजकुमाराने एकदम रंगारी मुलीशी,न शिकलेल्या मुलीशी विवाह करण्याचा अट्टाहास धरावा हेच आम्हाला विचित्र वाटते.राजघराण्यातल्या एकापेक्षा एक उत्तम मुलींची स्थळ तुमच्याकरता खोलंबून आहेत. सुजयराजे पुन्हा त्यांच्या नम्र आवाजात म्हणाले "महाराज मला क्षमा करा पण येणाऱ्या काळात ह्या सगळ्याच संकल्पना पार इतिहासात जमा होणार आहेत.आपण कित्येक वर्षात सुंदरपुरातून बाहेर पडला नाही त्यामुळे बाहेरच्या बदलांची आपल्याला काहीच गंधवार्ता नाही.येत्या काही वर्षात राजे राण्या हे फक्त कथा कल्पनातच असणार आहेत. आम्हाला नव्या काळाची चाहूल फार पूर्वीच लागली हे आम्ही आमचे भाग्य समजतो,पण राजेश्वरीचे राजघराणे नसणे हे माझ्या दृष्टीने फारसे महत्वाचे नाही आणी शिक्षण म्हणाल तर ती अजून लहान आहे,नव्या गोष्टी शिकायची तिला आवड आहे हे नाझ्या मते पुरेसे आहे.ती एक चांगली व्यक्ती आहे हे महाराज मला जास्त महत्वाचे वाटते."आता मात्र महाराणी सुलक्षणा बोलायला सरसावल्या "तुम्ही हिला लग्नाची मागणी घातली हे आम्हाला सांगितले नाही,त्यातही ही मुलगी आता कोणत्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहे हेच आम्हाला कळत नाही,तुमच्या सारखा नवरा हिला शोधूनतरी सापडला असता का?माझ्या मते ही तुमचा सरळ सरळ अपमान करते आहे."राजेश्वरी नाही अशी मान हलवून थांबली पण सुजयराजेच म्हणाले "आई हा तिच्या उभ्या आयुष्याचा प्रश्न आहे,तिला जर सुकन्या बद्दल काही जाणून घ्यायचं असेल तर तिला निशितच तो अधिकार दिला पाहिजे"सुजयराजांच्या बोलण्यामुळे राजेश्वरी इतकी प्रभावित झाली की ती भान हरपून त्यांच्या कडे बघतच राह्यली.ती भानावर आली तीच महाराज सुदर्शन ह्यांनी मारलेल्या सूनबाई ह्या हाकेने.राजेश्वरीच्या अंगावर आनंदाने रोमांच उभे राह्यले अन इतक्यावेळ पुतळ्या सारखा उभा असलेला रघुनाथ डोळ्यातल्या पाण्याला   अडवायचा  निरर्थक प्रयत्न करू लागला.महाराज म्हणत होते "सूनबाई काय प्रश्न असतील त्यांची पटापट उत्तरं शोधा आणी लवकर आमच्या बरोबर राह्यला या हा राजवाडा तुमच्या स्वागताला आतुर झाला आहे".  
                                                  सौ.उषा.      

गुरुवार, १९ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                           श्री    ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ५१ राजकन्ये बरोबर राजवाड्यावर जायला निघालेल्या राजेश...
                                          श्री                                     ५१
 राजकन्ये बरोबर राजवाड्यावर जायला निघालेल्या राजेश्वरी बरोबर रघुनाथ पण निघाला तो आता तिला एकटे जाऊ द्यायला तयार नव्हता. राजेश्वरीने परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण रघुनाथ काहीही ऐकून घ्यायला तयार नव्हता,शेवटी त्या दोघी घोड्यावर अन रघुनाथ अन राजकन्येचा सेवक पायी असे राजवाड्याकडे जायला निघाले. दोघ पायी चालत असल्याने घोड्याची गती पण मंद होती.त्यात जंगलातली वाट. 
                              रात्री उशीरा आलेल्या सुवर्णरेखेला बघून महाराज सुदर्शन चांगलेच रागावले होते.त्यात तिच्या बरोबर रघुनाथ अन राजेश्वरीला बघून तर ते फारच चिडले.रघुनाथ अन त्याच्या मुलीचे इथले काम आटोपले होते आता त्यांनी इथून निघून जावे असे त्यांना मनापासून वाटत होते.ते इथून गेल्याशिवाय राजकन्या किल्ल्यावर जाणे बंद करणार नाही हे त्यांना स्पष्ट दिसत होते.स्वतःचा राग आवरून त्यांनी रघुनाथ अन राजेश्वरीला नोकरांच्या निवासस्थानात आजची रात्र काढायला परवानगी दिली मात्र त्यानी सकाळी उजाडता किल्य्यावर निघून जावे अशी सूचना त्यांनी केली.
                       रात्र कशीबशी काढून सकाळी दोघही पायीच किल्य्याकडे निघाले.वाटेत रस्त्याच्या कडेला असलेल्याला फुलझाडाचे एक मोठे फुल राजेश्वरीने तोडून घेतले अन त्याची दांडी धरून फिरवत ती पुढे निघाली.पायी चालत जाण्याचे त्या दोघांना काहीच वाटत नव्हते पण महाराज ज्या पद्धतीने त्यांच्याशी वागले त्याने दोघही नाराज होते.रात्री त्यांना कुणी जेवायला पण विचारले नाही.मनाच्या अश्या अवस्थेत अकस्मात समोर सुजयराजे अन माखनला बघून सगळेच एकमेकाकडे आश्चर्याने बघू लागले.राजेश्वरीचे प्रसन्न दर्शन सुजयराजांना खूपच सुखावून गेले.आणी ते तिच्याकडे बघतच राह्यले.

           त्यांच्या अश्या बघण्याने राजेश्वरी चांगलीच अस्वस्थ झाली होती.नजर खाली ठेउनच तिने थोडक्यात त्यांना इथे राजवाड्यात येण्याचे प्रयोजन सांगितले.राजकन्येला पण आपल्या सारखीच राजेश्वरी आवडू लागली असल्याचे कळल्यामुळे तर ते फारच खूष झाले.त्यांनी त्या दोघांना आपल्या बरोबर ताबडतोब राजवाड्यावर चालण्याचा आग्रह केला तेव्हा नाईलाजाने रघुनाथने त्यांना आमच्या दोघांचे येणे महाराजांना आवडले नसल्याचे सांगितले.हे ऐकल्यावरतर सुजयराजे हट्टालाच पेटले,ते काहीही ऐकून घ्यायला तयार होईना.शेवटी काय होईल ते होईल आजच सगळ्याचा सोक्षमोक्ष लागलेला बरा असे ठरवून रघुनाथ राजेश्वरीला घेऊन माघारी वळला.    
                                           सौ.उषा.        

मंगळवार, १७ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ५० राजकन्या सुवर्णरेखा राजेश्वरी बरोबर बा...

किल्ल्याचे रहस्य

                                                           श्री                                  ५०
राजकन्या सुवर्णरेखा राजेश्वरी बरोबर बाहेर आली तेव्हा दुपार झाली होती.कालपासून बघितलेल्या अन घडलेल्या घटनांचा तिच्या कोवळ्या मनावर फारच परिणाम झाला होता.त्यातच भुकेनी जीव कासावीस झाला होता.ती आपल्या घोड्याला शोधत होती,घोडा न दिसल्याने राजवाड्यावर कसे जायचे हेच तिला समजत नव्हते.ती सरळ राजेश्वरीच्या खोलीकडे वळली.राजेश्वरी रघुनाथला कालपासून घडलेल्या सर्व गोष्टी सांगत होती.राजकन्येला बघून ती एकदम दाराजवळ आली अन म्हणाली हे काय तू अजून इथेच?कुणाला संशय नको म्हणून मी तुझ्या बरोबर आले नाही बर चल तुझा घोडा कुठे आहे?ह्याच प्रश्नाची वाट बघत असलेली राजकन्या जोरात रडू लागली.माझा घोडा कुठेच दिसत नाही आता मी परत कशी जाणार?मला खूप भूक पण लागली आहे.राजेश्वरी थोडी काळजीत पडली कारण तिच्या दोन्ही प्रश्नांचे तिच्या जवळ काहीच उत्तर नव्हते.रघुनाथ एव्हाना बाहेर आला होता.त्याने सांगितले की मीच घोड्याला तबेल्यात बांधून ठेवले आहे.काल सगळ्यांनीच मला खूप हैराण केले की हा घोडा कुणाचा?सुवर्णरेखा बहुदा कुणाच्या दृष्टीस पडली नसावी.
                   रघुनाथने घोडा आणल्याबरोबर राजकन्या एकदम घोड्यावर स्वार होऊन वाऱ्याच्या वेगाने राजवाड्याकडे निघून गेली.तिच्या येण्याबद्दल कुणाच्या तरी कानावर घालायला हवे होते.हिचे असे वेळी अवेळी एकटीने इकडे येणे बरोबर नाही.रघुनाथ अन राजेश्वरी दोघही हाच विचार करत होते.उद्या संध्याकाळी जाताना रघुनाथला पण बरोबर घेऊन जायचे मान्य केल्यावरच राजेश्वरीला त्याने पुन्हा जायला परवानगी दिली.दोघही बापलेक रात्री जेऊन लवकर झोपले.
               सकाळी घाईने सगळे आटपून दोघही जंगलाकडे निघाले अन किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच त्यांना सुवर्णरेखा भेटली.ती आज आनंदात दिसत होती.तिने आल्या आल्याच सांगितले काल मी न सांगता आली होती पण आज मात्र मी आजी आजोबांना सांगून आले आहे.हे बघा हे माझ्याबरोबर काका आले आहे.तिच्या बरोबर आलेल्या सेवकाने सांगितले की राजकन्या कुठेही गेली तरी मी तिच्या बरोबर असावे म्हणून मी आलो आहे आणी ह्यापुढे त्यांची जिथे जायची इच्छा असेल तिथे मी तिच्या बरोबर जाणार.राजेश्वरीने वरकरणी हसत पण मनातल्या मनात कपाळाला हात लावत दोघांचे स्वागत केले.ह्या दोघांना टाळून कसे जायचे हेच तिला कळेना.सगळे परत खोलीवर आले.बरोबर आलेला सेवक बाहेर थांबला अन तिघही खोलीत गेले.खोलीत गेल्याबरोबर राजकन्या राजेश्वरीला बिलगली आणी तिच्या कानात हळू आवाजात सांगितले मी काल बघितलेले कुणालाच सांगितले नाही.राजेश्वरीने तिला थोपटून शाबासकी दिली.
                 संध्याकाळ झाली तरी राजकन्या जायचं नाव काढत नव्हती.सेवकांनी बरोबर आणलेला खाऊ खाऊन ती राजेश्वरीच्या अवती भवती घोटाळत होती.तिला माहीत होत की राजेश्वरी आता आपल्याला बरोबर नेणार नाही,शेवटी सगळा धीर एकवटून ती राजेश्वरीला म्हणाली "मी माझ्या बापूंची,सुजयराजांची मुलगी आहे.मी आता कुणालाच भीत नाही,त्या बाईला तर नाहीच नाही.तिच्या डोळ्यातली प्रार्थना राजेश्वरीच्या हृदयास भिडली अन ती सुजयराजांना चक्क बापू म्हणाली होती.राजेश्वरीने तिच्या प्रश्नाचे उत्तर न देता तिला गमतीने विचारले तू सुजयराजांना बापू म्हणतेस?राजकन्या थोडीशी बावरली पण पटकन म्हणाली तू नाहीका तुझ्या वडलांना बापूच म्हणते तुझ बघून मी पण म्हणणार बापू.तिच्या निरागस चेहेऱ्याकडे राजेश्वरी बघतच राह्यली.राजकन्या परत जायला तयार नाही बघून अखेर राजेश्वरी तिच्या बरोबर राजवाड्यावर जायला तयार झाली.राजकन्या आनंदाने टाळ्या वाजवू लागली.
                                       सौ.उषा.
 

शनिवार, १४ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                                   ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: ...: श्री ४९ दुसऱ्या दिवशी सकाळी दरबाराचे ...

किल्ल्याचे रहस्य

                                                                   श्री                                 ४९
 दुसऱ्या दिवशी सकाळी  दरबाराचे काम सुरु झाले.एक बलदंड माणूस दोघा म्हाताऱ्या माणसांना साखळदंडाने जखडून फरपटत आणत होता.ती दोघही म्हातारी माणसं कशी बशी चालत होती,त्यांची ही अवस्था बघून सुकन्या खदखदून हसत होती.तिच्या समोर त्यांना आणल्या बरोबर ती तिच्या चिरक्या आवाजात ओरडली "महाराज सुदर्शन,अन महाराणी सुलक्षणा काय ही तुमची अवस्था!पण मला अजिबात दया येत नाही तुमची.मला तुमच्याबद्दल काहीच वाटत नाही."इतक्या वेळ खाली मान घालून उभी असलेली  राजकन्या आपल्या आजी आजोबांचे नाव ऐकताक्षणी वर बघू लागली. त्या दोघांचेही चेहेरे अजिबात ओळखू येत नव्हते इतकी त्यांनी खाली  मान घातली होती.इतक्यात अधीरपणे सुकन्या म्हणाली आम्ही उगीच  कुणाला शिक्षा करत नाही आधी ह्यांचा गुन्हा सांगा.दरबारातला एक माणूस उभा राह्यला अन म्हणाला "महाराणी सुकन्याचा जयजयकार असो.
आपल्या न्यायाची कीर्ती दिगंत पसरली आहे.समोर असलेले दोन गुन्हेगार हे  राजद्रोही आहेत.महाराणी सुकन्याला महाराणी ह्या उच्च पदापासून  त्यांनी जाणून बुजून दूर ठेवले.हा गुन्हा त्यांना मान्य आहे.आपण सांगाल ती शिक्षा ते आनंदानी भोगायला तयार आहे." सुकन्या किंचाळली त्या दोघांना चांगले पंचवीस फटके मारा,अन दिवसभर उपाशी ठेवा."तिचे ओरडणे  अन फटक्यांची शिक्षा ऐकून राजकन्या पुन्हा रडू लागली.तिने राजेश्वरीच्या विरलेल्या  मळक्या ओढणीत आपला चेहेरा लपवला.राजेश्वरीने पण तिला आपल्या  जवळ ओढून घेतले.इतक्यात तिथे तिसरा आरोपी पण आणला गेला.तो पण खाली मान घालून उभा होता.सुकन्या जोरात ओरडली ह्या सुजयराजाला तर पन्नास फटके मारा अन आठवडाभर जेवायला  घालू नका.हमसून रडत असलेल्या सुवर्णरेखेनी तोंडावरची झिरझिरीत ओढणी बाजूला करून 
आपल्या वडलांकडे बघितले.एरवी ताठ मानेनी उभे असलेले तिचे वडील  आज खाली मान घालून उभे असलेले बघून तिचे मन कासावीस  झाले.काय करावे काहीच सुचत नव्हते.तिला त्या राणी बद्दल  एकदम  तिटकारा वाटू लागला.सुकन्याची पुढची आज्ञा ऐकून तर राजकन्या  भीतीने थरथर कापू लागली.सुकन्या सांगत होती त्या सुजयराजाची  मुलगी कुठे आहे?तिला सोडू नका बरका ती माझ्या वाटेतला मोठ्ठा  अडथला आहे.असं करा तिला मारूनच टाका. आता मात्र राजकन्या   पुरतीच घाबरली.ती राजेश्व्रीला म्हणाली आपण येथून ताबडतोब बाहेर जाऊ.तिच्या रडक्या आवाजाने सुकन्याचे लक्ष वेधले गेले ती ओरडून म्हणाली आमचे नवीन नोकर काय म्हणताहेत?त्यांना मौज वाटली की नाही?राजेश्वरीने सुवर्णरेखेला आपल्या जवळ ओढून घेतले आणी तिचा चेहेरा कुरवाळून म्हणाली "महाराणी सुकन्या आपला दरबार अन त्यातली ही मौज आम्हा दोघीना फार आवडली पण ही छोटी म्हणते आहे की ह्या मजे करता आपण महाराणींना जंगलातल्या त्या दुर्मिळ फुलांचा हार करून घातला पाहिजे,आपली परवानगी असेल तर आम्ही येथून बाहेर जातो आणी जंगलातल्या त्या फुलांचा हार आपल्या करता करून आणतो. आपल्या सेवेची संधी देऊन आम्हाला उपकृत करावे ही विनंती." राजेश्वरीच्या नम्र आणी गोड बोलण्याचा अचूक परिणाम झाला. सुकन्याने त्या दोघीना ताबडतोब तिथून जाण्याची परवानगी दिली. केशरने त्यांना बाहेर जाण्याचा मार्ग दाखवला.बाहेर येऊन दोघींनी एकमेकीना घट्ट मिठी मारली.राजेश्वरीने राजकन्येला समजावले की तू जर कुणाला ह्याबद्दल सांगितले तर सारेच तुला रागावतील पण आता तू माझ्या बरोबर पुन्हा येऊ नकोस.राजकन्येनी रडत रडत होकार दिला.
                                                सौ.उषा.      
   

मंगळवार, १० जानेवारी, २०१२

                                         श्री                                    ४८
राजेश्वरी राजकन्येचा हात घट्ट धरून अंधारात दडून बसली होती.ती मनातल्यामनात देवाचा धावा करत होती "देवा केशर दिसू दे",माखन तर सुजयराजांबरोबर गेला असल्यामुळे त्याचा प्रश्नच नव्हता.केशर पण दिसत नव्हती त्यात ही राजकन्या,अन पुढे घडणाऱ्या प्रसंगाच्या कल्पनेनी राजेश्वरी शहारली.आता थोडी हिम्मत दाखवावी लागणार होती,तिनी पुन्हा एकदा राजकन्येला सांगितले काहीही बोलायचे नाही,मी बोलीन तेच फक्त ऐकायचं.सुवर्णरेखा आता चांगलीच उतीजीत झाली होती,तिने पटकन मान डोलावली.राजेश्वरी एकदम पुढे झाली अन समोरच्या स्त्रीला म्हणाली केशर कुठे आहे ?इथे दोन नवीन नोकर हवे आहे म्हणून तिने आम्हा दोघीना बोलावले होते.ती स्त्री पण राजेश्वरीच्या अकस्मात पुढे येण्याने दचकली होती पण तिने केशारचे नाव घेतल्याने लगेच सावरून म्हणाली "नवीन नोकर ?मला काहीच माहीत नाही,पण मी तुला बाईसाहेबांकडे घेऊन चलते.त्या दोघी तिच्या मागे चालू लागल्या.एका प्रशस्त दालनात आल्यावर तिने केशरला हाक मारून या दोघींकडे खूण केली.त्या दोघीना समोर बघून केशर चांगलीच घाबरली होती तिला याची कुठलीही पूर्वसूचना नव्हती त्यात राजेश्वरी राजकन्येला बरोबर घेऊन आली होती.तिचा गोंधळ राजेश्वरीच्या लक्षात आला.ती पटकन म्हणाली इथे दोन नवीन नोकर हवे म्हणून तूच नाहीका आम्हाला बोलावले?केशर चाट पडली पण लगेच साव्र्रोन म्हणाली हो इथे इतकं काम आहे की दोन काय चार सुद्धा नोकर कमीच पडतील पण नोकर मात्र आमच्या बाईसाहेबच निवडतात.केशर लगेच म्हणाली "महाराणी सुकन्या आपणास ह्या नवीन नोकरांना काही प्रश्न विचारायचे आहे का?सुकन्याने एक तुच्छ नजर त्या दोघींवर टाकली अन म्हंटल ठीक आहे केशर तुझ्या चाचणीतून उतीर्ण झाल्या आहेत न मग मी नको विचारायला काही शिवाय दरबाराची वेळ पण होत आली आहे.राजकन्या सुवर्णरेखा आश्चर्याने थक्क झाली होती.ही तिच्या समोर तिची आईच होती अन तरीही तिने आपल्याला ओळखू नये याचे तिच्या बालमनाला विलक्षण दुखः होत होते.न जाणो आपल्या आई सारखी दिसणारी ही कुणी दुसरीच स्त्री असावी,आणी आपली आई तर सुजयराजांच्या हातून मेली आहे.डोळ्यात सारखे पाणी येत होते. राजेश्वरीला तिची अवस्था समजत होती पण आत्ता ह्या क्षणाला ती काहीही बोलू शकत नव्हती 


काहीतरी सुचून राजेश्वरीने तिथल्याच तबकातले एक
सुंदर गुलाबाचे फूल उचलले,राणी सुकन्याच्या जवळ जाऊन तिने ते फूल तिच्या पुढे ठेवले अन म्हणाली महाराणी सुकन्याचा जयजयकार असो,आपल्या सेवेची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही दोघी आपल्या आभारी आहोत.महाराणी म्हटल्याने खुशीत असलेल्या सुकन्याने तिला आपल्या गळ्यातील मोत्याचा हार बक्षीस दिला. राजेश्वरीचे धाडस बघून केशर थक्क झाली.केशरच त्यांना काम सांगणार होती.इतक्यात सुकन्या म्हणाली आजच्या दिवस त्यांना आमचा दरबार अन तिथली मौज बघू दे मग उद्यापासून सांग काम. केशरनी यांत्रिकपाने मान हलवली.
                                           सौ.उषा. 

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: किल्ल्याचे रहस्य: श्री ४८ राजेश्वरी राजकन्येचा हात घट्ट धरून अंधारात दडून बसली ह...

रविवार, ८ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                   श्री राजेश्वरीन...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री
राजेश्वरीन...
: श्री राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयर...

किल्ल्याचे रहस्य

                                  श्री 
राजेश्वरीने राजकन्येला म्हटले खरे की उद्या तुला एक गम्मत दाखवीन पण प्रत्यक्षात दुसऱ्या दिवशी सुजयराजांनी तिला महाराज आणी महाराणीना तिथून परत पाठवले अर्थात त्याला कारणही तसेच होते म्हणा एक तर येणारे दोन तीन दिवस सुजयराजे त्यांच्या मित्राबरोबर  कुठेतरी जाणार होते आणी स्वतः तिथे नसताना त्यांना त्या तिघांच्या बाबतीत कुठलाही धोका पत्करायचा नव्हता                  आज काहीकेल्या राजेश्वरीचा दिवस जात नव्हता. संध्याकाळ होत आली तशी तिला एक कल्पना सुचली आणी रघुनाथच्या कानावर घालून ती लगेच निघाली.रघुनाथला आज पण तिने आपल्या बरोबर येऊ दिले नाही.हातात काठी,कमरेला दोरी,राजेश्वरी झपाट्याने सौधाच्या दिशेनी निघाली.त्या विशिष्ट पायरी जवळ येऊन तिने त्या फुलाच्या पाकळ्या फिरवल्या बरोबर पायरी सरकली आणी आत लटकत असलेल्या जाड दोरखंडाला धरून राजेश्वरी आत उतरली,पण कुणीतरी तिच्या कमरेला घट्ट मिठी मारली होती.राजेश्वरी चांगलीच घाबरली होती हे काय नवे संकट?अंधारात काही दिसत पण नाही.तिने कमरे भोवतीच्या हातावर हात ठेवला,लहान मुलाचा हात राजेश्वरी एकदम दचकली राजकन्या सुवर्णरेखा तर नाही?तिने हात धरून तिला पुढे ओढले.होय सुवर्णरेखाच होती ती,राजवाड्यातून स्वतःच्या घोड्यावर बसून ती मुद्दाम राजेश्वरीला भेटायला आली होती आणी अनपेक्षितपणे तिला राजेश्वरीचे रहस्यमय वागणे आवडले आणी आपणही तिच्या मोहिमेत सामील व्हावे म्हणून ती चोरपावलाने राजेश्वरीच्या मागे येऊन उभी राह्यली अन राजेश्वरीने पायरी सरकावल्या बरोबर तिने झटकन राजेश्वरीच्या कमरेला मिठी मारली आणी तिच्या बरोबर त्या अंधाऱ्या भुयारात आता ती समोर उभी होती.तिला जरी दिसत नसले तरी राजेश्वरीला आपले येणे आवडले नाही हे तिला समजले होते.आता राजेश्वरीला आल्या प्रसंगाला तोंड देण्याबरोबर राजकन्येची जपणूक करायची होती.तिने खाली वाकून तिच्या कानात सांगितले,इथे काहीही दिसले तरी बोलायचे नाही आपण इथून बाहेर पडे पर्यत दोघींनी एकमेकीजवळ थांबायचे.राजकन्या एकदम आनंदित झाली,हीच ती गम्मत असणार,बर झालं आपण आज आलो ते.दोघींनी आता हात घट्ट धरून पुढे चालायला सुरुवात केली.आता थोडा थोडा उजेड दिसू लागला होता.काही माणसं इकडून तिकडे येजा करताना दिसत होती.समोरचा दरबार दिसू लागला होता पण आज राजेश्वरीला कुठलाही धोका पत्करायचा नव्हता.ती योग्य संधीची वाट बघत होती.
                                सौ.उषा.

शुक्रवार, ६ जानेवारी, २०१२

उषा usha-ushagmailcom.blogspot.com:                                    श्री           ...

उषा usha-ushagmailcom.blogspot.com: श्री ...: श्री ४६ राजेश्वरीला एकदम हायसं झालं.केशर आल्यामुळे राजेश्वरीची समस्या सुटल्या सा...
                                   श्री                        ४६
राजेश्वरीला एकदम हायसं झालं.केशर आल्यामुळे राजेश्वरीची समस्या सुटल्या सारखीच होती पण सुवर्णरेखा काही केल्या तिच्या बरोबर जायला तयार नव्हती.शेवटी सगळेच परत फिरले,राजमहालात थोड्या नाखुशीने गेलेल्या सुवर्णरेखेकडे राजेश्वरी कितीतरी वेळ बघत बसली होती,ती भानावर आली ती सुजयराजांच्या हळुवार चौकशीने,त्यांनी मोठ्या नम्रपणे रघुनाथची माफी मागितली,त्यांच्या लेकीमुळे रघुनाथ अन राजेश्वरीला  नियोजित कार्यक्रमात थोडा बदल करावा लागणार होता.सुवर्णरेखा आई वेगळी दुर्दैवी मुलगी असल्याने ती थोडी जास्त लाडावली गेली आहे हे त्यांनी एकदम मान्य केले,पण तिला कसं सावरायचं तेच कळत नसल्याचे पण त्यांनी सांगून टाकले.पण तुमच्या बरोबर ती कुठेही आली तरी मला चालणार आहे हे पण त्यांनी स्पष्ट केले. दुपारी जेवण झाल्यावर आपण सगळेच जंगलात जाऊ असा प्रस्ताव त्यानी मांडला त्यावर हो म्हणण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नव्हता.
           जंगलात आल्यावर राजकन्या अगदी हरखून गेली होती. सगळ्या लवाजम्याशिवाय आज ती फक्त तिच्या वडलांबरोबर होती अगदी राजेश्वरी सारखीच ती पण आज स्वच्छंद होती!जंगलातल्या विविध वनस्पतींची रघुनाथला असलेली माहिती बघून तिला खूपच नवल वाटत होतं,आणी इथलीच फुलं वापरून त्यांनी रंग तयार केले हा तर तिच्या दृष्टीने चमत्कारच होता.तिथले कित्येक प्राणी सुवर्णरेखेनी आज पहिल्यांदाच बघितले होते.तिला रघुनाथ ,राजेश्वरी म्हणजे कुणी जगावेगळीच माणसं वाटत होती.
 जंगलातल्या फुलांनी,फुलपाखरांनी तर राजकन्येला इतकी भुरळ घातली की ती काही केल्या घरी परतायला तयार होईना,इवल्याश्या डोळ्यांच्या,खारुताई,इकडून तिकडे उगीचच उड्या मारणारी माकडांची टोळी,अन मण्यांसारख्या डोळ्यांच्या ससोबाने तिची खूपच करमणूक केली.उद्या पुन्हा परत येऊ या आश्वासनानंतरच ती घरी परतायला तयार झाली.
             राजेश्वरी थोडी नाराजच होती कारण इथे उगीचच थांबण्यात त्या दोघा बापलेकांना अजिबात रस नव्हता.सगळंसुरळीत पार पडलं तर ठीक नाहीतर इथून जायचं नक्कीच आहे.राजेश्वरीने एकदम सुजयराजांकडे बघितले चालण्याच्या श्रमाने दोघही बापलेक थकल्या सारखे दिसत होते,पण दोघही आज आनंदात होते.वडलांचा हात धरून चालताना राजकन्येला वेगळीच गम्मत वाटत होती.तिचे वडील तिला खूप आवडू लागले होते.हीच का ती सुवर्णरेखा हे राजेश्वरीलाच खरे वाटत नव्हते.आता तिला जास्तच आत्मविश्वास वाटू लागला.ती राजकन्येचा हात धरून म्हणाली उद्या तुला एक वेगळीच गम्मत दाखवणार आहे.
                              सौ.उषा. 

सोमवार, २ जानेवारी, २०१२

                              ||  श्री  ||                       ४५

    
रघुनाथ अन राजेश्वरी राजपरिवाराचा निरोप घेऊन बाहेर पडले खरे पण डोक्यात अनेक विचारांचे काहूर माजले होते.दोघांनीही एकमताने जंगलाचा रस्ता धरला,तिथल्या एकांतातच काहीतरी निर्णय घेता येईल.इथे काहीही बोलणे धोक्याचे होते.किल्ल्याच्या दारात आल्यावर राजेश्वरीने एकवार वळून किल्ल्याकडे बघितले.

गेल्या काही महिन्यात किल्य्याचे रूप खरोखर बदलून गेले होते.दुरुस्तीचे काम इतके चांगले होईल अन भोवतीची बाग इतकी शोभिवंत दिसेल असे कुणालाच वाटले नव्हते.रघुनाथ अन राजेश्वरी आतापर्यंत जिथेही गेले त्यांनी तिथले स्वरूप असेच पालटून टाकले होते.सुजयराजांचे सारेच मित्र,अन सारा राजपरिवार किल्य्याच्या ह्या आकर्षक रूपावर बेहद्द खूष होता. 
     किल्ल्याच्या ह्या मागच्या बाजूने आज त्यांना जंगल गाठायचे होते.म्हणजे कुणी बघायला नको आणी शंभर प्रश्न विचारायला नको     राजेश्वरी भरभर चालत निघाली तिला तिच्या आवडत्या तलावाच्या काठावर बसून रघुनाथशी चर्चा करायची होती.इतक्यात तिला कोणीतरी हाक मारल्यासारखे वाटले,म्हणून वळून पाह्यले तर राजकन्या सुवर्णरेखा धावत तिच्याच दिशेनी येत होती.राजेश्वरी तिथेच उभी राह्यली ,धापा टाकत सुवर्णरेखा जवळ येऊन उभी राह्यली होती,धावण्याच्या श्रमामुळे तिचे गोरे गाल लालबुंद दिसत होते आणी घामाच्या धारा दोन्ही हातानी पुसण्याचा तिचा प्रयत्न फारसा यशस्वी होत नव्हता.राजेश्वरीचा हात घट्ट धरून तिने विचारले आम्हाला शिकवाल तुमच्या सारखे चित्र काढायला ?आमचे पिताजी पण खूप छान चित्र काढतात.पण त्यंना कुठे वेळ असतो आमच्या करता?तिचा चेहेरा निरागस होता.नेहेमीची उद्धट सुवर्णरेखा जणू हरवली होती,राजेश्वरीला ह्या आईबाप असून पोरक्या असलेल्या मुलीची एकदम दया आली,तिने हसून सुवर्णरेखेला चित्र काढायला शिकवायचे कबूल केले.सुवर्णरेखा एकदम आनंदून गेली.तिने लगेच पुढचा प्रश्न विचारला मी येऊ तुझ्या बरोबर?ह्या प्रश्नाने मात्र राजेश्वरी चांगलीच गोंधळली.तिला काय उत्तर द्यावे ह्या विचारात असतानाच केशर येताना दिसली.
सौ.उषा.

रविवार, १ जानेवारी, २०१२